क्रिकेट फ्लॅशबॅक
सप्टेंबर २९ – हुकमी कारकून आणि फिरक्या गिब्ज
२९ सप्टेंबर १९४१ रोजी “युद्धासाठी खास बोलविण्यात आलेल्या बँक कारकुनाचा” जन्म झाला आणि २९ सप्टेंबर १९४१ रोजी कसोट्यांमध्ये सर्वप्रथम ३०० बळी घेणार्या फिरकीपटूचा जन्म झाला.
[…]
ऑक्टोबर ०१ – नादुरुस्त सईद आणि तेरावी बरोबरी
१ ऑक्टोबर १९३७ रोजी जन्म झालेला सईद अहमद त्याची कसोटी सरासरी ४०.४१ एवढी असूनही नको त्या कारणांसाठी प्रसिद्ध झाला आहे आणि चर्चेत राहिला आहे.
[…]
सप्टेंबर ३० – वादग्रस्त ‘केस’ आणि अर्नी जोन्स
वादग्रस्त ‘केस’ आणि अर्नी जोन्स
[…]
ऑक्टोबर ०२ – पोंद्या वॉर्नर आणि बुधी कुंदरन
ग्रॅन्ड ओल्ड मॅन ऑफ इंग्लिश क्रिकेट किंवा ‘पोंद्या’ या नावाने ओळखल्या जाणार्या सर पेलहॅम फ्रान्सिस वॉर्नरचा जन्म २ ऑक्टोबर १८७३ रोजी त्रिनिदादमध्ये झाला. २ ऑक्टोबर १९३९ रोजी कर्नाटकातील मंगलोरजवळील मल्कीत बुधिसागर कृष्णाप्पा कुंदरन यांचा जन्म झाला.
[…]
ऑक्टोबर ०३ – रे लिंड्वॉल – एक झंझावात
३ ऑक्टोबर १९२१ रोजी रेमंड रसेल लिंड्वॉलचा जन्म झाला. संक्षिप्तपणे रे लिंड्वॉल म्हणून ओळखला जाणारा रेमंड हा सार्वकालिक द्रुतगती गोलंदाजांच्या ताफ्यातील सर्वोत्तमांपैकी एक म्हणून सार्थपणे क्रिकेटिहासात आपली जागा कमावून आहे.
[…]
ऑक्टोबर ०४ – ‘रंगीत’ बेसिल आणि बूम बूम १००
पाव शतकभर न सुटलेला एक प्रश्न निर्माण करणार्या एका प्रतिभावान खेळाडूचा जन्म ४ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. बेसिल लुईस डि ऑलिव्हेराचा जन्म या दिवशी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये झाला.
[…]
सप्टेंबर २७ – ‘झडप्या’ ब्रेन्डन मॅक्कलम आणि हेमिंग्जचे ‘दाही’ बळी
इंडीयन प्रिमिअर लीगचा पहिलाच सामना आपल्या नेत्रदीपक फटकेबाजीने गाजविणार्या ब्रेन्डन बॅरी मॅक्कलमचा जन्म २७ सप्टेंबर १९८१ रोजी ओटागोत झाला. अत्यंत स्फोटक फळकूटवीर असण्याबरोबरच तो एक चपळ यष्टीरक्षकही आहे.
ब्रेन्डन मॅक्कलमच्या जन्मानंतर बरोबर एका वर्षाने कॅरिबिअन बेटांवरील जमैकातील किंग्स्टन शहरातील सबिना पार्क मैदानावर एडी हेमिंग्जने एकाच प्रथमश्रेणी डावात दाहीच्या दाही गडी बाद करण्याचा पराक्रम केला.
[…]
सप्टेंबर २४ – जिमी अमरनाथ आणि विसविशीत विश्वविजय
भारतीय संघातून क्रिकेट खेळणे ही ज्यांच्या घराण्याची एके काळी मिराशी बनली होती (असे म्हणण्यासारखी परिस्थिती होती) त्या घराण्यात २४ सप्टेंबर १९५० रोजी मोहिंदरचा जन्म झाला. ‘जिमी’ हे त्याचं लाडाचं नाव. जिमीचे वडील लालाजी आणि जिमीचा भाऊ सुरिंदर हेही कसोटीपटू होते. राजिंदर हा जिमीचा आणखी एक भाऊ. तो प्रथमश्रेणी खेळला.
[…]
सप्टेंबर २५ – ‘हॅन्सी’ क्रोनिए आणि मॅडम क्लेअर
२५ सप्टेंबर १९६९ रोजी एका दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचा जन्म झाला. वेसल जोहान्नेस ‘हॅन्सी’ क्रोनिए हे त्याचं नाव. सामन्यांच्या निकालाची पूर्वनिश्चिती करणार्या प्रवृत्तींच्या अस्तित्वाचा एक थेट आणि विश्वासार्ह पुरावा हॅन्सीकडून सर्वप्रथम आला होता.
२५ सप्टेंबर १९७५ रोजी समंथा क्लेअर टेलरचा जन्म झाला. आपल्या फलंदाजीने समग्र क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेणार्या क्लेअरच्या नावावर काही उल्लेखनीय विक्रम आहेत.
[…]
