नवीन लेखन...

विज्ञान / तंत्रज्ञान

वॉशिंग मशीन

वॉशिंग मशिन शिवाय कुठल्याही गृहिणीचे काम चालू शकत नाही. कपडे धुण्यासाठी हे यंत्र वापरले जाते. आता त्यात स्वयंचलित, अर्धस्वयंचलित असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्याचबरोबर त्यांचा आकारही आटोपशीर आहे. […]

अल्पायुषी कडी

शनीची कडी कशी निर्माण झाली असावीत, हा खगोलशास्त्रातील एक चर्चेचा विषय आहे. एका तर्कानुसार या कड्यांची निर्मिती आपल्या ग्रहमालेच्या निर्मितीच्या वेळीच झाली असावी. आपल्या ग्रहमालेतील शनी आणि इतर ग्रह ज्या धुळीच्या आणि वायूच्या मेघातून निर्माण झाले, त्या मेघातूनच ही कडी तयार झाली असावीत. या कड्यांतील पदार्थ म्हणजे पूर्णपणे निर्माण होऊ न शकलेल्या, शनीच्या एखाद्या छोट्या उपग्रहाचे खंड असावेत. […]

हिमनद्यांचा इतिहास

पृथ्वीवर आज जवळपास दोन लाख लहान-मोठ्या हिमनद्या अस्तित्वात आहेत. यांतील काही हिमनद्या अंटार्क्टिकासारख्या अतिथंड ध्रुवीय प्रदेशात आढळतात, तर काही हिमनद्या पृथ्वीवरच्या विविध पर्वतांवर आढळतात. पृथ्वीवर आढळणाऱ्या या सर्व हिमनद्यांचं अस्तित्व पृथ्वीवरील हवामानावर अवलंबून आहे. […]

समुद्रातले ज्वालामुखी

पृथ्वी ही भूशास्त्रीयदृष्ट्या सक्रिय असल्याचं दर्शवणारी एक महत्त्वाची खूण म्हणजे पृथ्वीवरचे ज्वालामुखी. पृथ्वीच्या सक्रियतेचे पुरावे म्हणता येतील असे शेकडो जिवंत आणि मृत ज्वालामुखी पृथ्वीवरच्या जमिनीवर अस्तित्वात आहेत. असे ज्वालामुखी अस्तित्वात असण्याला सागराचा तळही अपवाद नाही. पृथ्वीचा सत्तर टक्के पृष्ठभाग व्यापणाऱ्या या महासागरांतही अचानक उफाळणाऱ्या सक्रिय ज्वालामुखींबरोबरच अनेक निष्क्रिय ज्वालामुखीही दडले आहेत. […]

ताऱ्याचं ग्रहभक्षण

आपल्या सूर्याचं जवळपास निम्मं आयुष्य संपलं आहे. सुमारे पाच अब्ज वर्षांनंतर सूर्य मृत्यू पावणार आहे. त्याचा परिणाम आपल्या ग्रहमालेवर अर्थातच होणार आहे. त्यातही सूर्याच्या जवळ असणाऱ्या ग्रहांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे. हे कसं घडून येणार आहे, याची कल्पना देणारी एक घटना संशोधकांनी नुकतीच टिपली आहे. […]

पहिले घोडेस्वार?

घोडा हा आपलं जंगली स्वरूप सोडून माणसाच्या घनिष्ट संपर्कात सर्वात प्रथम सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी आला असावा. हे घडून आलं ते बहुधा काळ्या समुद्राच्या उत्तरेला असणाऱ्या युरेशिआ स्टेप या गवताळ पठारी प्रदेशाच्या पश्चिम भागात. घोडा माणसाळला गेल्यावर त्याचा उपयोग प्रथम दुधासाठी आणि मांसासाठी केला गेला असावा. […]

रेल्वेद्वारे मालवाहतूक आणि रोरो सेवा

मालाने भरलेले ट्रक रेल्वेमार्फत पाठविणे ही कल्पना तुलनेने नवीन आहे. भारतात या सेवेची सुरुवात १९९९ मध्ये कोकण रेल्वेने केली. याला रोरो ऊर्फ रोल ऑन-रोल ऑफ असे म्हणतात. […]

तिबेटी साप

तिबेटचं पठार म्हणजे एक आत्यंतिक परिस्थिती असणारं ठिकाण आहे. सुमारे पंचवीस लाख चौरस किलोमीटर इतक्या मोठ्या आकाराच्या या पठाराची सरासरी उंची चार हजार मीटरहून अधिक आहे. इथली हवा अत्यंत विरळ आणि थंड असते. इथलं तापमान हिवाळ्यात शून्याखाली वीस अंश सेल्सिअसच्या खाली जातं. […]

स्टेनलेस स्टील

स्टेन म्हणजे डाग. ज्यावर डाग पडत नाहीत असे पोलाद म्हणजे स्टेनलेस स्टील. त्याच्या न गंजण्याच्या गुणधर्मामुळे स्टेनलेस स्टीलचा रासायनिक उद्योग, समुद्रातील बांधकामे, पाण्यातील बांधकामे अशा बऱ्याच उद्योगांमध्ये मोठया प्रमाणावर वापर होतो. स्वयंपाकघरातसुद्धा स्टेनलेस स्टील वापरले जाते. […]

गंजण्यापासून संरक्षण

खिळे, कुंपणाच्या तारा, विजेचे खांब या सर्व नवीन वस्तू असताना चकाकतात, पण त्या कालांतराने निस्तेज होतात आणि त्यांवर एक लाल रंगाचा थर चढतो. हा थर म्हणजे लोखंडाचे ऑक्साईड असते. […]

1 27 28 29 30 31 65
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..