नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

अमेरिकन लेखक मारिओ पुझो यांचा स्मृतिदिन

१९५०-६० च्या दशकात पुझो यांनी एका प्रकाशनसंस्थेत लेखक/संपादक म्हणूनही काम केले. द डार्क एरिना ही त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतर द फॉच्र्युनेट पिलग्रिम ही दुसरी कादंबरीही गाजली. पण पुझो यांना खऱ्या अर्थाने यश मिळवून दिलं ते त्यांच्या जगप्रसिद्ध द गॉडफादर या कादंबरीने! या कादंबरीच्या १९६९ साली प्रसिद्ध झालेल्या पेपरबॅक आवृत्तीने त्यांना चार लाख दहा हजार डॉलरचे आगाऊ मानधन मिळवून दिले. याच कादंबरीवर आधारित फ्रान्सिस फोर्ड कोप्पोला यांच्या सहकार्याने बनविलेल्या, चित्रपटाला सर्वश्रेष्ठ रुपांतरित पटकथेसाठी असलेला अ‍ॅकॅडमी पुरस्कारा ने (१९७२ व १९७४ साली) सन्मानित करण्यात आले. पण त्यावर आधारित द गॉडफादर या चित्रपटानेही घवघवीत यश मिळविले. या चित्रपटाला अ‍ॅकॅडमी पुरस्काराच्या ११ विभागात नामांकन मिळाले होते. […]

ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचा स्मृतिदिन

मधुकर तोरडमल यांना नाट्यसृष्टीत मामा म्हणत असत. प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मधुकर तोरडमल यांच्या अभिनयाची सुरुवात मुंबईत शाळेपासून झाली. शेठ आनंदीलाल पोद्दार ही त्यांची शाळा. शाळेच्या पहिल्याच दिवशी आपल्याला नाटकात काम करण्याची आवड असल्याचे त्यांनी वर्गशिक्षिका जयकर बाईंना सांगितले. चिं. वि. जोशी लिखित ‘प्रतिज्ञापूर्ती’ हे नाटक मामांनी बसवले. दिग्दर्शन आणि अभिनयाची सुरुवात तिथूनच झाली. नंतर झालेल्या अनेक स्नेहसंमेलनात, अन्य कार्यक्रमांत नाटक बसवण्याची जबाबदारी मामांवरच आली जी त्यांनी यशस्वी पार पाडली. […]

उपराष्ट्रपती व्यंकया नायडू

शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन त्यांनी राजकारणात मिळविलेले यश हे महत्त्वाचे मानले जाते. रस्त्यावर पोस्टर चिकटविणारा कार्यकर्ता ते उपराष्ट्रपती हा त्यांचा प्रवास खडतर होता. एक सालस व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. २०१८ मध्ये व्यंकया नायडू यांची उपराष्ट्रपती पदासाठी निवड झाली. […]

शिल्पकार विनायक पांडुरंग ऊर्फ नानासाहेब करमरकर

करमरकर यांची कलाकृती बघायच्या असतील तर अलिबागजवळच्या सासवणे गावातील ‘करमरकर शिल्पालया’ला नक्की भेट द्या. सत्तरहून अधिक वर्ष जुन्या घरातच शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचं हे शिल्प संग्रहालय आहे. विविध व्यक्तींचे पुतळे, शेतकरी, कोळीण, कुत्रा, म्हैस असे खूप पुतळे हे त्यांच्या अंगणात प्रवेश करताच दिसू लागतात. आतमध्ये जवळ जवळ २०० हून अधिक लहान-मोठी शिल्पं पाहायला मिळतात. सगळी शिल्पं पाहून त्यांच्या कलेला दाद द्यावीशी वाटते. […]

बाबाराव दामोदर सावरकर

बाबाराव यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान आहे. बाबाराव सावरकर हे स्वा.विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू. त्यांनीच स्वा. सावरकरांना पितृतुल्य प्रेम देऊन, अत्यंत हालअपेष्टा सोसून लहानाचे मोठे केले आणि त्यांच्या बरोबरीने क्रांतीकार्यातही भाग घेतला. […]

राजर्षी शाहू महाराज

छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे शाहू,  राजर्षी शाहू, चौथे शाहू अशा नावाने प्रसिद्ध होते.  छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापुर संस्थानाचे  छत्रपती होते. ब्रिटिश राजवटीच्या  काळात सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहू महाराजांनी केलं.  बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. महाराजांना राजर्षी ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. […]

नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व

भास्करबुवा बखले यांचे शिष्य बालगंधर्व हे मास्तर कृष्णराव यांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या चढत्या काळात त्यांचं गाणं ऐकून दस्तुरखुद्द बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळकांनी त्यांना ‘बालगंधर्व’ ही पदवी बहाल केली व पुढे ते त्याच नावाने जास्त प्रसिद्ध झाले. […]

टोयोटा कंपनीचे संस्थापक काईचिरो टोयोटा

काईचिरो टोयोटा म्हणजेच काईचिरो टोयोडा हे जपानमधल्या औद्योगीक क्रांतीचे जनक समजले जातात. त्यांचे महत्वाचे संशोधन म्हणजे ऑटोमेटेड विव्हींग मशिन, ज्याला आपण ‘पॉवर लूम’ म्हणतो यात होते. या मशिनमुळे वस्त्र उद्योगात क्रांती घडवून आणली. नवनवे शोध लावले. त्यांनी वाहन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात योगदान आहे. […]

1 142 143 144 145 146 379
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..