नवीन लेखन...

प्रेम

प्रेम क्षमा,प्रेम तमा,डोळ्यातील अन कारून गरीमा
प्रेम असू,प्रेम हसू,हृदयातील अन दारूण जखमा

प्रेम रंग, प्रेम दंग,मेंदूतील अन विरळ प्रतिमा
प्रेम सूर, प्रेम स्वर,कंठातील अन मंजुळ नगमा

प्रेम जीवन,प्रेम संजीवन,सुखदुःखाचे अन अनुबंधन
प्रेम बंध, प्रेम संबंध, देहदीलाचे अन रणकंदन

प्रेम मोह, प्रेम संमोहन,सुचे न काही तुझेच। चिंतन
प्रेम संग, प्रेम संगम,दोन दिलाचे एकच स्पंदन

प्रेम चिंता,प्रेम चिंतन,अन प्रेम तारुण्याचे आमंत्रण
प्रेम गीत,प्रेम संगीत,श्रावणातील अन अमृत सिंचन

प्रेम दुवा,प्रेम दवा, प्रेम असे अन वाऱ्यापरी अमूर्त
प्रेम धर्म,प्रेम कर्म,माणुसकीचे असे अन खोल गर्त

– महेश सूर्यवंशी
(कागल)

Avatar
About महेश गोविंद सूर्यवंशी 3 Articles
मी विद्यार्थी आहे आणि मनात लिहण्यासाठी तळमळ आहे, लिहण्यासाठी असा नेमका विषय नाही सांगत येत. पण माणुसपणावर अखंड लिहीत जाईन

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..