मला भावलेले सेंटजॉन
कॅनडाच्या न्युब्रुन्सविक राज्यातील सेंट जॉन हे प्राचीन, ऐतिहासिक व सांस्कृतिक शहर. आकाराने लहान; परंतु पाचुच्या बेटासारखे सुंदर! रस्त्यावर ना माणसांची गर्दी; ना गाड्यांचा गोंगाट. रुंद, स्वच्छ नि सुंदर रस्ते. त्याच्या दुतर्फा उंच व रंगरंगोटी केलेल्या निटनेटक्या इमारती. फुटपाथवरून क्वचितच चालत जाणारी माणसं, पण रस्त्यावरून अविश्रांत संथगतीने धावणाऱ्या गाड्या……सारेच कसे शांत नि शिस्तबद्ध!‘आम्ही स्वप्नांच्या दुनियेत तर नाही ना’, असा प्रथम दर्शनीच भास झाला. […]
