नवीन लेखन...

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील पर्यटनस्थळांचा परिचय – वाचकांच्या नजरेतून…

युरोपायण चौथा दिवस – ब्रुसेल्स

पँरीसहून सुमारे तीन तासांनी सीमा ओलांडुन आम्ही ब्रुसेल्स या बेल्जीयमच्या राजधानीत पोहोचलो. दोन तीन शतकाहूनही पूर्वीच्या गॉथिक आर्कीटेक्चरच्या बुलंद वास्तू, त्यांचे टोकदार कळस, जागोजागी कथा पुराणातल्या योध्यांचे पुतळे या सर्वांविषयी योगेश भरभरुन माहिती देत होता. जर्मन, फ्रेंच आणि डच भाषा बोलली जाणारे ब्रुसेल्स हे एके काळी युरोपच्या व्यापाराच्या केंद्रस्थानी होते. अॉलेंपिक ब्रुसेल्समधे झाल होत तेंव्हाची अणूरेणूची […]

योगरूपी जगदंबा …… योगेश्वरी…

आंबेजोगाई शहराच्या मधोमध वाहणाऱ्या ‘जयंती’ नदीच्या पश्चिम तीरावर योगेश्वरी देवीच देऊळ पुराणकाळापासून अस्तित्वात आहे. मंदिराची रचना हेमाड़पंथी स्वरूपाची असून ते उत्तराभिमुख आहे व मंदिराला मोठा दगड़ी कोट आहे. मंदिराला एक मुख्य शिखर असून चार लहान शिखरं आहेत. मंदिराच्या सभागृहात मोठमोठे दगड़ी खांब असून त्यावर बारीक खोदीव काम केलेले आहे. आत तसा फारसा नैसर्गिक उजेड नसल्याने गाभाऱ्यातल्या समईच्या मंद प्रकाशात देवीचं दर्शन होतं. देवीचं मुख काहीसं उग्र भासतं. […]

युरोपायण – तिसरा दिवस – पँरीस- स्पर्श

हीथ्रो, लंडन येथील अँट्रीयम हॉटेल मधला दोन रात्रींचा मुक्काम आटोपून तिस-यादिवशी सकाळी युरोस्टार, समुद्रातील बोगद्यातूत जाणा-या, ट्रेननी पँरीसमधे अंदाजे साडे अकरा वाचता दाखल झालो. युरोस्टारच्या शेवटच्या स्टेशनला उतरुन कोचनी तडक जेवणासाठी वेलकम इंडीया या हॉटेलमधे गेलो. जाताना वाटेतच पँरीस शहराबद्दल काही निरीक्षणे करत गेलो. लंडनच्या तुलनेत शहरात प्रवेश करतानाचा वाटेत दिसलेला भाग कंजसटेड वाटला. काही भाग […]

युरोपायण – दुसरा दिवस – लंडन

कालच्याच मर्सिर्डिस बसनी आज लंडनच्या सीटी टूरला सुरुवात झाली. दूतर्फा दिसणा-या इमारतीतील घरबांधणीची वैशिष्ठ्य सर्वांनाच आकर्षित करत वाह व्वा मिळवात होती. तपकिरी रंगाच्या विटांच्या बांधकामावर पांढ-या शुभ्र रंगाच्या आयताकृती खिडक्या, दरवाजे आणि स्वच्छ काचा हे सर्व एकत्रित फारच उठावदार दिसत होते. या इमारती फार टोलेजंग नाहीत परंतु लांबवर पसरलेल्या आहेत. बाल्कनी आत घेउन रुम वा जागा […]

व्हिएतनाम – एक बेधडक राष्ट्र – भाग १

व्हिएतनाम हे दक्षिण पूर्व आशिया खंडातील एक राष्ट्र. एकेकाळी चीन, कधी फ्रान्स तर कधी अमेरिका यांच्या अधिपत्याखाली असलेले राष्ट्र.. ह्यांच्या खुणा आजही आपल्याला पहायला मिळतात. तर मागच्या दोन दशकापासून जगावर आपला ठसा उमटवण्याच्या दृष्टीने पाऊल टाकणाऱ्या ह्या देशाला तुम्ही जर स्वतःहून भेट देणार असाल तर काय काय करावे याचे माझ्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन आणि अश्या मी केलेल्या काही भ्रमंतीचे वर्णन येत्या काही भागात मी करणार आहे. […]

विमानप्रवासाचे विज्ञान

विमानप्रवास आता सामान्य माणसाच्या आवाक्यात आला आहे. विमानात बसण्याची पूर्वतयारी म्हणजे तारीख ठरवून तिकीट काढणे अशी बहुतेकांची समजूत असते. ‘मला विमान चालवायचे नाही. त्याच्या संबंधातील तांत्रिक गोष्टींचा मला काय उपयोग?’ असा प्रश्न रास्त आहे. पण यामागील विज्ञानासंदर्भात एक प्रश्न विचारून फक्त सुरुवात तर करून बघा? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, भूगोल वगैरे बाबतीतील कुतुहल वाढत जाईल. जसजशी उत्तरे मिळतील तसतसे प्रश्न वाढतील. करूया सुरुवात? ‘विमानप्रवास सुरक्षित आहे का?’ हा काहींचा पहिला प्रश्न असू शकतो. […]

सगुणस्वरूप विघ्नहर्ता – बालदिगंबर गणेश

परंपरेने गणेशाचं हे लोकप्रिय सगुणस्वरूप फार श्रद्धेनं जपलेलं आहे. असं असलं तरी गणपतीपूजनाला खरा राजाश्रय लाभला, तो पेशवे अधिकारपदावर आल्यावर. पेशवे गाणपत्य असल्याने त्यांनी आणि त्यांच्या सरदारांनी गावोगाव असलेल्या गणपतीच्या देवळांचं वैभव वृद्धिंगत केलं. अष्टविनायकांच्या स्थानांना प्रतिष्ठा आली. असंच एक पुरातन स्थान आहे कर्जत तालुक्यातल्या ‘कडाव’ला. इथल्या बालदिगंबर गणेशाचे देऊळ फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. […]

नवसाला पावणारा .. ‘रेडी’चा व्दिभुजा गणेश

महाराष्ट्राच्या सीमेजवळच्या … तळकोकणातल्या रेडीचा व्दिभुजा गणेश दशक्रोशीत फार श्रद्धेचं स्थान ठेऊन आहे. रेडी प्रसिद्ध आहे ते इथल्या लोहाच्या खाणींसाठी. रेडीच्या एका बाजूला तेरेखोलचा किल्ला-खाडी तर अलीकडच्या बाजूला महाराजांचा ऐतिहासिक यशवंतगड. सावंतांचा अंमल देखील यशवंतगड आणि या परिसरावर होता. गावात माऊलीचं … नवदुर्गेचं अशी दोन देवळं देखील आहेत. रेडी-तेरेखोल ही दोन गावं महाराष्ट्राच्या गोव्याच्या सीमेवर वसली असून अरबी समुद्राच्या तटावर आहेत. […]

शिल्पांकित गणराय

हंपी आणि बदामी ही दोन वैभवशाली गावं आपल्या असामान्य वास्तुशास्त्र आणि शिल्पकलेसाठी गेली शेकडो वर्ष दिगंत कीर्ती बाळगून आहेत. तुंगभद्रा नदीकाठावर वसलेलं ‘हंपी’ त्यावेळच्या विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचं ठिकाण होतं. याच परिसरातला बदामीचा ‘वतापी’ गणरायही गेली शेकडो वर्ष भारतीय धार्मिक मनाला भावलेला आहे. ‘बदामी’ हे अगोदर ‘वतापी’ म्हणून ओळखली जायचं. परंपरेने वतापी गणेशाच्या ब-याच कथा सांगितल्या आहेत. […]

युरोपायण – पहिला दिवस

मलेशिया, गेंटींग, थायलंड, पटाया, सींगापूर ही आम्हा मध्यमवार्गीयांच्या स्वप्नातील वारी २००७ मधे उरकली आणि अंतरराष्ट्रीय प्रवासाला चटावलो. शारजा-दुबई तर द्वीवार्षिक वहीवाटीनी आमचीच वाटायला लागलीत. मधेमधे भारतातले बरेचसे भाग पहात पहात जवळपासचे भूतान वगैरेही पादाक्रांत केल. नवीन एखाद्या डेस्टीनेशनचा विचार करता करता, अजुन खूप जग बघायच राह्यल असल तरी अचानक सिकंदर सारखा उगाचच जग जिंकण्याच्या ईर्षेनी पेटुन उठलो आणि पत्नीला सरप्राइज देण्यासाठी आता युरोपवर स्वारी करायची असा मनसुबा जाहीर केला. […]

1 20 21 22 23 24 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..