आज १२ सप्टेंबर.. लोकप्रिय मराठी अभिनेत्री पद्मा चव्हाण यांची पुण्यतिथी त्यांचा जन्म दि. ७ जु्लै १९४८ रोजी झाला… पद्मा चव्हाण या मराठी नाटकांत आणि चित्रपटांत कामे करणार्या एक लोकप्रिय अभिनेत्री होत्या. अप्रतिम स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना असलेल्या पद्मा चव्हाण इतक्या सुंदर होत्या की त्यांच्या नाटकांच्या जाहिरातीत त्यांच्या नावाआधी ‘मादक सौंदर्याचा ऍटम बॉम्ब‘ असे छापलेले असे. पद्मा चव्हाण यांचे १२ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले. — संजीव वेलणकर, पुणे. ९४२२३०१७३३ […]
आज १२ सप्टेंबर… हिंदुस्थानी पद्धतीचे ख्यातनाम गायक सवाई गंधर्व यांची पुण्यतिथी सवाई गंधर्वांचे मूळ नाव रामभाऊ कुंदगोळकर. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८८६ रोजी झाला. ‘नर करनी करे तो नर का नारायण हो जाए’ या म्हणीचे प्रतीक म्हणजे ‘सवाई गंधर्व’. रामभाऊंचा आवाज लहानपणी गोड व हलका होता. त्यांना व घरातील मंडळींना गाण्याची आवड होती. वडील स्वत: तबल्याची साथही करत असत. घरातील आर्थिक सुबत्ता व […]
आज ११ सप्टेंबर.. सुप्रसिद्ध मराठी कवी आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांची जयंती कवी अनिल यांचा जन्म ११ सप्टेंबर १९०१ रोजी झाला. कवि अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी १० चरणांची कविता हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला. भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी कोलकातायेथे प्रयाण केले. त्यांना अब्रिंद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसू ह्यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर १९३५ साली विधिशाखेची पदवी मिळाली. सनद घेतल्यावर वकिलीचा व्यवसाय […]
आज ११ सप्टेंबर.. थोर गांधीवादी आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक आचार्य विनोबा भावे याी जयंती. विनोबाजींचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ रोजी झाला. भगवद्गीतेचे सार सोप्या रसाळ शैलीत ‘गीताई’ आणि ‘मधुकर’ सारख्या ग्रंथांतून सांगणार्या विनोबांची भेट ७ जून १९१६ रोजी मोहनदास गांधी नावाच्या एका महात्म्याशी झाली आणि त्यांच्या आयष्यानेच एक नवे वळण घेतले. त्याक्षणापासून ब्रह्मचर्याची शपथ घेऊन त्यांनी जीवनसाधनेस सुरूवात केली. […]
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या पंजाबी आणि हिंदी मधील प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९१९ रोजी झाला. अमृता प्रीतम यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी महत्त्वपूर्ण साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. त्यांना १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९५८ मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, १९८८ मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि १९८२ मध्ये भारतातील […]
मराठी संगीतातील सुधीर फडके तथा बाबूजी या अजरामर नावाचा वारसा समर्थपणे पेलणारे गायक आणि संगीतकार म्हणजे श्रीधर फडके. गीत-कवितेतील अर्थाला, शब्दांतील सौंदर्याला अधोरेखित करण्याची सुधीर फडके यांची गायनशैली श्रीधर फडके यांनी जाणीवपूर्वक आत्मसात केली असली तरी त्यांनी स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. त्यांना घरचा समृध्द वारसा असला तरी संगीतकार किंवा गायक व्हायचं असं काही त्यांनी ठरवलेलं […]
आशाताईंच्या गाण्याबद्दल आपण सगळेच जाणतो. त्या उत्तम जेवण सुध्दा बनवतात. आशा भोसले यांनी दहा वर्षांपूर्वी “आशाज रेस्टॉरंट प्रा.लिमिटेड” या नावाने हॉटेल व्यवसायाची मुर्हूतमेढ रोवली व आशाज् हे खास भारतीय पदार्थांचे हे रेस्टॉरंट त्यांनी दुबईत सुरू केले. त्यानंतर आबूधाबी, कतार,कुवेत, बहारीन, इजिप्त, ब्रिटन या देशांतही या कंपनीच्या शाखा काढण्यात आल्या. विशेष म्हणजे आशाताईंनी स्वतःच्या खास रेसिपीज या […]
1) ‘मेलडी क्वीन’ अर्थात आशा भोसले यांनी 1943 मध्ये कारकीर्दीची सुरुवात केली आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांचं गायन सुरुच आहे. 2) 1948 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘चुनरिया’ या सिनेमातून त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये गायला सुरुवात केली. संगीतकार हंसराज बहल यांनी ‘सावन आया’ गाण्यासाठी आशाबाईंना संधी दिली होती. 3) आशा भोसले यांनी आतापर्यंत एक हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. 4) […]
आजही एखाद्या विशीतल्या तरुणाला मागे पाडेल, एवढी प्रचंड ऊर्जा, लगबग त्यांच्यात आहे. ८४ व्या वर्षीही त्यांच्यात गाण्याची, स्वर उंचावण्याची क्षमता एवढी आहे की, ऐकणारे थक्कच होतील. ‘ऐंशी वर्षांची म्हातारी बुढी अन् वय काय सांगते सोळा? आंधळा मारतो डोळा…’ या दादा कोंडकेंच्या गाण्यातील मर्म आशाताईंनी कर्तृत्वाने सार्थ करून दाखवले आहे. आशाताई अघोषित भारतरत्न’च आहेत, हे कोणताही संगीतरसिक नाकारणार […]
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात असे सर्वांच्या ओठी असलेले गीत लिहिणारे कविवर्य वामन रामराव कांत म्हणजेच वा. रा. कांत यांची पुण्यतिथी ८ सप्टेंबर रोजी झाली. आशयगर्भ आणि भावतरल कविता लिहिणाऱ्या कविवर्य कांतांनी दोन पारतंत्र्यं पाहिली ती म्हणजे एक इंग्रजांचं व दुसरं कांत कुटुंब जिथं रहात होतं, त्या मराठवाडा भूमीवरचं निजामांचं जुलमी पारतंत्र्य. जिथं मराठी भाषा बोलण्यासही बंदी होती. अशा परिस्थितीतही कांतांचं […]