नवीन लेखन...

बघता तुला प्रिया रे ,

बघता तुला प्रिया रे ,– जिवा बेचैनी येते, कासाविशी होता हृदयी, आत मोरपीस हलते,–!!! विलक्षण ओढ तुझी, काळजाला किती छळते, मूर्त माझ्या अंतरीची, अढळ अढळ होतं जाते,–!!! स्पर्श होता तुझा सख्या, माझी न मी असते, बाहूंत तुझ्या विसावण्या, किती काळ मी तरसते,–!!! तुझ्यातच सारे विश्व माझे, जगही तोकडे भासे, तुझ्याचसाठी राजसा, मन्मनीचा चकोर तरसे,–!!! उषा आणि […]

तेज:पुंज स्वातंत्र्यसूर्य

तेज:पुंज स्वातंत्र्यसूर्य,उगवला आपल्यामुळे, हरेक भारतीय मान तुकवी, आपुल्या या कर्तृत्त्वापुढे,—!!! असामान्य कार्याचा तुमच्या, गौरव किती करावा,-? प्रत्येकाने ओंजळभर वसा, हृदयी आपुल्या जपावा,–!!! हीच आपणांस श्रद्धांजली, शब्दकुसुमे विनम्र वहाते, तसे,भारतमातेच्या सुपुत्रास, शतश: नमन मी करते,—!!!!! विनायक नाम ते, आपण सार्थ केले, नायक बनुनी भारताला, स्वतंत्र तुम्ही केले,–!!!! हिमगौरी कर्वे.©

हे टिपूर चांदणे

हे टिपूर चांदणे, सख्या तुला बोलावे, आकाशातील घनमाला, घराची तुला वाट दाखवे, –||१|| डोईवरचा चंद्रमा, माझिया प्रियाला स्मरण देई, एक चंद्र घरी वाट पाहे, सारखा सूचित करत राही,–||2|| शांत नीरव वातावरणी, बघ सजणा बोल घुमती, विरहव्याकूळ तुझ्या प्रियेचे, कानात कसे गुपित सांगती,||3|| भवतीचा काळोखही, येण्याची तुझ्या वाट पाहे, मिलन कल्पून मनाशी, दोन जिवांची संगत देई, –||4|| […]

श्रीरामा, घन:श्यामा,sssss

श्रीरामा, घन:श्यामा,sssss— घनघोर या काननी, किती पुकारु तुमच्या नावा,ssss- लक्ष्मण भावजी गेले सोडुनी,–!!! ‌. अयोध्येस परतल्यावरी, बसले मी राणीपदी, आदर्श जोडप्याचा मान देऊनी जनतेने केले धन्य जीवनी,– त्यातच आणखी गोड बातमी, स्वर्गच दोन बोटे राहिला,–!!! कुणाची नजर लागली, ग्रहस्थिती विपरीत फिरली, तुम्ही का सोडले मज रानी, जावे कुठे एकाकी मी आता,–!!! मनोरथे सगळी संपली तुमची सेवा […]

निसर्गावर अवलंबून

कितीही सारी धडपड करशी लाचार ठरतो अखेरी जाण माणसा मर्यादा तव आपल्या जीवनी परी … ।। क्षणाक्षणाला अवलंबूनी जीवन असे तुझे सारे पतंगा परि उडत राहते जसे सुटत असे वारे… ।। निसर्गाच्याच दये वरती जागत राहतो सदैव कृतघ्न असूनी मनाचा तूं विसरून जातो ती ठेव… ।। निसर्गाच्या मदती वाचूनी जगणे शक्य नसे तुजला जीवन कर्में करीत […]

विस्तीर्ण समुद्र किनारी

विस्तीर्ण समुद्र किनारी, फिरत फिरत निघाले, वाळूत चालताना ठसे, पावलांचे उमटलेले, –!!! दूर क्षितिजी सूर्यबिंब, घाईत होते चालले, रंगांची आरास पाहून, अचंबित की झाले,–!!! ढगांमागून निघाला, संधिप्रकाश आता, दिसू लागला धरणीवर, पखरुन घातलेला, –!!! याच ढगांवर स्वार होऊन, निघाला सोन्याचा गोळा, आभाळाला सप्तरंगी, आज साज चढवलेला,–!!! किती रंगांची रासक्रीडा, गगनी होती चाललेली, चकित होऊनी धरा, कशी […]

मोहमाया दलदल

दलदल होता चिखल मातीची,  पाय जाती खोलांत प्रयत्न तुमचे व्यर्थ जाऊनी ,  न होई त्यावर मात…१, सावध होवूनी प्रथम पावूली,  टाळावे ते संकट मध्यभागी तुम्ही शिरल्यानंतर,  दिसत नाही वाट….२, मोह मायेची दलदल असती, सदैव भोवताली चुकूनी पडतां पाऊल तुमचे, खेचला जातो खाली…३, जागृतपणाचा अभाव असतां,  गुरफूटूनी जातो मोहमायेच्या आकर्षक गुणाला,  बळी तोच पडतो….४, वेगवान त्या जीवन […]

अबोलीची केशरी वेणी

अबोलीची केशरी वेणी, नेसले केशरी साडी, अस्सल सोन्याने मढले ग, जसा जाईचा जणू बहरच ग, केशरी सुंदर टिळा लाविते, मोगऱ्याचे फूल केशी ग, भोवती दरवळ भारते ग, टपोरे मोतीच पेडी गुंफते ग, हाती गुलाब घेऊन माझ्या, प्रियाची वाट मी पाहते ग, गुलाब प्रतिक ना प्रेमाचे, गुलाबी पाकळ्या गाली ग,–!!! लाजलाजूनी म्हणते मग, कोण त्यांचा खरा वाली […]

मद, मोह, क्रोध, वासना

मद, मोह, क्रोध, वासना शरीरांतर्गत किती भावना,माणूस नावाची जादू भारते, नेहमीच मज हे दयाघना,–!!! लोभ मत्सर इर्ष्या नीचता, माणसातही आढळते क्रूरता, संपून माणुसकी, वृत्ती दानवी, दाखवतो आपली बा हीनता,–!! तरीही माणूसपण असते, एखाद्या सज्जन हृदयात, माणुसकीचे महत्व जाणे, कितीही असेल संकटात,–!! असा सज्जन प्रेम मानतो जगातील मोठी शक्ती, हेच प्रेम असे त्याचे, जगण्याची विशाल उक्ती,–!!! मुके […]

बाळ चिमुकले

बाळ चिमुकले, गोड हासले, रांगत आले , पायाला धरुनी, उभे राहिले, बाळकृष्ण ते, मला भासले, — वदनांतून कोवळे, ध्वनि उमटले, बोबड्या स्वरांनी, मज जिंकीयले, उचलून घेता , कसे आनंदले, हात हलवून , मज कुरवाळले, कोण लहान, मग वाटले, कुशीत त्याच्या, मीच शिरले , हलके हलके, त्याने थोपटले, गा,—गा कर , मज म्हणाले, निश्चिंत जीव,—!!! निश्चिंत मन […]

1 205 206 207 208 209 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..