आज ३० सप्टेंबर. भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक हृषिकेश मुकर्जी यांची जयंती हृषिकेश मुखर्जी… भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व. त्यांचा जन्म ३० सप्टेंबर १९२२ रोजी झाला. दिग्गज दिग्दर्शक बिमल रॉय यांचे शिष्य आणि ‘आनंद’, ‘अभिमान’, ‘गोलमाल’, ‘बावर्ची’, ‘खुबसुरत’ अशा उत्तमोत्तम चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून आणि चंदेरी दुनियेतल्या झगमगाटात प्रदीर्घ काळ राहूनही साधेपणा जपणारे प्रतिभावंत दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. हिंसाचार किंवा लैंगिकतेला त्यांनी आपल्या […]
गरम पाण्याच्या कुंडासाठी प्रसिद्ध असलेले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील “आरवली” हे गाव!!! मुंबईहुन गोव्याकडे जाताना चिपळुण हुन सुमारे ३१ किमी तर संगमेश्वर च्या अगोदर १६ किमी वर लागणारे आरवली गावाची २००८-२००९ नंतर नवीन ओळख तयार झाली…. गरम पाण्याच्या कुंडात अंघोळ केल्यावर अंगावरची रोगराई पळुन जाते अस म्हणतात…. एका अर्थाने गावाची तीच परंपरा, तीच ओळख कायम ठेवणारा […]
आज २९ सप्टेंबर. बॉलीवुडचा विनोदाचा बादशहा मेहमूद यांची जयंती. मेहमूद यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. मुमताज अली हे मेहमूद यांचे वडील मुंबई टॉकीज स्टुडिओमध्ये काम करत असत. मेहमूद अभिनेता बनण्याच्या आधी ड्रायव्हरचेही कामही करत असत मीना कुमारी यांनी त्यांना टेबल टेनिस शिकवण्यासाठी नोकरीला ठेवले होते. तेव्हा त्यांनी मीना कुमारीची बहीण मधू हिच्याशी विवाह केला. विवाह केल्यावर अभिनय करण्यास सुरवात केली. […]
लता मंगेशकर यांच्याविषयी माहिती असलेल्या आणि नसलेल्याही माहितीचा संग्रह.. जन्म – सप्टेंबर २८, इ.स. १९२९ ; इंदोर, मध्य प्रदेश (ब्रिटिश काळातील मध्य भारत एजन्सी) व्यक्तिगत माहिती धर्म हिंदू नागरिकत्व भारतीय मूळ गाव – मंगेशी, गोवा भाषा – मराठी पारिवारिक माहिती आई – माई मंगेशकर वडील – मास्टर दीनानाथ मंगेशकर बंधू-भगिनी – आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, मीना खडीकर संगीत साधना गुरू – मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत कारकीर्द पार्श्वगायन, सुगम संगीत कारकिर्दीचा काळ – इ.स. १९४२ पासून गौरव विशेष […]
आज २२ सप्टेंबर. पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक अनंत माने यांची जयंती अनंत माने यांचा जन्म २२ सप्टेंबर १९१५ रोजी झाला. ’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. तमाशाप्रधान चित्रपटांचा सुवर्णकाळ म्हणजे पन्नास,साठ आणि सत्तरचे दशक असून या कालावधी मध्ये दिग्दर्शक अनंत माने व संगीतकार वसंत पवार अनेक सुंदर सुंदर […]
आज २२ सप्टेंबर. स्मरणीय भूमिका करणार्या दुर्गा खोटे यांची पुण्यतिथी. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ रोजी झाला. चित्रपट कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टोकोन दूषीत होता त्या काळात दुर्गा खोटे यांना चित्रपटात येणे भाग पडले. मुलीने चित्रपटात काम करणे घरच्या लोकांना पसंत नव्हते. दुर्गा खोटे यांनी चित्रपटात अशा भूमिका केल्या की चित्रपटातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. चांगल्या घरातील महिलाही अभिनय क्षेत्रात […]
आज २२ सप्टेंबर. मराठीतले भावगीत गायक जी.एन. जोशी यांची पुण्यतिथी. जी.एन. जोशी यांचा जन्म ६ एप्रिल १९०९ रोजी झाला. त्यांनी गायलेले रानारानात गेली बाई शीळ हे त्यांचे भावगीत हे मराठीतले पहिले भावगीत समजले जाते. जी.एन. जोशी हे उच्चशिक्षित वकील होते. एचएमव्हीत रमाकांत रुपजी या वरिष्ठ अधिकार्याने जोशी यांना प्रथम आणले व नंतर तर त्यांना मराठी व शास्त्रीय संगीताच्या विभागाचे अधिकारीच […]
पं. विष्णु नारायण भातखंडे यांचा जन्म १० ऑगस्ट १८६० रोजी झाला. भातखंडे हे लहानपणी बासरी व महाविद्यालयात शिकत असतानाच सतार वाजवण्यास शिकले. सुरुवातीस गोपाळ गिरी यांच्याकडे व नंतर अंध वादक वल्लभदास दामुलजी यांच्याकडे त्यांनी सतारवादनाचे धडे घेतले. ते १८८५ मध्ये बी.ए. व १८८७ मध्ये एल्.एल्. बी. झाले. मात्र तत्पूर्वीच ते १८८४ मध्ये काही पारशी संगीतप्रेमींनी चालविलेल्या‘गायनोत्तेजक मंडळी’ मध्ये (स्थापना १८७०) […]
दत्ता डावजेकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत पार्श्वगायिका म्हणून लता मंगेशकरांना पदार्पणाची संधी दिली. हिंदी चित्रपट होता आपकी सेवामें आणि गाणे होते पा लागूं कर जोरी रे. तसेच मराठी चित्रपट होता माझं बाळ. डावजेकरांनी त्यानंतर आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा ह्यांनाही पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम संधी दिली. दत्ता डावजेकरांचे वडील बाबुराव, तमाशांत आणि उर्दू […]
आज १५ सप्टेंबर..आज मराठीतील प्रसिद्ध नाट्यअभिनेते डॉ. दाजी भाटवडेकर ऊर्फ केशवचंद्र मोरेश्वर भाटवडेकर यांची जयंती जन्म:- १५ सप्टेंबर १९२१ दाजी भाटवडेकर मूळचे मुंबईचे. स्वातंत्र्यपूर्व काळात दाजींचे आजोबा मुंबईतील एक प्रख्यात डॉक्टर होते. त्याकाळी त्यांना मुंबईचे महापौरपदही मिळाले होते. त्यांचे घराणे संपन्नत असले तरी घरांत धार्मिक आणि संस्कृती जपणारे वातावरण होते.दर एकादशीला घरात कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम […]