नवीन लेखन...

सर्व प्रकारच्या क्रिडा, खेळ यावरील लेखन

नोव्हेंबर १३ : ग्रीक विद्वान आणि वॉर्नची ‘गाबा’गिरी

नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारणार्‍या पहिल्यावहिल्या कसोटी कर्णधाराचा जन्म या दिवशी १८५८ मध्ये लंडनच्या केन्सिंग्टनमध्ये झाला. मैदान आणि एकेका खेळाडूचे ऋणानुबंध अत्यंत अनोखे असतात. शेन वॉर्न आणि गाबा मैदानाचा संबंधही असाच आहे.
[…]

नोव्हेंबर ११ : रुसी मोदी आणि रॉय फ्रेड्रिक्स

अखेरच्या पाच सामन्यांमधील त्यांचा धावांचा योग १००८ एवढा येतो. पाच सामन्यांमधून हजाराच्यावर धावांचा रुसींचा हा विक्रम चाळीस वर्षांहून अधिक काळ टिकला. वयाची उणीपुरी २० वर्षेही झालेली नसताना त्यांनी हा पराक्रम केला हे विशेषच ! समकालीन सलामीचे फलंदाज चेंडू अडवून काढण्यात आणि शक्य तितके चेंडू सोडून देण्यात धन्यता मानत असताना आणि मधल्या फळीतील फलंदाज डावाच्या संयमी बांधणीला महत्त्व देत असताना रॉय यांनी आक्रमक फलंदाजी करीत आपला वेगळेपणा सिद्ध केला.
[…]

नोव्हेंबर १० : आफ्रिकेचा पुनर्प्रवेश आणि बांग्लादेशचे आगमन

२१ वर्षांच्या खंडानंतर दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्रीय क्रिकेट संघ अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना या दिवशी खेळता झाला. बेसिल डी-ऑलिव्हेरा प्रकरणानंतर दक्षिण आफ्रिकेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगताने वाळीत टाकले होते. आफ्रिकी राज्यकर्त्यांच्या वर्णद्वेषी धोरणाचा हा परिपाक होता. दक्षिण आफ्रिकेच्या या पुनरागमनानंतर ९ वर्षांनी बांग्लादेश हा भारताचा शेजारी आंतरराष्ट्रीय कसोटीविश्वात प्रवेश करता झाला.
[…]

ऑक्टोबर ३१ – पहिला नायक आणि पहिला त्रिक्रम व सुनीलचे नवल

१८९५ : भारताच्या पहिल्या कसोटी कर्णधाराचा जन्म. कर्नल कोट्टरी कंकरिया नायडू ड्राईव्ह करण्यात अतिशय पटाईत फलंदाज आणि उपयुक्त मंदगती गोलंदाज होते.
१९८७ : विश्वचषक स्पर्धेतील पहिला त्रिक्रम. आपल्या सहाव्या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर केन रुदरफोर्ड, इअन स्मिथ आणि इवेन चॅटफिल्डला बाद करीत भारताच्या चेतन शर्माने त्रिक्रम साधला. […]

नोव्हेंबर ०१ – व्हीव्हीएस आणि शेर्विन कॅम्प्बेल

१९७४ : खूप खूप खास फलंदाजाचा जन्म. १३-१४ मार्च २००१ या दोन दिवसांत वेरिगुप्पा वेंकट साई लक्ष्मणचे आयुष्य पार बदलून गेले.

१९७० : शेर्विन कॅम्प्बेलचा जन्म. वेस्ट इंडीज क्रिकेट सलामीच्या भरवशाच्या जोडीच्या शोधात असूनही शेर्विनला संधी का मिळाली नाही हा अनुत्तरित प्रश्न आहे. […]

नोव्हेंबर ०३ – बिशनसिंग बेदीची बहाली आणि सर्वात ‘लांब’ डाव

१९७८ : आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासात एखाद्या संघाने सामना सुरू ठेवण्यास नकार दिल्याने एकदिवसीय सामना बहाल झाल्याची पहिली घटना.

१९९९ : प्रथमश्रेणीतील सर्वात लांब डावाची अखेर. […]

नोव्हेंबर ०४ – मस्तवाल रॉडनी मार्श आणि पदार्पणातच कर्णधार

१९४७ : ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा एक उत्तम मासला असलेल्या रॉड मार्शचा जन्म.

१९६८ : पदार्पणातच देशाचे नेतृत्व करावयास लागणे ही झोप लागू न देणारी जबाबदारी आहे पण आज जन्मलेल्या ली जर्मोनला पदार्पणाच्या सामन्यातच न्यूझीलंडचे नेतृत्व करावे लागले. […]

नोव्हेंबर ०५ – एडी पेंटर आणि आडवा आलेला मलिक

१९०१ : एडी पेंटरचा जन्म. इंग्लंडकडून किमान दहा कसोटी डाव खेळणार्‍यांमध्ये फक्त हर्बर्ट सटक्लिफची सरासरी (६०.७३) त्याच्यापेक्षा (५९.२३) जास्त आहे.

१९९४ : ५ नोव्हेंबर १९९४ हा ऑस्ट्रेलियनांसाठी तडफड वाढविणारा एक दिवस ठरला. […]

नोव्हेंबर ०६ – स्लॅटर स्लॉटर आणि कामिकाझे किड

१९९९ : मायकेल स्लॅटरचा धमाका. ब्रिस्बेन कसोटीत पाकिस्तानच्या ३६७ धावांना प्रत्युत्तर देताना कुणीही सावधच सुरुवात केली असती पण मायकेल स्लॅटरने वेगवान १६९ धावा काढल्या आणि ग्रेग ब्लिवेटसोबत पहिल्या जोडीसाठी २६९ धावा रचल्या.

१९५६ : पश्चिम ऑस्ट्रेलियात ग्रॅएम वूडचा जन्म. या डावखुर्‍या सलामीवीराला ‘कामिकाझे किड’ (स्वतःला गोत्यात आणणार्‍या गोष्टी स्वतःहून करणारा मुलगा) असे संबोधले जाते. […]

1 23 24 25 26 27 36
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..