नवीन लेखन...

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील पर्यटनस्थळांचा परिचय – वाचकांच्या नजरेतून…

देवगडातल्या ‘गिर्ये’ गांवचं ‘श्री देव रामेश्वर मंदिर’

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील ‘गिर्ये’ हे एक दक्षिण कोकणातील कोणत्याही गावाप्रमाणे एक निसर्गसंपन्न गाव. सुप्रसिद्ध ‘विजयदुर्ग’ किल्ला याच ‘गिर्ये’ गावात वसला आहे व त्याचे आदिलशाही अम्मलातले नाव ‘घेरिया’ हा ‘गिर्ये’चाच अपभ्रंश आहे ( ‘गिर्ये’च घेरिया झालं की ‘घेरिया’चं गिर्ये यात नेहेमीप्रमाणे तज्ञांत मतभेद आहेत. आपला तो विषय नाही.). आता इतक्या वर्षानंतर ‘विजयदुर्ग’ हे वेगळे महसुली गाव […]

मालवण देवबागचं अनोखं  ‘त्सुनामी आयलंड’..!!

दोन दिवसांपूर्वी गांवाकडे आलोय सिंधुदुर्गात..सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत प्रचंड गरम..! घरात राहणं कठीण..! रात्री मात्र पांघरूणाशिवाय झोप यायची नाही येवढी छान थंड हवा..! काल घरातील सर्वांना घेऊन बहुचर्चित मालवण, तारकरली, देवबागला गेलो होतो..माझ्यासारख्या कोकणी माणसाला समुद्राचं कौतुक ते काय? परंतू देवबागच्या समुद्रकिनाऱ्यावरील ‘त्सुनामी आयलंड’ बघण्याची उत्सुकता होती.. ‘त्सुनामी आयलंड’ हा एक निसर्गाचा चमत्कार आहे..या […]

गोष्ट धारावीच्या ‘काळ्या किल्ल्या’ची – (भाग दोन)

या कथेच्या पहिल्या भागात बघितलेला ‘काळा किल्ला’ जरी भौगोलिक दृष्टीने धारावीत असला तरी ‘धारावी किल्ला’ या नावाचा किल्ला हा चक्क ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे असल्याचा उल्लेख सापडतो. या ठिकाणी ‘धारावी देवी’ असल्याचाही उल्लेख आहे. आता भाईंदरच्या या किल्ल्याचे नाव देवीवरून पडले की देवीवरून किल्ल्याचे नाव पाडले हे समजणे कठीण आहे. ‘काळा किल्ल्या’चे कागदोपत्री नाव ‘रीवाचा किल्ला’ […]

१५० वर्षाची परंपरा असलेले नागपूरचे मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय

कावळ्याचा रंग कोणता ? असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर प्रश्न विचारणाऱ्याकडे आपण नक्कीच प्रश्नार्थक नजरेने पाहू… ‘काळा’ रंग असे उत्तर देऊन मोकळे होवू.. कावळ्याचा रंग काळाच असतो मात्र पांढऱ्या रंगाचाही ‘कावळा’ असतो आणि तो आपल्याला नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या पक्षी विभागात पाहायला मिळतो. पांढरा कावळा हा फक्त नागपूरातील मध्यवर्ती संग्रहालयातच आहे. अनेकाविध पुरातन वस्तु, शिल्पकला, चित्रकला, […]

चार धाम

काही वर्षापूर्वी, ब्रह्मविद्या साधना मंडळाच्याबरोबर सिद्धटेकचा गणपति व भीमा शंकर ही ठिकाणे बघण्यासाठी एक ट्रीप आयोजित केली होती. या ट्रीपबरोबरच आमचे ‘केदारनाथ’ सोडून इतर सर्व ज्योतिर्लिंग पाहून झाली होती, विनासायास झाली होती. तेव्हा पासून माझ्या मनात राहिलेले ज्योतिर्लिंग, केदारनाथ पाहण्याची खूप उत्सुकता होती. काही कारणांसाठी शशीचा यास ठाम नकार होता. केवळ आपापसात वाद नकोत म्हणून मी तिथे जाण्याचा तेव्हा हट्ट केला नाही. […]

गोष्ट धारावीच्या ‘काळ्या किल्ल्या’ची – (भाग एक )

धारावी. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी..या आक्राळ विक्राळ पसरलेल्या झोपडपट्टीच्या एका कोपऱ्यात मुंबईच्या इतिहासाचा मूक साक्षीदार असणारा एक ऐतिहासीक किल्ला आपलं अस्तित्व टिकवायला धडपडतोय. या किल्ल्याची बहुसंख्य ‘मुंबई आमची, नाही कोनाच्या बापाची’ म्हणणाऱ्यांना खबरही नसेल हे निश्चित..! इसवी सन १७३७ मध्ये उभारलेल्या या किल्ल्याचं नांव ‘फोर्ट रिवा किंवा रेवा’ असं असलं तरी पूर्वीपासून हा किल्ला ‘काळा किल्ला’ […]

मुंबईचा ‘फोर्ट’..

मुंबईच्या दक्षिण टोकावर असलेला ‘फोर्ट’ एरिया ज्याने पाहिला नाही त्यानं मुंबई पाहिली नाही असं म्हणायला हरकत नाही..किंबहूना, मुंबई हे संबोधन मुख्यत्वेकरून याच विभागाला लागू होतं असं म्हटलं तरी चुकणार नाही..फोर्टातले ते प्रशस्त रस्ते आणि फुटपाथ, त्या ब्रिटीशकालीन भव्य आणि देखण्या इमारती, प्रत्येक इमारतीला असलेला घाटदार घुमट वा उंचं मनोरा याची भुरळ न पडणारा विरळाच..! हा सारा […]

खऱ्या शिवथरघळीच्या शोध

छ.शिवाजी महाराजांच्याही पत्रातून समर्थ रामदास स्वामींचे स्थान स्पष्ट सिवतर तालुका,मौजे पारमाची,कोंड नलवडा, ‘नलावडे कोंड’बाबतचे दूर्लक्ष वादाचे कारण समर्थ रामदास स्वामी यांच्या सर्वग्रंथलेखनाची जागा कोणती याबाबत  1 जानेवारीपासून सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या खऱ्या शिवथरघळीच्या शोधाच्या दाव्यापासून सुरू झालेल्या दुमतानंतर आता संशोधनादरम्यान समर्थभक्त शंकर श्रीकृष्ण देव यांनी नलावडे कोंड याठिकाणी समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य असल्याच्या स्पष्ट उल्लेखाकडे केलेले […]

कर्दळीवन परिक्रमा : एक प्रत्येकाने घेण्यासारखा अनुभव

प्रत्यक्ष परिक्रमा एकूण २४ कि.मि.ची आहे..या २४ कि.मि. प्रवासात केवळ आपले पाय हेच वाहन असते..इथे चालण्याला अत्यंत खडतर असा हा प्रवास आपल्या शारिरीक व मानसीक कणखरतेची परिक्षा घेणारा आहे.. […]

इतिहास पुसलेलं नांदेड

नंदीग्राम हे नाव नांदेडला असो अथवा नसो, हे भरताचं आजोळ असो किंवा नसो नि ते सात हजार वर्षाचं पुराणं असो वा नसो; पण ते किमान 2 हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होतं याचे मात्र पुरावे आहेत. वर्‍हाडातील वत्सगुल्म (आजचं वाशीम) येथे सापडलेल्या चौथ्या शतकातील वाकाटक नृपती याने दिलेल्या ताम्रपत्रात गोदावरीच्या इतर तीरावरील नंदीतट हे गाव ब्राह्यणांना अग्रहार म्हणून […]

1 27 28 29 30 31 36
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..