खो – खो नेतृत्वाचा आणि बट्ट्याबोळ राज्याचा!

अखेर महाराष्ट्रात नेतृत्व बदल घडून आला. विलासरावांच्या हाती नारळ देऊन सुशीलकुमार शिंदेंच्या राज्यभिषेकाचा मार्ग मोकळा करण्यात आला. नेतृत्वबदल हा काँठोसच्या अंतर्गत राजकारणाचा विषय असला तरी काँठोस राज्यातील सत्ताधारी पक्ष आहे आणि मुख्यमंत्री हा कोण्या पक्षाचा नव्हे तर राज्याचा असतो हे विचारात घेता विलासरावांना कां हटविले, हे जाणून घेण्याचा अधिकार राज्यातील जनतेला निश्चितच आहे.
[…]

गौरवाचे बाजारीकरण

चीड येते जनतेच्या शिवरायांवरील प्रेमालाही ‘कॅश’ करण्याच्या शासनाच्या बाजारू वृत्तीची. सत्ता टिकविण्यासाठी नव्या-नव्या कुरणांची निर्मिती करून ‘भुकेलेल्यांची’ सोय लावताना कोट्यवधी रुपयांची नाहक उधळण करणाऱ्या सरकारला शिवरायांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या श्रध्देची बाजारू किंमत लावताना काहीच कसे वाटत नाही?
‘मार्केटिंग’ किंवा बाजारीकरण हा अलीकडील काळात परवलीचा शब्द ठरला आहे.
[…]

आधा है आधे की जरूरत है!

इंठाजी नववर्षास नुकताच प्रारंभ झाला. या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आम्ही भारतीयांनी 31 डिसेंबरच्या रात्री जे-जे प्रकार केले ते आम्ही किती मोठ्या प्रमाणात आंग्लाळलो आहोत, हे सिध्द करण्यासाठी पुरेशे आहेत. त्या एका रात्री संपूर्ण देशात अक्षरश: अब्जावधी रूपयांची मदिरा रिचविल्या गेली.
[…]

प्रगती की अधोगती?

प्रकाशन दिनांक :- 29/12/2002

शेकडोंनी बंद पडलेले कारखाने, उद्योगधंदे या देशाला महान औद्योगिक राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नेहरूंना मूक श्रद्धांजली वाहत उभे आहेत. जेवढ्या समस्या शेतकऱ्यांच्या आहेत तितक्याच किंबहुना काकणभर जास्तच उद्योजकांच्या आहेत. पायाभूत सुविधांचा प्रश्न आहे.
[…]

विश्वस्तांनीच चालविली लूट!

मानवी जीवन सुखकर होण्यासाठी अनेक यंत्रणा किंवा व्यवस्था आपण निर्माण केल्या आहेत. अगदी कुटुंब पातळीपासून अशा व्यवस्था अस्तित्वात असतात. कुटुंबात एखाद्या कुटुंबप्रमुखावर त्या कुटुंबाची सर्वांगीण काळजी घेण्याची जबाबदारी असते.
[…]

लोका सांगे ब्रह्यज्ञान…!

अलीकडील काळात जनतेच्या सहकार्याने विविध योजना राबविण्याचा सपाटा सरकारने चालविला आहे. आपले सरकार किती लोकाभिमुख आहे, जनतेची आणि विशेषत: ठाामीण भागातल्या जनतेची आपल्याला किती काळजी आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न या माध्यमातून सरकार करीत असले तरी सरकारच्या या उपक्रमावर प्रश्नचिन्हे लावणारे काही मुद्दे उपस्थित होतातच. ठााम स्वच्छतासारखे विविध अभियान राबविताना सरकारचा उद्देश किती प्रामाणिक आहे, हा संशोधनाचा मुद्दा ठरु शकतो.
[…]

आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी

देशाची सार्वभौमता अखंड राखणे ही कोणत्याही देशाची सर्वाधिक प्राथमिकता असते. ही अखंडता कायम ठेवण्यासाठी केवळ लष्करानेच दक्ष राहून चालत नाही आणि अलीकडील काळात तर लष्करापेक्षा राजकीय नेते आणि सर्वसामान्य जनतेनेच आपल्या देशाची सार्वभौमता अक्षय राखण्यासाठी अधिक दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे. लष्करी आक्रमण करून एखादा देश पादाक्रांत करणे आज जागतिक स्तरावरील बदलत्या परिमाणाच्या पार्श्वभूमीवर अगदीच अशक्य आणि कालबाह्य ठरले आहे. […]

नव्या कुरणांची निर्मिती

साखर. मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक. मधूमेहाचे रोगी सोडले तर उर्वरीत मनुष्यजातीतील एकाचाही एकही दिवस बिनासाखरेचा जात असेल, असे वाटत नाही.
[…]

वृद्धाश्रमाऐवजी ज्ञानमंदिरे उभारा!

विज्ञानात एक नियम आहे, बहुतेक न्यूटनने प्रतिपादित केलेला असावा. एखादे कार्य करताना जेवढे बल आपण लावतो तेवढेच त्या कार्याला विरोध करणारे बल, कार्य ज्या वस्तूवर होत आहे त्या वस्तूत निर्माण होते. विपरीत दिशेने कार्य करणारा हा बलाचा नियम केवळ भौतिक विज्ञानापुरताच मर्यादित नसावा. […]

अनाकलनीय अर्थशास्त्र

परवा एका परिचिताच्या घरी गेलो होतो. घर कसलं एक छोटासा बंगलाच होता तो; एका सुखवस्तू घरात आढळणार्‍या सर्वच वस्तू, जसे रंगीत दूरचित्रवाणी संच, दूरध्वनी, शीतकपाट (फ्रीज), स्वयंचलित दुचाकी सगळं काही त्यांच्याकडे होतं. क्षेमकुशल वगैरे औपचारिक बोलणी झाली.
[…]

1 40 41 42 43 44