त्याचा आईचा फोन आला, तू बाप झाला, मुलगी झाली आहे. हि आनंदाची बातमी कळताच तो तडक दिल्लीला निघाला. दुसर्या दिवशी सकाळीच आपल्या नवजात परीला बघायला तो बी एल कपूर हॉस्पिटल वर पोहचला. त्याला बघताच बायकोच्या चेहर्यावर मंद स्मित पसरले, तिने पाळण्याकडे इशारा केला. पाळण्यात ती चिमुकली परी शांत झोपलेली होती. त्याने अलगद त्या चिमुकल्या परीला उचलले. […]
रंगबिरंगी सुंदर ठिपके, पंखावरी आकर्षक छटा त्या, मनास मोहीत करी…१, नृत्य पहा कसे चालते, तालबद्ध होवूनी फूलपाखरे बागडती, फुलाफुला वरूनी…२, नृत्याचे आंगण त्यांचे, ते ही सुंदर नि मोहक मखमालीच्या पाय घड्या, दरवाळताती सुवासिक…३, दोघांमधली चढाओढ, नर्तक आणि नृत्यांगणा कोण असे अधिक मोहक, प्रश्न सोडविल कोण ?….४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com
सुख हे मृगजळ, फसविते सर्वांला खेळ चालतो त्याचा, चकविणे मनाला …१, बाह्य वस्तूंचे सुख, क्षणिक असते, मोहून जाता सर्व, लक्ष्य तेच वेधते…२, खरे सुख अंतरी, परि शोधी बाहेरी, चुकीचा हा हिशोब, निराशा करी…३, अंतरातील सुख, नितांत असते एकाच अनुभवाने, जग विसरविते…४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com
एकटाच बसलो होतो, खोलीमध्यें शांत करमणूक करीत होते, दुरदर्शन आत..१, दूरीवरील व्यक्ती बघूनी, शब्द त्याचे ऐके केवळ चावी फिरवितां क्षणी, दृष्य दुजे देखे…२, जगामधली सर्व ठिकाणें, खोलीत अदृष्य तीं साधनांचा उपयोग करीता, जाण त्याची येती….३, वातावरण निसर्गाने, व्यापले सर्व जगी सुक्ष्मापासूनी अनंततेचे, गुण एकाचे अंगी….४, तेथे आहे जे येथेही, व्यापूनी सर्व स्थळी […]
१ काळी बायको (वात्रटिका) काळी तिरळी बायको लाभून, मिळाले खूप समाधान. कसे काय बुआ ? असे विचाराल तर तिच्याकडे कुणी बघत नाही म्हणून २ सारेच चोर (वात्रटिका) हासतात तुला वेड्या ते, पकडला गेलास समजून परि सहानूभूती आहे त्यांच्यात, चोर आहेस म्हणून ३ माझी नोकरी (वात्रटिका) नकार देत होती माझ्या प्रेमाला, बघून, मी आहे एक […]
रेहमानपाडा हा मुंबईतला मिश्र लोकवस्तीचा भाग.रेल्वेलाईनच्या कडेकडेने अजगरासारखा पसरलेला. नोकरी मिळेल,रोजगार मिळेल,पोटाची टिचभर खळगी भरेल ह्या आशेने भारतातल्या अनेक भागातून कामसू, जिद्दी माणसं मुंबईत येतात. आणि मग, अगदी अडचणीच्या ठिकाणी पण झोपडी बांधून राहतात.दिवस-रात्र कष्ट उपसतात. थकल्यावर अंग टाकायला घराचा सहारा घेतात. रेहमानपाडा पण असाच वाढत गेलेला. इथे अनेक वाकडे तिकडे गल्लीबोळ.त्यात दाटीवाटीने झोपड्या,बैठी घरं, दवाखाने, […]
दक्षिण आफ्रिकेत एक प्राणी संग्रहालय बघण्यात आले. निरनिराळ्या प्राण्यांची वेगवेगळी दालने बघितली. एकप्रचंड असे सर्पाचे दालन होते. अति विशाल हौद, तळामध्ये दोन भाग केलेले. पाणी व जमिनिसाठ्यी. लहान मोठी झाडे, दगडाच्या शीला, काही ठिकाणी कृत्रिम वारुळे, आणि निरनिराळे खांब रोवले होते. अनेक जातीचे सर्प, पाणी व जमिनीवर मुक्त हालचाली करताना दिसत होते. अश्च्यर्याची गोष्ट म्हणजे त्या पाण्यात खूप मासे सोडलेले होते, तसेच बऱ्याच संखेने बेडूक देखील होते. दोन्हीही सापांचे खाद्य. परंतु त्यांचीही प्रजनन क्रिया देखील वाढत राहावी, ह्याचेपण वातावरण आयोजकांनी व प्रशासनांनी निर्माण केलेले होते. गंमत वाटलीकी साप व त्याचे खाद्य बेडूक व मासे एकाच वातावरणात जीवन कंठीत होते. ज्याप्रमाणे आम्ही जंगलात वाघ सिंह आणि त्याच वेळी हरीण झेब्रे ह्यांचेही कळप हे ही बघितले. जीवन मरणाचा आनंद व संघर्ष यांची कला निसर्ग शिकवतच असतो. वेटोळे घालून शांत पडलेले वा हालचाली करणारे अनेक सर्प, दिसत होते. आश्च्यर्याची गोष्ट म्हणजे कित्येक बेडूक हे तेथील सापावरही आरूढ होऊन बसलेले […]
दोन-तीन दिवस अगोदर मला माझ्या एका मित्राने प्रश्न विचारला. ‘पटाईतजी सच सच बताओ आपने इंटरनेट पर लिखना क्यों शुरू किया’. त्याने विचारलेल्या प्रश्न ऐकून मी विचारात पडलो. मी अंतर्जालावर लिहिणे का सुरु केले? नकळत समर्थांचे वचन आठवले. समर्थ म्हणतात, ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’. प्रत्येक नश्वर जीवाला अमर व्हावेसे वाटते. मृत्यू लोकात शरीराने कुणीच अमर होऊ शकत […]
आज वर्गातलं वातावरण एकदम रंगीबेरंगीच होतं. रंगीत कागद, रंगीत पेनं, पेन्सिली, खडू आणि चित्रविचित्र रंगांची स्केच पेन्स. आणि विशेष गंमंत म्हणजे मुलांनी पण आज रंगीत कपडेच घातले होते. मला काही समजेना? “आज काय सगळ्या मुलांचा वाढदिवस आहे की काय?” असं विचारताच मुलं म्हणाली,“आज कलर डे आहे! म्हणून आज सगळंच कलरफूल!” सिमरन म्हणाली,“आजचा खेळसुध्दा रंगीबेरंगी रंगांचा रंगीत […]