नवीन लेखन...

स्वदेशीचे प्रणेते राजीव दीक्षित

 

राजीव दीक्षित यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९६७ रोजी झाला.

राजीव दीक्षित यांनी स्वदेशी चळवळ बळकट केली, आपल्या अनेक व्याखानांतून त्यांनी स्वदेशी उत्पादनांबद्दल जनमानसात प्रचार केला व लोकांना स्वदेशी वापराचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. ते भारतीय स्वाभिमान आंदोलनाचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. राजीव भाई दीक्षित एक क्रांतिकारी होते. त्यांनी संपूर्ण भारतीय इतिहासाचा अभ्यास केला. ते स्वदेशी जागरणकर्ता होते. राजीव दीक्षित यांचा जन्म ३० नोव्हेंबर इ.स. १९६७ रोजी उत्तर प्रदेशातील, अलिगढ जिल्ह्यातील नाह गावात झाला. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण फिरोजाबाद जिल्ह्यात झाले. त्यांनी एम.टेक.ची पदवी आय.आय.टी कानपूरमधून प्राप्त केली आणि डॉक्टरेट फ्रान्समधून घेतली. भगतसिंग, उधमसिंह आणि चंद्रशेखर आझाद या क्रांतिकारकांच्या कार्याने ते प्रभावित झाले होते. महात्मा गांधीजींचे विचार वाचनात येताच त्यांच्यावर महात्मा गांधीजी यांचा प्रभवा पडला. ते अविवाहित होते. उच्च पगाराची नोकरी सोडून त्यांनी आपले आयुष्य स्वदेशीसाठी व्यतीत केले.

२० वर्षांच्या कालावधीत दीक्षित यांनी जवळपास १२ हजार पेक्षा अधिक व्याख्याने दिली. भारतात ५ हजार हून अधिक परदेशी कंपनींविरोधात त्यांनी स्वदेशीच्या आंदोलनाला सुरुवात केली. ९ जानेवारी २००९ रोजी त्यांनी भारत स्वाभिमान ट्रस्टचा कार्यभार स्वीकारला. भारताच्या ग्राहक माल क्षेत्रात परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रवेशास विरोध करणारी स्वातंत्र्य वाचवा चळवळीत राजीव दीक्षित यांचे मोठे योगदान आहे. या चळवळीद्वारे पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणाच्या दुष्परिणामांबाबत भारतीयांना जागृत करण्याचे कार्य या आंदोलनाद्वारे हाती घेण्यात आले. या कार्यात राजीव दीक्षित यांच्यासोबत डॉ. बनवारी लाल शर्मा यांसारखे प्रखर वक्ता यांनीसुद्धा देशभर दौरा करत चळवळीसाठी कार्य केले. यावेळी देशातील आर्थिक-सामाजिक विषयांवर जागृतीपर भाषणे देण्याचे कार्य दीक्षित यांनी पार पाडले. या दौर्यां मध्ये त्यांनी ध्वनिफितींचा प्रभावी वापर केला. स्वदेशीचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या ध्वनिफितींमुळे ते प्रसिद्ध झाले. त्यांनी व्याख्याने ध्वनिमुद्रित करून ती नंतर लोकांना उपलब्ध होतील याची परिपूर्ण काळजी घेतली होती.

भारताचा काळा पैसा विदेशी बँकांमध्ये अनधिकृतरित्या कसा फिरतो आहे, हे पण त्यांनी उघड करून दाखवले. स्वदेशीचा प्रचार गावोगावी जाऊन केला. जास्तीत जास्त लोकांनी स्वदेशी वस्तू वापरल्या तर देशात रोजगार निर्माण होईल व देशातला पैसा देशातच फिरत राहील हे तत्त्व त्यांनी लोकांसमोर मांडले. त्याचप्रमाणे भारतीयांनी गैर मार्गाने मिळवून स्विस बँकांमध्ये जमा केलेल्या सर्व काळ्या पैशाची माहिती उघड व्हावी, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. ही दोन कामे त्यांची विशेष उल्लेखनीय ठरली.

८ जानेवारी १९९२ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे पार पडलेल्या बैठकीत ‘आझादी बचाओ आंदोलन’ उभारण्यात आले. या आंदोलनाचे प्रमुख नेते बनवारीलाल शर्मा आणि राजीव दीक्षित पूर्वी भोपाळ गॅस दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अमेरिकन कंपनी युनियन कार्बाइड विरूद्ध लोक स्वराज्य अभियान राबवत होते. स्वातंत्र्य म्हणजे आर्थिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले गेले.

सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे जनप्रबोधन हे होते आणि त्यासाठी विपुल साहित्य आणि ऑडिओ व्हिडिओ कॅसेट तयार केली गेली. विविध ठिकाणी व्याख्याने, प्रशिक्षण शिबिरे इत्यादी सुरू करण्यात आली. स्वदेशी वस्तू स्थानिक पातळीवर मिळाव्यात म्हणून देशी स्टोअर उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. हळूहळू स्वातंत्र्य बचाव चळवळीचे काम लोकांच्या पसंतीस उतरु लागले. आज ११८ गावे पूर्णपणे स्वदेशी गावे म्हणून विकसित केली गेली आहेत. जिथे केवळ पेप्सी कोला, कोलगेट यासारख्या परदेशी कंपन्यांची उत्पादने विकली जात नाहीत तर शेतीही मूळ आणि रासायनिक खते आणि संकरित बियाण्याशिवाय केली जाते. चळवळीद्वारे चालवलेल्या स्वदेशी दुकानांना स्वानंद भंडार असेही म्हणतात. दरवर्षी या आंदोलनातर्फे ४-५ मोठे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. आझादी बचाओ आंदोलन संवाद या नावाने साप्ताहिक प्रसिद्ध केले जाते.

भारत एक कृषीप्रधान देश असल्याने या चळवळीने शेतीलाही आपले पहिले प्राधान्य मानले आहे. त्या अंतर्गत देशी पद्धतीने शेती करण्यास शेतकर्यांरना प्रोत्साहन दिले जाते. या चळवळीमध्ये रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खत, गांडुळे आणि शेणखत वगैरे वापरण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. चळवळीची दुसरी प्राथमिकता म्हणजे प्रत्येक गावात स्वदेशी वस्तूंचे उत्पादन. त्या अंतर्गत शासकीय अनुदान न घेता उत्कृष्ट गुणवत्ता व परवडणारी खादी करण्यात या आंदोलनाला यश आले आहे. स्वदेशी उत्पादनांचे वितरण हे तिसरे प्राधान्य आहे. चळवळीचे चौथे प्राधान्य म्हणजे स्वदेशी औषधांची जाहिरात करणे. भ्रष्टाचार, गरिबी, उपासमार, गुन्हेगारी तसेच शोषण मुक्त भारताच्या निर्माणासाठी योग गुरू बाबा रामदेव आणि राजीव दीक्षित यांनी एकत्रित काम केले.

बाबा रामदेव आणि राजीव दीक्षित यांनी ६३८३६५ एवढ्या गावांमध्ये आंदोलन पोहोचवण्यासाठी एका न्यासाची स्थापना केली. ५ जानेवारी २००९ रोजी दिल्लीमध्ये या न्यासाची नोंदणी करण्यात आली. भारताच्या निद्रावस्थेत गेलेल्या स्वाभिमानाला जागवण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर एक राष्ट्रव्यापी आंदोलन उभारण्याचे या न्यासाचे उद्दिष्ट आहे. भारत स्वाभिमान आंदोलनाद्वारे स्वदेशी वस्तूंच्या प्रचारासोबत परदेशी कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याचे काम करण्यात येते. भारत स्वाभिमान न्यासमध्ये राजीव दीक्षित यांच्यासोबत डॉ. जयदीप आर्य, राकेश कुमार व बहीण सुमन यांनी स्वदेशीच्या संकल्पनेशी प्रेरित होऊन संघटनेचा ताबा घेतला. अशाप्रकारे, चळवळीने जनप्रबोधनासाठी बरेच प्रयत्न केले आहेत.

भिलाईमध्ये व्याख्यानासाठी दौर्या,वर असताना, ३० नोव्हेंबर २०१० रोजी त्यांचे अचानक निधन झाले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला असे प्राथमिकरित्या समजण्यात आले होते, परंतु अजूनही त्यांच्या मृत्यूचे खरे कारण अज्ञात आहे, पण राजीव दीक्षित यांच्या निधनानंतर ही चळवळ उधळली गेली आणि कामगारांमध्ये फूट पडली. ही चळवळ राजीव दीक्षित आणि क्रांतिकारकांचे स्वप्न पूर्ण करण्यात अपयशी ठरली.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4163 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..