नवीन लेखन...

योग्य वेळी

दिन दुबळे रोगी जर्जर,  कितीक पसरले या संसारी काटे काढूनी जीवनावरचे,  सुगंध घ्या तुम्ही कुणीतरी….१ शून्यामधले कितीकजण ते,  शून्यची सारे अवतीभवती परिस्थितीच्या वणव्यामध्ये,  धगधगणारे जीवन कंठती….२ आज हवे ते त्यांना कुणीतरी,  फुंकार घालील दु:खावरती सहानुभूतीचा शब्द एक तो,  निर्माण करील सहनशक्ति….३ क्षीण होता तव दृष्टी,  दिसेल कां तयाची धडपड श्रवणदोष तो येण्यापूर्वी,  ऐकून घे तू दु:खी […]

पंचपदी

कुणाच्या तरी सांगण्याला पडलो फशी पार्टीच्या जाहिरातीसाठी निवडली एजन्सी होती इलेक्शनची अर्जन्सी नाहीं केली पुरती चौकशी आणि अखेरिस झाली फजिती खाशी . – सुभाष स. नाईक

प्रेम

प्रेम क्षमा,प्रेम तमा,डोळ्यातील अन कारून गरीमा प्रेम असू,प्रेम हसू,हृदयातील अन दारूण जखमा प्रेम रंग, प्रेम दंग,मेंदूतील अन विरळ प्रतिमा प्रेम सूर, प्रेम स्वर,कंठातील अन मंजुळ नगमा प्रेम जीवन,प्रेम संजीवन,सुखदुःखाचे अन अनुबंधन प्रेम बंध, प्रेम संबंध, देहदीलाचे अन रणकंदन प्रेम मोह, प्रेम संमोहन,सुचे न काही तुझेच। चिंतन प्रेम संग, प्रेम संगम,दोन दिलाचे एकच स्पंदन प्रेम चिंता,प्रेम चिंतन,अन […]

सम्राज्ञी

तुझं असं येणं सोसवत नाही मला … प्रारब्धाचे आसूड झेलत उन्मादाचा प्रपात कोसळत असतांना , तुझं माझ्यासाठी येणं… सोसवत नाही मला … बेबंद समाजाचा माज उतरवताना तुझी होणारी तगमग, सोसवत नाही मला …. रूढी,परंपरा यांच्या शृखंला अलगद सोडवतांना रक्तबंबाळ झालेेली तुझी नाजूक पावलं पहावत नाहीत मला …. येशील कधी तरी तेंव्हा साम्राज्ञी सारखी ये …. माझ्या […]

बडवे – पुरोहीत

बडवे मंडळींचा कारभार, जगदंबेच्या नांवें चालतो भाविकामधील अज्ञानाचा,  उपयोग तो करूनी घेतो…१, पूजेमधल्या विधी करिता,  आग्रह त्यांचा चालत असे भक्तीरसाचे महत्त्व असूनी,  त्याच्यांत त्यांना रस नसे व्यवहारीपणाचे रूप आणूनी,  बाजारी वृत्ति ती दाखविती धर्माचे ते नाव लावूनी,  भोळ्या भक्तांना लुटत असती पुरोहित तो असा असावा,  धर्माची तो करि उकलन भक्तीमार्गाच्या वाटसरूंना,  योग्य मार्ग ते देयी दाखवून, […]

आम्ही स्वतंत्र आहो

(१५ ऑगस्ट २०१८ , स्वातंत्र्यदिनाप्रीत्यर्थ ) आम्ही स्वतंत्र झालो , आम्ही स्वतंत्र आहो स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।। गर्जलो, “गटापुढती कुठल्या न नमवुं माथा” अन् ‘पंचशील’-तत्वीं विश्वास पूर्ण होता बदललो परी नंतर, नाहीं ‘अलिप्त’ उरलो त्या पंचशील-तत्वा पुरते अम्ही विसरलो निज राजकारणाचा अभिमान , परी, लाहो ।। ‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।। प्रगतिचें नांव […]

मुक्या वेदना

प्रेमाच्या जुन्या आठवणीं आता सुन्या झाल्या आहेत अव्यक्त अश्या त्या वेदना आता मुक्या झाल्या आहेत माझ्या सुंदर अश्या जीवनातून तू का गेली ते कळलच नव्हतं तू नसलेल्या त्या गोष्टींमध्ये मन माझं कधी रमलच नव्हतं अडकलेल्या पाशातून स्वतःला मुश्किलीनं सोडवलं मी नव्या स्नेह बंधनात मनाला अगदी हलकेच गुंतवलं मी माझा तर प्रेमावरचा विश्वासच असता उडाला कोमल नव्या […]

तो

सहवास होता तुझा, सदोदित साथ देणारा…! संयम होता तुझा, माझे बोल झेलनारा…! जिद्द होती तुझी, नितांत प्रेम करण्याची…! तुझ माझ नातं कस्तुरीचं, एक थेंब सागरात मिसळलेलं….! एक थेंब सागरात मिसळलेलं….! – श्र्वेता संकपाळ

पंचपदी (लिमरिक)

आधी ‘पेपर’ होता ‘वीकली’ इलेक्शनआधी बनवला ‘डेऽली’ इलेक्शनसाठी झालं सिलेक्शन पण डिपॉझिट जप्त, हरला दणक्यानं नंतर त्यानं प्रिंटिंग-प्रेसच विकली . – सुभाष स. नाईक

प्रेम अर्ध्या वाटेवरचं

मागून जे मिळतं ते कवडीमोल ठरतं, अमूल्य असूनही, भावनांच्या कचाट्यात पडतं, थोडं झुलतं – थोडं डुलतं, थोड रडून पुन्हा हासतं, तरी मनाच्या हिंदोळ्यावर , निवांत बहरत असतं, प्रेम अर्ध्या वाटेवरचं, काट्यासारखं रुतून बसतं, कारण मागून जे मिळत ते कवडीमोल ठरत…! मागून जे मिळत ते कवडीमोल ठरत…! – श्वेता‌ संकपाळ

1 266 267 268 269 270 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..