नवीन लेखन...

नशीब…

तुझी ती भेट अंतरंगात जपली तुझ्या विरहाने आग मनात लागली. तुझे ते रुप चंद्रमा नभात तुझी ती वाणी हसरी प्रभात भेटण्याची वेळ असे तुझ्या मनाची मी सदेेेैव पाहतसे वाट तुझ्या  येण्याची वचन तु दिलेस सा ठेवुन प्रेमाची फसवून तु गेलीस लाज ठेव तया वचनाची ना दुसरीचे रुप माझ्या निरमल मनात निघून येशील पुन्हा हेच असावे माझ्या नशीबात……  — […]

जीवन परिघ

एक परिघ ते आंखले आहे विधात्याने विश्वाभोवतीं जीवन सारे फिरत असते एक दिशेनें त्या वरती   १ वाहण्याची क्रिया चालली युगानुयुगें या जगतीं कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा एकांच परिघात सारे फिरती   २ जेंव्हां कुणीतरी थकून जाई दुजा उठोनी मदत करी जीवन मरणाची शर्यत जिंकण्यासाठीं तो लक्ष्य धरी   ३ मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी नियंत्रित कुणी करी जगाला […]

रावण वृत्ती

रावण नव्हता कुणी राजा, ती होती व्यक्ति । व्यक्तीचा तो इतिहास नव्हता, ती होती प्रवृत्ति….१, आजही दिसती कित्येक आम्हा, रावण या जीवनीं । कशी रंगेल जीवन कथा, रावणा वांचूनी…२, विरोधात्मक बुद्धी तुमची, अडथळे आणते । क्रोध, लोभ, अहंकार गुणांनी, प्रवाहाला रोकते…३, सद्‌गुणांचा पाया खोलवर, जेवढा तो गेलेला । रावण वृत्ति हार जाईल, त्याच मग वेळेला….४   […]

भविष्यातील अमृत !

भविष्यात ‘पाणी’ अमृत ठरणार आहे, मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे ! आतापासूनच तरतूद करून ठेवावी लागणार आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग उपयोगी पडणार आहे ! शेतकऱ्यांच्या आत्महत्या पॅकेजने सुटतील? समस्येच्या मुळाशी जाऊन सोडवाव्या लागतील ! कदाचित जलशिवार आणि नद्या जोडणीने शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या सुटील ! अवर्षणग्रस्तांना ‘अमृता’चे आमिष दाखविले, बिचारे ‘जलाचे’ दोनथेंब पिऊन जगले ! ‘अमृत’ प्राशनाने […]

मान्य मला ती सजा, प्रभु तु देशी

मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।। लुटालूट करुनी देह वाढविला राम नाम जपूनी पावन तो झाला ।।२।। प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण ग्रंथ रचिला ।।३।। वाहून गेला पाप भाग तप प्रवाहाच्या वेगांत धुवूनी गेला डाग जलाशयाच्या ओघांत ।।४।। वाईट घटना घडते त्यास भोग […]

आधुनिकता

नवलाईचे विश्व सारे,  नवलाईतच जगते आगळ्याच्या शोधामध्यें,   नव-नवीन इच्छीते ताजे वाटते आज जें,   शिळे होई उद्यांच ते प्रवाही असूनी जीवन,   बदल घडवीत जाते मुल्यमापन बदलांचे,   संस्कारावरी अवलंबूनी परिस्थीतीच्या भोवऱ्यामध्यें,  विचार फिरे क्षणोंक्षणीं मुळतत्व ते राही कायम,   आकार घेई जसा विचार ताजा शिळा भाव मग तो,   ठरविला जाई वेळेनुसार डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

देशभक्त – वैज्ञानिक !

असा देशभक्त वैज्ञानिक एकत्र आणि गरिब कुटुंबात जन्माला आला, लहानपणी कष्टाला, पण शिक्षणचा ध्यास नाही सोडला, त्यासाठी पेपरही विकला, डिग्र्या आणि सन्मानांचा गर्व नाही झाला ! असा देशभक्त वैज्ञानिक ज्याने वडिलांच्या संस्कारांचा आणि थोरामोठ्यांच्या सल्याचा आदर केला ! असा देशभक्त वैज्ञानिक ज्याने आयुष्यभर फक्त देशासाचे हीत बघितले देशासाठी काम केले ! देशाला आंतरीक्ष आणि अणू विज्ञान-तंत्रज्ञानात […]

विधी लिखीत

विधी लिखीत असे अटळ त्याच प्रमाणे होई निश्चित कोण बदले मग काळाला प्रभूचा सहभाग असे ज्यांत  ।।१।। राम राज्याभिषेक समयीं असता सर्वजण आनंदी राज्य सोडूनी वनी जाईल जाणले नव्हते कुणी कधीं   ।।२।। नष्ट करुनी सर्प कुळाला तक्षकावरही घात पडे परिक्षिताचे प्रयत्न सारे फिके पडती नियती पुढे   ।।३।। आकाशवाणीचे शब्द ऐकतां हादरुनी गेला कंस मनीं काळाने त्या […]

ज्ञानेश्वराची चेतना

जीवंतपणी घेई समाधी, ज्ञानेश्वर राजा । दु:खी होऊनी हळहळली, विश्वामधली प्रजा ।। सम्राट होता बालक असूनी, राज्य मनावरी । हृदय जिंकले सर्व जणांचे, लिहून ज्ञानेश्वरी ।। आसनीं बसत ध्यान लावता, समाधिस्त झाले । बाह्य जगाचे तोडून बंधन, प्राण आंत रोकले ।। निश्चिष्ठ झाला देह जरी , बाह्यांगी दर्शनी । जागृत आसती प्राण तयांचे,   आजच्याही क्षणी ।। […]

गीता – जीवनाची एक उकल

रणभूमीवर समर प्रसंगी मृत्यु असता सामोरी जीवनांची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी //धृ// अर्जुन असूनी महारथी द्विधा झाली मनःस्थिती सगे सोयरे तेथे बघूनी खालती बसला निराशूनी कसे मारुं मी माझेच सारे भगवंताला प्रश्न विचारी //१// जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी कुणीही नाही कुणाचे येथे नाते गोते क्षणिक भासते सत्ता येथे चालते प्रभुची खेळणी सारी ठरते […]

1 387 388 389 390 391 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..