नवीन लेखन...

संकोचलेले मन

मध्य रात्र झाली होती,  सारे होते शांत  । रस्त्यावरती तुरळक व्यक्ती,  वाटला एकांत  ।। एक गाडी मंदिरीं थांबली,  त्याच शांत वेळीं  । सूटामधली व्यक्ती कुणी एक, आली दारा जवळी  ।। सारे होते नशिबात त्याच्या,  धन संपत्तीचे सुख  । दिवस घालवी मग्न राहूनी,  कार्ये पुढती अनेक  ।। तर्कज्ञान  तीव्र असूनी,  आगळा बाह्य चेहरा  । परि अंर्तमन सांगत […]

सारेच चोर

हासतात तुला वेड्या ते, पकडला गेलास समजून परि सहानूभूती आहे त्यांच्यात, चोर आहेस म्हणून — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

देवकी माता !

काय म्हणू ग तुजला देवकी   भाग्यवान की अभागी ईश्वर तुझीया उदरी येवूनी    सुख न लाभले तुजलागी // जन्मोजन्मीचे पुण्यसाचुनी     मात्रत्व लाभे स्त्रिजन्माला तु तर असता जननी प्रभूची     तुजविण श्रेष्ठ म्हणू कुणाला  // राज वैभवी वरात निघता      कारागृही तुज घेवून गेले अवताराची चाहूल असूनी      दुःखी सारे जीवन गेले  // कंसाने तव मुले मारीली      निष्ठूर होऊनी स्वार्थापोटी तु […]

काळी बायको

काळी तिरळी बायको लाभून, मिळाले खूप समाधान. कसे काय बुआ  ?   असे विचाराल तर तिच्याकडे कुणी बघत नाही म्हणून — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

स्वप्न आणि जागेपण

एक ती झोप     स्वप्न बघत राही शिणवून शरीर ताप   जीवास सुख देई स्वप्न जाई विसरुन    जाग येता मनां जागे मन   स्वप्नांत भासवी वेगळेपणा एकाच मनाच्या दिसे   ह्या दोन भुमिका भिन्नता त्यांत भासे     जाऊन दोन टोकां स्वप्न आणि जागेपण   देहाच्या दोन स्थिती नाण्याच्या बाजू दोन  एकमेका न मिळती डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmain.com  

कविता – कोण असेल ती …!

काळे दाट रेशमी कुंतले पाहिले ज्यांनी ते गुंतले कोण असेल रे ती ? दिसते छान सुंदर किती सुंदर डोळे नजर बोलकी गाली खळया गोड खुलती डौलदार चालतांना टाकते पावले एका लयीत ती कोण असेल रे ती ? दिसते छान सुंदर किती पाहाण्या मन भरूनी तिला किती बहाणे करीती वेडे ते डोळ्यासमोरूनी जाई जेंव्हा नजरेचे त्यांच्या पारणे […]

वर्षाचे भगिनी प्रेम

तप्त होतां धरणी माता, शांत करी वर्षा तिजला प्रफुल्लतेचे झरे फुटती,   आंतूनी त्या मातीला…..१, जलमय होती नदी नाले,  दुथडी भरूनी वाहती धबधब्यातील खरी शोभा,  वर्षामुळेंच दिसती…२, हिरव्या रंगीं शाल पसरते,  धरणी माते वरी ऊब यावी म्हणून मेघांचे,  आच्छादन ती करी….३, वर्षा धरती बहिणी असूनी,  प्रभूची भावंडे उचंबळूनी प्रेम येतां,  धावून येते तिजकडे….७ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

भावनेस हसती विचार

भावनेच्या जावूनी आहारीं,  नुकसान करतात सारे, तर्कशुद्धता विसरून जाते,  अंगात भरूनी वेडे वारे ..१, भावनेची लाटच उठता,  मती होते एकदम गुंग, बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२ आपले सारे खरे असावे,  हाच होत असे अट्टाहास, आपण केल्या कर्मावरच,  बसतो आपला विश्वास..३ इंद्रीय आणि भावना यांची,  जमुनी जात असतां जोडी तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते […]

सु्र्य-चंद्राचा लपंडाव

बघा बघा तो रवि चालला, अतिशय वेगानें   । पूर्व दिशेला चंद्रही येई, त्याच तन्मयतेने   ।। युगानु युगें लपंडाव हा, त्यांचा चालला असे   । भावांमधली शर्यत बघूनी, गम्मत परी भासे   ।। मोठा भाऊ रवि त्याला, पकडण्या धांव घेई   । लहान भाऊ चंद्र असूनी, निसटून मात्र जाई   ।। संताप येता लाल होऊनी, रवि जाई तापूनी   । परि शांत […]

यश येईल मागे मागे

नको लागूस प्रसिद्धीच्या मागें मागे येईल स्वयं ती तुझ्याच संगे संगे निराशूनी जावू नकोस रागें रागें हिंमत बांधूनी जावेस तू आगे आगे विणाविस तू यशाची शाल धागे धागे| सुखाच्या छटा चमकूनी रंगे रंगे सतत रहावे जीवनी जागे जागे तेव्हाच यश येत असते भागे भागे डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

1 237 238 239 240 241 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..