संस्थेत कर्मचारी रुजू होण्यापासून निवृत्त होईपर्यंत सर्व टप्प्यावरील धोरणे आणि संबंधित नियम यांचे संपूर्ण मार्गदर्शन. सेवक रचना सेवकांची जबाबदारी व उत्तरदायित्व सेवक भरती, सेवक पदोन्नती, सेवक बदली, सेवक रजा नियम, सेवक शिस्त नियम, सेवकांचे गोपनीय अहवाल, सेवकांना द्यावयाचे आर्थिक लाभ, सेवकांसाठीचे कायदे, सेवक संघटना, सेवकांचा व्यवस्थापनात सहभाग या सर्व विषयांवरील तपशीलवार चर्चा खाली केलेली आहे पाने :156, किंमत : 250 […]
आपला प्रत्येकाचा दुकानांशी जवळ जवळ रोज संबंध येतो. पण दुकानदारीच्या जगाबद्दल आपल्याला काहीच माहित नसते. लहान मोठे दुकानदार त्यांच्या दुकानदारीच्या विविध तऱ्हा, त्यांचे अनंत प्रश्न, अर्थव्यवस्थेत रिटेल दुकानदारीचे स्थान, महत्व, व्यवसायाचे विविध पैलू यावर सांगोपांग विवेचन करणारे मराठीतील पहिले व एकमेव पुस्तक. विलास कुळकर्णी पाने : १५८, किंमत : १६० रु. […]
ब्रिटिश कालखंडामध्ये स्थानिक प्रशासन सुकर व्हावे, तत्कालीन जिल्हाधिकार्याला या भूप्रदेशाची पूरेशी माहिती असावी आणि येथील जाती, जमातीचे तपशिल ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या सोयीसाठी म्हणून ज्ञात व्हावे हा मुख्य हेतू मनात ठेवून येथील जास्तीत जास्त महसूल वसुलीच्या दृष्टीने आवश्यक तपशील पुरवणारा ग्रंथ म्हणून जिल्हा गॅझेटिअर्सची निर्मिती झाली. […]
सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण भागात गेली १२ वर्षे वास्तव्याला असलेल्या डॉ. संजीव चौबळ यांनी केलेले अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण. अमेरिकेतील मोठमोठ्या शहरांमध्ये रहाणार्या बहुतांश मराठी लोकांनीही ग्रामीण अमेरिकेचा हा पैलू अनुभवलेला नाही. भारतात राहून अमेरिकेची झगझगीत आणि भव्यदिव्य कल्पनाचित्रे रेखाटणार्या मंडळींना हे पुस्तक वाचून वास्तवाचे नक्कीच भान येईल. […]
मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर एकूण भारतीय चित्रपटसृष्टीतच दर्जेदार चरित्रपटांची वानवा आहे. शंभर वर्षांची परंपरा सांगणार्या भारतीय चित्रपटसृष्टीला खरं तर अशोभनीय अशी ही बाब आहे. परंतु, ही बाब ठळकपणे जाणवून देणारी एक आशादायक घटना म्हणजे ‘“बालगंधर्व”’ हा चित्रपट! […]
दैनिक प्रत्यक्ष हे वृत्तपत्र श्री अनिरुद्ध बापू यांनी सन २००५च्या दत्तजयंतीच्या दिवशी प्रसिद्ध केले. हे दैनिक १२ पानांचे असून त्याची किंमत रु.२.५० आहे. दैनिक प्रत्यक्ष सर्व वृत्तपत्रांचे स्टोल तसेच रेल्वे स्टोलवरही उपलब्ध आहे. तसेच घरोघरी येणाऱ्या अन्य वृत्तपत्रा प्रमाणे ही मिळते. प्रत्यक्ष दैनिकात परमपूज्य सदगुरु बापू यांनी लिहिलेले अग्रलेख व विविध विषयांवरील इतर लेखकांनी लिहिलेले लेखही वाचकांस वाचावयास मिळतील. पान चार आणि पाचवर आंतरराष्ट्रीय सदरात विविध माहिती आहे जी इतर वृत्तपत्रात अभावानेच वाचायला मिळते. […]
पावसाळ्यात येणारे सण व उसत्व आपल्याला नेहेमीच आनंद देत आले आहेत. गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडाल्यामुळे मुर्तींच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत त्यात बऱ्याच मूर्तिकारांच्या काही ना काही अडचणी आहेत. कोणाला जागेची तर कोणाला कारागिरांची तर कोणाला महागाईची. मुंबईवर वारंवार होणाऱ्या दहशतवाद्यांच्या हल्याने मुंबईचे जीवन असुरक्षित तसेच मुंबईतील नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. कुठल्या क्षणी काय होईल याची काही शास्वती राहिलेली नाही. त्याचे सोयर-सुतक ना शासनाला व शासन चालवणाऱ्यांना मंत्र्यांना आहे. आता प्रत्येकानीच दक्ष राहिले पाहिजे व काही संशयास्पद आढळले तर त्याची खबर त्वरित पोलीस यंत्रणांना दिली पाहिजे. येणाऱ्या सार्वजनीक गणेशोत्सवाच्या निमित्ताने पूढील बदल सुचवावेसे वाटतात पण निर्णय सर्वानुमतेच व्हावा ही विनंती […]
सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण भागात गेली १२ वर्षे वास्तव्याला असलेल्या डॉ. संजीव चौबळ यांनी केलेले अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण. अमेरिकेतील मोठमोठ्या शहरांमध्ये रहाणार्या बहुतांश मराठी लोकांनीही ग्रामीण अमेरिकेचा हा पैलू अनुभवलेला नाही. भारतात राहून अमेरिकेची झगझगीत आणि भव्यदिव्य कल्पनाचित्रे रेखाटणार्या मंडळींना हे पुस्तक वाचून वास्तवाचे नक्कीच भान येईल. […]