मराठीतून उच्च शास्त्रीय विषय शिकवण्याची त्यांना मोठी तळमळ होती. त्यांना कालाजंत्रीकार म्हणून ओळखत असत. मोडक यांनी रसायनशास्त्राबरोबरच पदार्थविज्ञानशास्त्र, यंत्रशास्त्र, आरोग्यशास्त्र, प्राणिशास्त्र अशा शास्त्रीय विषयांवरील पंचवीसहून अधिक पुस्तके लिहिली. […]
त्या काळात सिनेमा व टेलिव्हिजन नसल्यामुळे प्रसिद्ध व्यक्तींचे चेहेरे पाहण्याचे साधन नव्हते. ते कसे दिसतात याचे कुतुहल सर्वसाधारण लोकांच्या मनात असायचे, पण थोरामोठ्या लोकांशी प्रत्यक्ष संबंध येऊ शकत नसे. यामुळे या मेणाच्या पुतळ्याच्या संग्रहाला भेट देऊन ते आपली औत्सुक्याची तहान भागवून घेत असत. […]
नारायण राणे हे मुख्यमंत्री असताना अधिवेशनाच्या कालावधीत एकदातरी ठाण्याच्या मामलेदार मिसळचा बेत व्हायचा असे सांगितले जाते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही चिरंजीव अमित ठाकरे व अन्य नेत्यांसह मामलेदार मिसळची चव चाखलेली आहे. […]
भारताचा काळा पैसा विदेशी बँकांमध्ये अनधिकृतरित्या कसा फिरतो आहे, हे पण त्यांनी उघड करून दाखवले. स्वदेशीचा प्रचार गावोगावी जाऊन केला. जास्तीत जास्त लोकांनी स्वदेशी वस्तू वापरल्या तर देशात रोजगार निर्माण होईल व देशातला पैसा देशातच फिरत राहील हे तत्त्व त्यांनी लोकांसमोर मांडले. […]
ठाण्याच्या मो. ह. विद्यालयात असताना त्याला उनाडक्या करण्यातच रस होता. शाळेत नंबर एकतिसावा आला. वडील फक्त म्हणाले, “तिनावर एक एकतीस! यातला ‘तीन’ नंबर काढून टाकलात तर बरं!” त्रागा न करता एका ओळीत सांगितलेलं सूत्र चिरंजीव वसंताच्या मनात रुजलं आणि मग कुठलाही छंद चौफेर भटकत जोपासताना नंबर वनचीच गुणवत्ता दाखवण्याचा ध्यास ‘वसंत वसंत’ने घेतला. […]
त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी शिवकाल, पेशवेकाल ह्या काळातील इतिहासाविषयी चिकित्सक लेखन केले आहे. निजाम-पेशवे संबंध, पानिपत : १७६१, श्रीशिवछत्रपती इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. […]
इतिहासाशी पूर्ण प्रामाणिक राहून व त्याचे नवे पैलू शोधून मांडणारा लेखक अशी त्यांची प्रतिमा आहे. सुभाषबाबूंच्या चरित्राचा एवढा व्यापकपणे शोध घेणारी कादंबरी खुद्द बंगालीतही नाही. […]
ज्या काळात मराठी घरांमध्ये पॉप आणि रॉक संगीत हे शब्द अनभिज्ञतेच्या किंवा विनाकारण हेटाळणीच्या सुरात उच्चारले जात, त्या काळात नंदू भेंडे यांनी छेडलेली मराठी रॉकची तार आज अन्य कितीतरी जणांमुळे झंकारत राहिली आहे. […]
गणेश वासुदेव मावळणकर हे १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अहमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते. […]