भावनेस हसती विचार

भावनेच्या जावूनी आहारीं,  नुकसान करतात सारे,
तर्कशुद्धता विसरून जाते,  अंगात भरूनी वेडे वारे ..१,

भावनेची लाटच उठता,  मती होते एकदम गुंग,
बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२

आपले सारे खरे असावे,  हाच होत असे अट्टाहास,
आपण केल्या कर्मावरच,  बसतो आपला विश्वास..३

इंद्रीय आणि भावना यांची,  जमुनी जात असतां जोडी
तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते केव्हां गोडी…४

काही क्षणाचा काळ जाता, भावना जाई मग निघून
विचार मात्र मिश्कीलतेनें,  हसती पश्चाताप बघून…५

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

About डॉ. भगवान नागापूरकर 1368 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…