कळसूत्री बाहुल्या
नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे । टकमक पाहात हांसत होत्या, चोहीकडे ।।१।। झीम्मा खेळे, फुगडी खेळे, गरगर फिरती । हातवारे करुन त्या, माना डोलावती ।।२।। जवळ येवून गुजगोष्टी, सांगे एकमेकींना । सासू नणंद यांच्या, कुलंगड्या काढतांना ।।३।। सुख दुःखाच्या कथा, सांगितल्या त्यांनीं । कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी ।।४।। अज्ञानी गरीब बिचाऱ्या, जेंव्हा संकल्प करती […]