त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथांपैकी अमृतानुभव भावार्थमंजिरी, पासष्टीभावार्थदीपिका, श्रीगुरूचरित्र सारामृत, श्रीगोदा महात्म्य, श्रीगौडपादकारिका, श्रीईशावास्य भावार्थबोधिनी व मंत्रार्थप्रकाशिका, श्रीनागझरी महात्म्य, श्रीनारद-भक्तिसूत्र-बोधिनी, श्रीमध्वविजय, श्रीमांगीशमाहात्म्य, श्रीशनिप्रताप, श्रीशंडिल्यभक्तिसूत्र भावदीपिका हे प्रमुख ग्रंथ त्यांच्या उत्तुंग काव्यप्रतिभेची साक्ष पटवितात. […]
त्यांनी गो. नी.दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या ‘आशक मस्त फकीर’ या व्यक्तिचित्रास महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीच्या त्या माजी सदस्य राहिल्या आहेत. […]
बाबूजींच्या आयुष्याकडे पाहताना काही गोष्टी विलक्षण वाटतात. यशाने ते कधीही हुरळून गेले नाहीत आणि अपयशाने कधीही खचून गेले नाहीत. सत्ता असो किंवा नसो त्याची त्यांना कधीही फिकीर वाटली नाही. सत्तेपेक्षा कितीतरी श्रेष्ठ दर्जाचे लोकमतचे व्यासपीठ हातात असताना सत्तेची पत्रास काय, असे ते म्हणायचे. […]
मॅराडोनाने अर्जेंटिनासाठी ९१ मॅचेस खेळत ३४ गोल्स केले होते आणि चार वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी मैदानात असे काही प्रदर्शन, गोल्स केले जे आजही सर्वांच्या लक्षात आहेत. […]
महाराष्ट्राचं हे नेतृत्व म्हणजे केवळ राजकीय पदं भूषवणारं शोभेचं बाहुलं नव्हतं. तर यशवंतराव चव्हाण हे नेता होते, खराखुरा विचारांचा सह्याद्री होता. यशवंतराव चव्हाण अभिजात साहित्यिक होते. मराठी भाषेचा एक नम्र व रसिक वाचक या नात्याने त्यांनी नेहमीच मराठी भाषेचा, साहित्याचा आणि साहित्यिकांचा आदर केला आहे. ललित, आत्मपरलेखन, चरित्रात्मक, व्यक्तिचित्रणपर आठवणी, प्रवासवर्णन, स्फुट, वैचारिक, समीक्षात्मक, पत्रात्मक, भाषणे इत्यादी स्वरूपातील लेखन त्यांनी केले आहे. […]
काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी काश्मीर कमिटीचे काम ते करत होते. जून महिन्यापासून धुमसत असलेल्या काश्मीर खोऱ्यात शांततेची फुंकर घालण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राबवलेल्या आठ कलमी कार्यक्रमांतर्गत काश्मिरी जनतेशी संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारचे संवादक म्हणून त्यांची अलिकडेच नियुक्ती करण्यात आली होती. […]
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या मेघराज राजे भोसले यांनी १९९७ मध्ये ‘पांडव एंटरप्रायजेस’ या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना करून ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘मास्तर एके मास्तर’, ‘डंक्यावर डंका’, ‘संत वामनभाऊ’ या चार मराठी चित्रपटांची निर्मिती केली. […]
विदर्भातले ते एक लोकप्रिय नेते होते. तुकडोजी महाराजांच्या नेतृत्वात ते चले जाव आंदोलनात आघाडीवर होते. ते १९५२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मूळसावली मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे पहिल्यांदा आमदार झाले. […]
१९७७ मधे ‘उत्खनन’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह आला. रेल्वेत नोकरीला असलेले मेश्राम नंतर मराठीचे प्राध्यापक झाले. मुंबई विद्यापीठातून विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. […]
स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले “सहकार” मंत्री म्हणून बाळासाहेब भारदे यांनी केलेले कार्य संपूर्ण देशाने गौरविले. ते त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष झाले. ते मुरब्बी राजकारणी तर होतेच त्याचबरोबर ते गांधीवादी विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, सहकार क्षेत्रातील अग्रणी, पत्रकारही आणि कीर्तनकार होते. […]