जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला यश मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्नांची गरज असते. सफलता ही अनेक प्रयत्न आणि त्यानंतर होणाऱ्या परीक्षेतून मिळत असते. सहजासहजी प्राप्त होणारा मार्ग हा आपल्याला आपल्या ध्येयाकडे कधीही पोहोचवू शकत नाही आणि ध्येयाकडे नेणारी योग्य ती वाटचाल ही संकट विरहित असू शकत नाही. […]
भगवान श्रीवैकुंठनाथ श्रीहरीच्या विविध अवयवांचे अलौकिक वैभव वर्णन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज या श्लोकांमध्ये भगवंताच्या गुडघ्यांचे वर्णन करीत आहेत. […]
भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे वर्णन केल्यानंतर आता थोडे वर सरकत आचार्य श्री भगवंताच्या पिंढऱ्यांचे म्हणजे घोट्यापासून गुडघ्यापर्यंतच्या भागाचे वर्णन करीत आहे. या भागाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे देवी लक्ष्मी सतत या भागाला आपल्या हस्त कमलाने हळूवार चुरत असते. त्यामुळे त्यापासूनच आरंभ होतो. आचार्य श्री म्हणतात, […]
मी मलाच अनेक वेळा प्रश्र केला “मी कोण आहे”? बरेच आढेवेढे घेऊन त्याने उत्तर दिले ‘अरे तुच तो तु स्वतः ओळखले नाहिये का तुला तुच . नाही ना मी आपला मीच…. माझं नाव भास्कर म्हणजे मी भास्कर……. […]
भगवान श्री वैकुंठनाथांच्या अनुपमेय चरणतलाचे, चरणांगुलींचे मनोहारी वर्णन केल्यानंतर आता आचार्यश्री त्या चरणांच्या वरच्या भागाचे वर्णन करीत आहेत. बोटां पासून घोट्यापर्यंत मध्ये जो उंचवटा आहे त्याचे वर्णन त्यांनी प्रस्तुत श्लोकात केलेले आहे. […]
भगवान श्रीविष्णूच्या चरणकमलांचे वर्णन करताना, त्यातही त्या चरणांगुलींना असणाऱ्या नयनमनोहर नखांचे वर्णन करताना आचार्य श्रींची प्रतिभा एखाद्या महाकवीला लाजवेल असे अलौकिक वर्णन करीत आहे. […]