सकाळची वेळ होती, गार वारं सुटलं होत. कॉलनीला झोपेतून पूर्ण जाग आलेली नव्हती. दाराशी उभे राहून इकडे तिकडे पाहत असतानाच पेपरवाला आला. नमस्कार केल्यानंतर थोडा वेळ तो थांबला, म्हणाला, ‘तीन नंबरच्या घरातल्या साहेबांनी दोन महिन्यापासून बिल दिलेलं नाही, काय करावं’ असं सांगून त्याने बोलायला सुरवात केली. पाच-दहा मिनिटे तो गप्पा मारत होता. थकलेल्या बिलापासुन सुरवात होऊन […]
राघवच्या डोळ्या समोरून म्हाताऱ्या संतुकरावांचा चेहरा हालत नव्हता. कारण पंधरा दिवसापूर्वीच ते राघवला भेटून गेले होते! राघव ऑफिस मध्ये सकाळी डेली केसेस पहात होता. जाधव काकाही त्यांच्या रुटीन मध्ये गाढले होते. […]
गुरुजींच्या खोलीवर रहायला येऊन चंदरला आता आठ-पंधरा दिवस होऊन गेले होते. चांगल्या माणसाचा सहवास लाभला की “चांगल्या सवयी कशा असतात ? “, हे आपल्याला कळून येते . […]
माझे मूळ गाव खामगाव तालुक्यामधील आंबेटाकळी आहे. प्राथमिक शिक्षण गावातच झालेले असून गावाचे वैशिष्ट्ये म्हणजे, नावाप्रमाणे आंबेटाकळी शिवारात आमराई होत्या. त्या लोप पावल्या असल्या तरी आठवणी मात्र कायम आहेत. याविषयी… […]
तो मेसेज होता मराठीतले प्रसिद्ध लेखक श्री. वसंत वसंत लिमये यांचा. ‘लाॅक ग्रिफिन’ आणि ‘विश्वस्त’ ह्या दोन रहस्य-थ्रिलर कादंबऱ्यांतून चोखंदळ मराठी वाचकांच्या घरात आणि मनात पोहेचलेले श्री. वसंत वसंत लिमये यांची माझी भेट झाली. अगदी ठरवून झाली. […]
पुस्तकाच्या सुंदरशा पण स्वप्नाळू अशा जगात जगणे म्हणजे स्वप्न पाहण्याचे सार्थकच. कधी कधी जिवलग माणसाजवळ सुध्दा ज्या गोष्टी मन उघड करून बोलता येत नाहीत. त्या या स्वप्नातील जगात अगदी सहजच उलगड़ल्या जातात. […]
तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त परिणाम कुटुंब व्यवस्थेवर होतॊय..काम शाळा नोकरी यामुळे आधीच वेळ मिळत नाही त्यातच तंत्रज्ञांच्या वापरामुळे नात्यातील संवाद कमी होतोय. त्यामुळे नातेसंबंध दृढ करण्यासाठी आता आपल्याला संवादाचे दरवाजे उघडावे लागतील. संवाद ही कला आहे. आपण काय बोलतो यावर नात्याचं भवितव्य अवलंबुन असतं. आपल्या बोलण्यानं एखाद्याला प्रेरणाही मिळू शकते किंवा एखाद्याचं मनही दुखू शकतं. […]
रुद्राच्या बोटाला सिगारेटचा चटका बसला तसा तो भानावर आला. वेटरने खुजराहोच्या (बीअर ) तीन बाटल्या, चखणा म्हणून खारे काजू, कलेजी फ्राय,आणि फोरस्क्येयर पाकीट सोबत ठेवले होते. दोन बाटल्या पोटात गेल्यावर त्याने तिसरीला हात घालणार, तोच त्याचा फोन वाजला. नम्बर अननोन होता. […]
आता मात्र दिवस पार बदललेत. रस्त्यावर फक्त अनोळखी गर्दी, गर्दी आणि गर्दी. ओळखीचे चेहरे शोधावे लागतात. अठरा पगड जातीतील आणि वेगवेगळ्या प्रांतातून आलेली माणसे ओसंडून वाहत आहेत. प्रत्येकाचे वागणे वेगळे. मराठीपण कधीच संपून गेले. […]