नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

परीस…

भीती नावाच्या प्रकाराची मनुष्याला अगदी लहान वयातच ओळख होत असते.” झोप लवकर, बागुलबुवा येईल बघ. “इथपासून सुरू झालेला आपल्यातील भितीचा प्रवास अगदी शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजेच मृत्यूशय्येवर पडल्यावर होणाऱ्या विलक्षण थररकापापर्यंत सुरूच असतो. भितीची कारणं वेगवेगळी असतील… प्रतिक्रिया सुद्धा वेगवेगळ्या असतील परंतु कोणतीही व्यक्ती घ्या कशाची ना कशाची भिती तिला सदैव सतावत असतेच.. लहानपणी मला अशीच बुरुजावरच्या […]

हृदयांतर

भाषांचे, उच्चारांचे, संकरांचे आपापले कप्पे असतात. शेजारची भिंत उडी मारून दुसऱ्या अंगणात पटकन घुसता येते, पण तेथे स्थिरावता येत नाही. आपली गांवे, गावकूस सांभाळणे आणि नंतर शक्य असेल तर उंबरा ओलांडणे हे श्रेयस्कर ! […]

मनं निर्ढावत चालली आहेत

हिरवी हिरवी रानं….निळं निळं आकाश…लख्खं लख्खं सूर्यप्रकाश पात्यापात्यावर चमकणारे दवबिंदू …उंच माळाच्या पोटाला अलगद बिलगून जाणारी चिमुकली पाय वाट. हलकेच झाडाला हेलकावून टाकणा-या वा-याच्या लहरी… झाडावर बगळ्यांची पांढरी नक्षी हे सारं असं मनात साठवलेलं होतं.. पूर्वी.परिसराची किती किती ओढ होती म्हणून सांगावी…. निसर्गाविषयी खूप आकर्षण वाटायचं.. तासनतास घालवायचे नदीच्या काठावर.. पिवळी- पिवळी कन्हेरीची फुलं गोळा करायची.. […]

निरंजन – भाग ५० – शुभ असावा लोभ…

लोभसपणा म्हणजे मोह होऊन जडलेले आकर्षण. कधी ते आकर्षण एखाद्या व्यक्तीवर होते तर कधी ते आकर्षण एखाद्या वस्तूचे असते. लोभ हा प्रत्येकाकडे आहे, पण तो इतरांच्या वस्तूवर कधीही नसावा, यावर रचलेली एक सुंदर बोधकथा… […]

अशक्य ते शक्य केलं कोरोनाबाबांनी

कोरोना जगभर फिरुन भारतात आला.त्यानी जनजीवन विस्कळीत केलं.आपण घरी बसून कंटाळलो. कधी एकदा लोकांमधे मिसळतो, असं म्हणता म्हणता बुडाला मोड फुटले. आपल्या देशात कधीही बंद नपडणारी मुंबईची लाईफलाईन पूर्ण बंद झाली. कार्यालये ओस पडली, मग ती सरकारी असोत की खाजगी. […]

तिसवाडी

४५१ वर्षांत तिसवाडी म्हणजेच इल्हास म्हणजेच १५४३ पर्यंतचे गोवा यामधे काय घडले याबद्दल आपल्याला माहितीच नाही. माहिती नाही म्हणून आपण विचारही करीत नाही. जे सांगितले गेले शिकविले गेले ते समजले, आता आपल चाललय ना व्यवस्थित मग सोडून देऊ अस आपण जगलो. पण आपल्या आक्रमक कर्त्यानी नोंदी लिहून ठेवल्या म्हणून काही गोष्टी आता आपल्याला जाणून घेता येतात. असल्या बऱ्याच नोंदी-गोष्टी नष्ट केल्या गेल्या हे ही जाणून घ्या. […]

पॉझिटिव्हिटी आणि सामान्य माणूस

आज अनेकजण कोरोनामुळे संघर्ष करत आहेत तर काहींनी आपली जवळची माणसे गमावली आहेत. खरेच आपण ज्यांनी माणसे गमावली आहेत त्यांना ‘ बी पॉझिटिव्ह ‘ हा सल्ला देऊ शकतो का? […]

निरंजन – भाग ४९ – घाव शिल्पकाराचे

एका खेडेगावामध्ये गणपती बाप्पांचं एक खूप जुन्या काळातील मंदिर होतं. सर्व बाजूंनी कुठे कुठे थोडसं मंदिराचं बांधकाम ढासळलेलं होतं. पण तरीही लोकांची गर्दी तिथे खूप होत असे. मंदिराच्या गाभार्‍यामध्ये श्री गणेशांची मूर्ती देखील तितकीच पूर्वीची…. एके दिवशी सर्व गावकऱ्यांनी मिळून गावामध्ये दरवर्षी होणाऱ्या सभेमध्ये, मुख्य पदाधिकाऱ्यांसमोर या मंदिराच्या बांधकामाबद्दल विषय मांडला. सर्वांनाच हा विषय योग्य वाटला. […]

सोशल मिडियाचा वापर सात्विकता वाढविण्यासाठी

सोशल मिडियाचा वापर करून देवस्थान व्यवस्थापन अशा अनेक प्रकारच्या सेवांचा निर्देश करून आपल्या भाविकांचा लक्षात आणून देऊ शकते, सांगू शकते. योजनाबद्ध आखणी करून अनेक भाविकांना सेवा देण्याची संधी प्राप्त करून देऊ शकते. भाविकांच्या सात्विक, सकारात्मक उर्जेमुळे देवस्थानातील सात्विकतेत भरच पडेल. […]

1 56 57 58 59 60 140
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..