नवीन लेखन...

वीजनिर्मिती केंद्रांची क्षमता कशी मोजतात?

एक किलोग्रॅम वजनाची वस्तू दहा सेंटीमीटर वर उचलण्यास लागणारी ऊर्जा एका सेकंदात निर्माण करू शकणाऱ्या यंत्राची ऊर्जानिर्मितीची क्षमता सुमारे एक वॅट इतकी असते.

आता दुसऱ्या एखाद्या मोठ्या यंत्राने दहा लाख किलोग्रॅम म्हणजे एक हजार टन वजनाची वस्तू दहा सेंटीमीटर वर उचलण्यास लागणाऱ्या ऊर्जेची निर्मिती एका सेकंदात केली, तर त्या यंत्राची क्षमता दहा लाख वॅट म्हणजेच एक हजार किलोवॅट किंवा एक मेगावॅट इतकी भरेल. वीजनिर्मिती केंद्रांची क्षमता याच मेगावॅट या एककाद्वारे मोजली जाते.

महाराष्ट्रातील सर्वात मोठं औष्णिक वीजनिर्मिती केंद्र चंद्रपूर इथे आहे. या केंद्रातील एकूण सात संचांची वीजनिर्मितीची एकत्रित क्षमता २३४० मेगावॅट इतकी आहे. कोयना नदीवर बांधलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पात अठरा संचांद्वारे एकूण १९२० मेगावॅट वीज निर्माण होऊ शकते.

तारापूरच्या अणुऊर्जाकेंद्रात चार संचांद्वारे एकूण १,४०० मेगावॅट इतकी विद्युतनिर्मिती करता येते पवनचक्कीची स्वतःची वीजनिर्मिती क्षमता कमी असली तरी महाराष्ट्रातील सुमारे २,७०० पवनचक्क्यांद्वारे २,२०० मेगावॅट वीजनिर्मिती होते.

भारताची आजची वीजनिर्मितीची एकूण क्षमता सुमारे १,६७,३०० मेगावॅटइतकी आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा २२, १०० मेगावॅट इतका आहे. ज्या वेळेत वीजेच जास्तीत जास्त वापर होतो, त्या काळातली देशाच वीजेची गरज ही सुमारे १, २७.००० मेगावॅट आणि राज्याची गरज ही सुमारे १९००० मेगावॅट इतक असते. सर्व प्रकल्प सतत शंभर टक्के कार्यक्षमतेने चालू शकत नसल्याने प्रत्यक्ष वीजपुरवठ्यात तूट निर्माण होते.

आजची ही तूट राष्ट्रीय स्तरावर सुमारे १२ टक्के तर राज्य स्तरावर सुमारे २५ टक्के इतकी भरते. परिणामी आपल्याला भारनियमनाच्या संकटाला सामोरं जावं लागतं. भविष्यात तर वीजेची गरज ही वाढतच जाणार आहे. ही वाढत गरज भागवण्यासाठी नवे वीजनिर्मिती प्रकल्प उभारले गेले नाहीत तर परिस्थिती अधिकच कठीण होणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..