नवीन लेखन...

पुण्याचा साठा

खिशांत माझ्या पडली होती,  सुटी नाणी काही वस्तूंची ती खरेदी करण्या,  सर्व बाजार पाही….१, सराफ्याच्या दुकानी दिसला,  एक हिऱ्याचा हार डोळे माझे चमकूनी गेले,  फिरती गरगर…२, दाम विक्रीचे जाणूनी घेता,  हताश मी झालो हातातील धनाचे मोजमाप, करू मी न शकलो…३ दोन वेळची पूजा करूनी,  जप माळ जपती खूप साचले पुण्य आपले,  हे कांहीं समजती….४, कसा मिळेल […]

वि विठ्ठलाचा

विचा महिमा पाहू , अक्षर मोठे देखणे, विलक्षण आहे जादू , त्याचेच “गारुड” पडणे, विलोभनीय आहे सृष्टी, विचक्षण तिची शोभा, विसंगत बघू रंग संगती, विलोभनीय की पसारा,–!!! विशेष कितीतरी गोष्टी, विवेचन त्यांचे किती करू, विलक्षण विराजमानी, आश्चर्यांना किती स्मरू,–!!! विकार विवेक विचार, मनात असती भावना छुप्या, त्यातून विपरीत जन्म घेई, नि भावनांची विविधता,–!!! विनाशकाले विपरीत बुद्धि, […]

स्पर्शाने बघ तुझ्या पडतो

स्पर्शाने बघ तुझ्या पडतो, रिमझिम रिमझिम सडां,– मनात बहर खूप फुलतो, त्यावरती रोमांच खडा,–!!! जवळ तू अगदी येता, मनमोगरा उमलतो, तन-मन गंधित होता, प्रणय- सडा पडतो,–!!! कवेत तुझ्या शिरता, प्रेमधून कोण वाजवतो, त्यात भान हरपतां, दुनियेचा रंग बदलतो,–!!! कानात बोल मधुर घुमता, वाटे प्रीतशब्द बोलतो, शेवटी निवडून धरा, मदनच खाली उतरतो,–!!! कोमलांगी तू चारुलता, मनात मी […]

तुझ्याशिवाय

तुझ्याशिवाय, दिन भासे राती सारखा, रात्र उजाडता भकास पसरे, दिन उन्हासारखा,–!!! तुझ्याशिवाय, पावसाळा अगदी कोरडा, वर्षाव संजीवनाचा भले, होत राही सारखा,–!!! तुझ्याशिवाय, हेमंत ऋतू येता, उदासपण भरलेले, जीवन अव्याहत चालता,–!!! तुझ्याशिवाय, आगमन होते शिशिराचे, मन पालवी गारठून जाते, दूर — दूर तू राहता, -!!! तुझ्याशिवाय, ग्रीष्म ही भासे रुक्ष पहा, अधिक अधिक करत राहे, काहिली जिवाची […]

खरे ग्रह

तुमचे जीवन अवलंबूनी,   ग्रहराशीच्या दशेवरती तेच होई जीवनी तुमच्या,   जसे ग्रहमंडळ फिरती…१, मित्र मंडळी सगे सोयरे,  शत्रू असोत वा प्रेमाचे, जीवनातल्या हालचालीवरी,   परिणाम ते होई सर्वांचे…२, हेच सर्व ते ग्रह असूनी,  सतत स्थान ते बदलती परिस्थिती बघूनी तुमची,   वागण्यात तो फरक करती…३ अपयशाला कारणीभूत तो,  असतो कुणीतरी नजीकचा राहू-केतू शनि वा मंगळ,  ग्रहमान बनतो त्या घडीचा…४, […]

कृष्णा

मम चित्ती तुझे रूप गोपाळा, यशोदानंदन जगत्पालका, जगदाधिशा प्रतिपाळा, आठवती किती नावे कृष्णा,— देवकीनंदना वसुदेवसुता, राधेच्या कृष्णा, रुक्मिणी- भ्रतारा, तुझं आठवते मी घननिळा, द्वारकाधीशा, विष्णू अवतारा मनमोहना तू बाळकृष्णा,–!!! गोपिकांमधील तू श्रीरंगा, श्रीहरी तू जगदोद्धारा, नटवर तू अनादि अनंता, उभा राहशी प्रसंगी सारथ्या,–!!! कधी भासशी नुसती कल्पना, पण विहरशी आत्मी मनोहरा, सत्यभामा तुझीच कांता, लुब्ध तिच्यावर […]

असा कसा, जसा तसा

असा कसा, जसा तसा, जीवनाचा हा प्रवास, किती कष्ट दुःखे, यातना, कधी आनंदाचा मधुमास,– कधी कटू कधी गोड, कधी तिखट, कधी आंबट, चवी जितक्या येती वाट्या, तितुके पडती विविध सायास,– कधी गंमत, कधी मजा, कधी जोरा, कधी सजा, कधी रंक होतो राजा,– कधी राजाचाच बने दास,–!!! केव्हा वाटे जीवनगाणे, सुरेल स्वर्गीय ते तराणे, कधी अंतर्दुःख पुराणे, […]

धरणीचा दूत म्हणुनी

धरणीचा दूत म्हणुनी, उंच आभाळी जाशी, सतत पंख फैलावुनी, प्रवास सारा करशी–!!! दूरवरी खूप उडशी, घेऊन निरोप खालचा, वर अगदी जाऊन पोचशी, जिथे ना पोचे ऐहिक दृष्टी,–; आयुष्ये ज्यांची संपली, त्यांची खुशाली आणशी,-!!! त्यांच्याविना सारी पृथा, वंचित पोरकी,बापुडवाणी, नाती-गोती इथली सारी, मात्र एकदम केविलवाणी,–!!! भन्नाट रान वाऱ्यासारखा, काळ जाई पुढे पुढे, घेऊन जाई संगतीला, आपुले सख्खे […]

प्रीतीची फुंकर

मध्ये एक मैत्रीण बऱ्याच वर्षांनी भेटल्यामुळे तिची सुखदुःखे जाणून घेतली. तिचा नवरा बराच आजारी होता. ती मानसिक दृष्टीने खचली होती. परंतु त्यावेळची तिची मानसिक अवस्था पाहून,– आज आठवून मी खालील कविता केली आहे,— मी आहे बघ जवळी, रात्र घनतम काळी, किती सोसशी वेदना, प्रीतीची फुंकर निराळी,–!!! असह्य होता तुझा, जीव किती कळकळे, काळजात थेट उठे, कळ […]

तुझा उपयोग नाही काम झाल्यावर

तुझा उपयोग नाही काम झाल्यावर तुला उमजेल का आराम झाल्यावर ? पुढे घेऊन जाते सायकल साधी कधी रस्त्यात ट्राफिक-जाम झाल्यावर तुला समजेल बघ आहे किती सुंदर ! तुझे आयुष्य इन्स्टाग्राम झाल्यावर नवे खाते, नवा डी.पी., नवा नंबर विसर ओळख जुनी; बदनाम झाल्यावर तुझा आवाज बाकी गोड आहे; पण नको बोलूस तू बेफाम झाल्यावर बदल घडला जरी […]

1 191 192 193 194 195 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..