पुरातन काळातील ऋषीमुनींची, धर्म संस्थापकांची आणि विचारवंतांची अशी कळकळीची इच्छा होती की सर्व प्रजा ज्ञानी, विद्वान, सुसंस्कृत, सुशील, नैतिक मूल्यांचे पालन करणारी, आरोग्यदायी वगैरे सदगुणांनी परिपूर्ण असावी. म्हणजे त्यांची संततीही तशीच गुणवान निपजावी. हे उद्दिष्ठ साधण्यासाठी त्यांनी सात्विक दिनचर्या सांगितली, धर्माचरणे सांगितली. धार्मिक ग्रंथरचना केल्या, धर्म संस्थापिले, ईश्वर, आत्मा, जन्म मृत्यूचे फेरे, मोक्ष, पुनर्जन्म, बर्यावाईट कर्मांची गोडकडू फळे, मृत्युनंतर सुख किंवा शिक्षा वगैरे संकल्पना रूढ केल्या. […]
एका ऋचा ( श्लोक ) मध्ये कितीतरी गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. ह्यांचा सखोल आभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल कि त्या काळातील ऋषी मुनि प्रत्येक विषयाचा किती साकल्याने विचार करीत होतें. […]
श्रीविष्णूच्या या दशावतारात श्रीविष्णूचे अस्तित्व असावयासच हवे. कोणत्या स्वरूपात श्रीविष्णू, या दहाही अवतारात सामावलेले असतील? साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या सजीवात आनुवंशिक तत्व म्हणजे जेनेटिक मटेरीअल अस्तित्वात होते. त्याच्यातच उत्क्रांती होतहोत कोट्यवधी प्रजाती उत्क्रांत झाल्या. शेवटी मानव अवतारातहि तेच उत्क्रांत आनुवंशिक तत्व अस्तित्वात आहे. याचा विज्ञानीय अर्थ असा की आनुवंशिक तत्वच, श्रीविष्णूच्या दहाही अवतारात श्रीविष्णूचे प्रतिनिधित्व करते. याचा सरळ सोपा अर्थ म्हणजे, आनुवंशिक तत्व म्हणजेच श्रीविष्णू. अध्यात्मात बुडालेले विज्ञान !!! […]
भगवतगीता या, सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या महान ग्रंथावर अनेक विद्वानांनी भाष्य केले आहे. गीतेच्या १८ अध्यायात वेदोपनिशदांचे तत्वज्ञान सामावलेले आहे. सांख्ययोग म्हणजे गीतेचे सार, गीतेचा अर्क समजला जातो. […]
शरीर रचनेचा अभ्यास करताना बऱ्याच गोष्टी खूप मजेदार आणि ज्ञान देणाऱ्या वाटल्या. ह्या जगांत अनेक घटना घडत असतात. त्या स्थिर वा हलचालीयुक्त दिसून येतात. आपल्या शरीरांत देखील तशाच गोष्टी होत असतात. कदाचित् त्याचे रंग रुप वेगळे असतील. परंतु जगातील घडणाऱ्या आणि देहामध्ये घडणाऱ्या घटनामध्ये परिणामाच्या दृष्टीने विलक्षण साम्य असते. […]
प्रत्येक व्यक्तीचे अध्यात्मिक ध्येय असते की तिने त्या चैतन्यमय ईश्वरी शक्तीचे अस्तित्त्व जाणावे, अनुभवावे. कुणाला ईश्वर भेटला वा दिसला, ह्याची खऱ्या अर्थाने विचारवंताना देखील सत्यता पटलेली नाही. परंतु अनेक प्रसंगातून मात्र त्याच्या योजनेची शक्तीची कुशलतेची जाणीव निश्चित झालेली आहे. […]
गुरुगीतेमध्ये महेशानी अंबेला सांगितले, “जीवीत तेही समर्पिजे” म्हणजे सर्वस्व जो तुझा जीवात्मा आहे तो देखील तू अर्पण कर. काही शिल्लक ठेऊ नकोस. “जीवात्मा अर्पण केलास कि शिवात्मा प्रगट होणे म्हणजे आत्मज्ञान प्रगत होणे. गुरुगीतेत सांगितल्याप्रमाणे मी तू रहीत होणे म्हणजेच जीवात्मा अविनाशाप्रत अर्पण करणे. […]
अहंकार हा हेतूचा सर्वात मोठा आसरा आहे. शत्रू आहे. रिपू आहे. मग हा अहंकार नष्ट करण्याकरिता मानवाने काय केले पाहिजे? मन सर्वस्वपरीने सद्-गुरु चरणांवर अर्पण केलेले असेल अशा मानवाला काही अवघड नाही. मानवावर अनेक प्रसंग येत असतात. परमेश्वराने,अनंतानी मानवाला शक्ती दिलेली आहे. […]
पावसाळ्यात येणारे सण व उसत्व आपल्याला नेहेमीच आनंद देत आले आहेत. गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडाल्यामुळे मुर्तींच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत त्यात बऱ्याच मूर्तिकारांच्या काही ना काही अडचणी आहेत. कोणाला जागेची तर कोणाला कारागिरांची तर कोणाला महागाईची. मुंबईवर वारंवार होणाऱ्या दहशतवाद्यांच्या हल्याने मुंबईचे जीवन असुरक्षित तसेच मुंबईतील नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. कुठल्या क्षणी काय होईल याची काही शास्वती राहिलेली नाही. त्याचे सोयर-सुतक ना शासनाला व शासन चालवणाऱ्यांना मंत्र्यांना आहे. आता प्रत्येकानीच दक्ष राहिले पाहिजे व काही संशयास्पद आढळले तर त्याची खबर त्वरित पोलीस यंत्रणांना दिली पाहिजे. येणाऱ्या सार्वजनीक गणेशोत्सवाच्या निमित्ताने पूढील बदल सुचवावेसे वाटतात पण निर्णय सर्वानुमतेच व्हावा ही विनंती […]