श्रीकेक्षी यांनी अनेक जणांशी वाङ्मयीन वाद केले. ती एकप्रकारे वाङ्मय चळवळ ठरली होती. ‘ श्रीकेक्षी : एक वाङ्मयीन लेखसंग्रह ‘ ह्या पुस्तकांमध्ये त्यांनी केलेलं अनेक वाङ्मयीन वाद वाचावयास मिळतात. जे. कृष्णमूर्ती यांच्या विचारांबद्दल त्यांची वेगळी मते होती . परंतु दोघे एकत्र आल्यावर झालेला ‘ निशब्द संवाद ‘ पुणेकरांना माहित आहे. […]
एकीकडे गणितासारखा विषय हाताळणारे उमर खय्याम हे कवी म्हणून देखील परिचित होते. आपल्या जीवन काळात त्यांनी जवळपास हजारहून देखील जास्त रुबायत व श्लोक तयार केले आहेत. […]
उदय टिकेकर यांनी ‘शमिताभ’, ‘बर्फी’, ‘रईस’, ‘लाल सलाम’ या हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी काम केलं आहे. ‘तुझा माझा ब्रेक अप’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘कोई अपना सा’, ‘कसौटी जिंदगी की’ या मराठी-हिंदी मालिकेत उदय टिकेकर यांनी काम केले आहे. […]
बापू त्याचे काम त्याच्या पद्धतीने करत असतो तसे तो पत्रकार असल्यामुळे डोंबिवलीमध्ये त्याने अनेकांची ‘ वाजवली ‘ देखील आहे आहे ,अनेकांचा बुरखा फाडलाही आहे पण हे सगळे ‘ निस्पृहपणे आणि अत्यंत मनापासून . […]
गोव्यात आल्यानंतर त्यांनी ख्रिस्ती धर्माच्या विस्ताराचं ‘न भुतो..’ असं कार्य करून धर्मविस्तार केला. त्यामुळेच त्यांना पुढे संतपद (सेंट) हे पद बहाल करण्यात आलं व त्यांना ‘गोंयचो सायब’ हे बिरूदही लागू झालं. […]
१९६८च्या सुमारास प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांनी शिवाजी पार्कमध्ये कामत मेमोरियल क्रिकेट क्लबची स्थापना केली आणि प्रशिक्षक म्हणून स्वतःला वाहून घेतले. भारतीय क्रिकेटचा दर्जा वाढविण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले. केवळ सचिन तेंडुलकरच नव्हे, तर विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे, अजित आगरकर, रमेश पोवार, लालचंद राजपूत, बलविंदर संधू, सुलक्षण कुलकर्णी, समीर दिघे, पारस म्हांबरे असे त्यांचे अनेक खेळाडू पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले. […]
हॉकी फेडरेशन आर्थिक संकटांना सामोरे जात असतानाही कोणताही दबाव निर्माण न होऊ देता ध्यानचंद यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्व करून देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यानंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम होता. […]
शरद तळवलकर यांना स्टेजवर अभिनय करताना पाहणे म्हणजे पर्वणीच असे . त्यांच्या ‘ अप्पाजींची सेक्रेटरी ‘ या नाटकात तर त्यांनी इतकी धमाल केली होती की त्यांनी जे नाटक पाहिले आहे तो ते नाटक कधीच विसरू शकणार नाही. जवळजवळ ६० वर्षे ते अभिनय करत होते. […]
मुख्यमंत्री झाल्यानंतर अंतुले यांची कारकीर्द अवघ्या १८ महिन्यांची असली तरी, त्यांनी दूरदृष्टीचे अनेक निर्णय घेतले आणि ते घेतानासुद्धा गरीब माणसाला समोर ठेवले. […]
नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री ते केंद्रात मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. प्रचंड गरिबीतूनही त्यांनी केलेला प्रवास, त्यासाठी उपसलेले कष्ट आणि त्यांना मिळालेले यश थक्क करणारे आहे. […]