नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

निरंजन – भाग ५२ – सवय

… गुरुदेव म्हणाले की, “मी रजईला गुंडाळले नाहीये, ही रजईच मला घट्ट धरून बसली आहे, मी किती प्रयत्न करतोय यातून स्वतःला सोडवण्याचा… पण मला सहज शक्य होत नाहीये. माझी ही इच्छा आहे की मी ही रजई स्वतःपासून मुक्त करू. […]

व्ही सी आर ते स्मार्टफोन… बालक पालक

बालक पालक हा चित्रपट बघताना प्रत्येकाला बरेच काही आठवत असेल जे पन्नाशीच्या पुढे आहेत विशेष करून ती जी पोरे म्हणा कार्टी म्हणा ते व्ही सी आर आणण्यापासून ते नीलचित्र म्हणजे ब्लु फिल्म बघताना ती संपेपर्यंतचे हावभाव पाहून प्रत्येकाला आपले बालपण आठवत असेल अर्थात स्कालर मंडळी सोडून पण कदाचित. मला आठवतंय जत्रेमध्ये दहा पैसे दिले की तंबूमध्ये […]

स्वतःशी नाते

स्वतःला अलीकडच्या काळात निवांत कधी भेटला आहात ? आणि  स्वतःचं  स्वतःशी असलेलं नातं इतक्यात कधी निरखून पाहिलंय? जन्मल्यापासून आपण फक्त आणि सदैव स्वतःच्याच सान्निध्यात असतो. स्वतःला इतर कोणाहीपेक्षा आपणच अधिक ओळखत असतो. पण हे “ओळखपत्र ” बाह्य असतं की अंतर्गत? वपु म्हणतात- ” ओळखपत्रासारखं विनोदी दुसरं काही नाही. आपण कसे आहोत हे दाखविण्यापेक्षा आपण कसे दिसतो हे ओळखपत्र दाखवतं.” असं तर आपल्याबाबतीत घडत नाही नं, हा प्रश्न एकदातरी स्वतःला विचारायलाच हवा. […]

तिसरी पिढी आणि त्यानंतरच्या भ्रष्टाचाराच्या पिढ्या

तुमचे पद मग ते कितीही मोठे असो पण ते पद काही मायक्रॉन विषाणू वाट लावू शकतो हे लक्षात घ्या. आपल्या पुढल्या पिढ्यासाठी तर थांबा असे संगितले पाहिजे, नाहीतर तिसऱ्या पिढीत किंवा त्यानंतर सत्यानाश निश्चित , विचार करा ? […]

संगीतजीवी आपण !

संगीताची ताकत आपल्याला आनंदी किंवा दुःखी करून जाते. काहीवेळा कार्यालयातून दमून-भागून घरी यावे आणि आरामखुर्चीत विसावत हाती कॉफीचा मग घ्यावा आणि कानांवर मस्त संगीत असावं, एवढंच मर्यादित सुख आपल्याला अपेक्षित असते. उत्तम संगीत आपल्या जीवनाच्या सगळ्या परिघांना (शारीरिक, मानसिक, भावनिक) स्पर्शून जाते. संगीत प्रत्येक सहृदय व्यक्तीच्या मनाचा एक अदृश्य भाग असते आणि सांस्कृतिक वास्तव तसेच वारसाही असते. […]

कृतज्ञता – एक कौटुंबिक संस्कार

कृतज्ञता  हे  मानवी स्वभावाचे एक अंग आहे.किंबहुना ते असायलाच  हवे. त्यावरून तो किती सुसंस्कृत आहे हे दिसून येते. तो एक महत्वाचा संस्कार आहे. काहीजणाकडे तो उपजत असतो. काही जणांकडे तो डोळसपणे आपल्या आजूबाजूला, समाजाकडे पहिल्याने येतो. त्यासाठी माणसाने सामाजिक भान ठेवायला हवे. पण कृतज्ञता संस्काराचे मूळ स्त्रोत आहे स्वत:चे कुटुंब. कुटुंबातील मोठ्या माणसांकडे तो असणे गरजेचे आहे. […]

प्रेरणा

“प्रेरणा”मग ती कशी कां असेना, अंतिम परिणाम ‘आत्मविश्वास’ हाच असायला हवा. म्हणतात नं, “स्वत:वर विश्वास असेल तर अंधारात देखील वाट सापडते.” […]

मानवतेचे दूत

कोरोना नावाच्या दहशतीने आपले २०२० हे वर्ष गिळंकृत केलेले आहेच पण आता २०२१ ही त्याच्या कचाट्यातून सुटताना दिसत नाही. शतकातून एखाद्या येणाऱ्या या महामारीने आपल्या जगाला तीन प्रकारे उध्वस्त करण्याचे आरंभले आहे. […]

अरे संसार संसार

आपले आयुष्य , संसार सुरु झाला की ह्या पायवाटा नि रस्ते पार एकमेकात अडकतात आणि गुंततात आणि तो गुंता इतका वाढतो की तो कोर्टाच्या दारात नेऊन ठेवतो तर कधी आत्महत्या किंवा आणखी काहीव्यसने . […]

वृत्ती, प्रवृत्ती, आकृती, विकृती

आज अनेकजण कोरोनामुळे संघर्ष करत आहेत तर काहींनी आपली जवळची माणसे गमावली आहेत. खरेच आपण ज्यांनी माणसे गमावली आहेत त्यांना ‘ बी पॉझिटिव्ह ‘ हा सल्ला देऊ शकतो का? […]

1 48 49 50 51 52 133
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..