मोहमाया दलदल

दलदल होता चिखल मातीची,  पाय जाती खोलांत
प्रयत्न तुमचे व्यर्थ जाऊनी ,  न होई त्यावर मात…१,

सावध होवूनी प्रथम पावूली,  टाळावे ते संकट
मध्यभागी तुम्ही शिरल्यानंतर,  दिसत नाही वाट….२,

मोह मायेची दलदल असती, सदैव भोवताली
चुकूनी पडतां पाऊल तुमचे, खेचला जातो खाली…३,

जागृतपणाचा अभाव असतां,  गुरफूटूनी जातो
मोहमायेच्या आकर्षक गुणाला,  बळी तोच पडतो….४,

वेगवान त्या जीवन प्रवाही,  खिळ बसे मोहाने
क्षणीक सुखाच्या मागे जातां,  दु:खी होई जीवने….५

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1447 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…