साहित्यिक
साहित्याचा चोर मी पण साहित्यिक थोर मी वाङ्मयचौर्याविरुद्ध नेहमी लढतो की घनघोर मी ! – – सुभाष स. नाईक (९८६९००२१२६)
हलकं फुलकं लेखन. यात विनोद वगैरे सगळं आलं
साहित्याचा चोर मी पण साहित्यिक थोर मी वाङ्मयचौर्याविरुद्ध नेहमी लढतो की घनघोर मी ! – – सुभाष स. नाईक (९८६९००२१२६)
एक होती टोरली, होती भली-थोरली ती होती सगळ्यांच्या कायम नजरेम्होरली रात्री होती जागेवर, नव्हती तिथें सकाळीं झाली पळापळी, अन् एक प्रश्न सर्वां छळी – ‘येवढी थोरली टोरली, कशी असेल चोरली’ ? – – – टोरली : Trolley – सुभाष स. नाईक (९८६९००२१२६)
ग्लासभर व्हिस्की, थेंबभर पाणी रोज ग्लास मी सात-आठ हाणी होणारच, झाले आजार डॉक्टरनें केलें बेजार ‘हें खा, तें घ्या, तें नको’ कंटाळुन गेली बायको तरिही अजुन मी भरतो पेला ग्लासभर पाणी, थेंबभर हाला. – हाणणें : भरपूर रिचवणें हाला : मद्य – सुभाष स. नाईक ( ९८६९००२१२६)
पाहत असतां सिनेमा ‘सिंघम’ अविरत चघळत होतो चिंगम हाणामारी दावी पडदा जोरानें मी करी ओरडा चिंगम चिकटे गळ्यात धावत गेलो इस्पितळात. – चिंगम : Chewing Gum – सुभाष स. नाईक ( ९८६९००२१२६)
झालो मी अठरा वर्षांचा म्हणुन मिळे अधिकार नामी. मत देण्याचा. या दिवशी मी आहे राजा ताजा ताजा. उलथिन मी नेत्यांची तख्तें बदलिन मी नावांचे तक्ते. – तख़्त – सिहासन — सुभाष स. नाईक
प्रचारामधें खुशाल भांडा नंतर आकडे मांडा सत्तेसाठी कशास थांबा ? कुणांसही द्या पाठिंबा .
एक छोटीशी गोष्ट….. […]
५0 लाख वाहने दिल्लीत रोज हवेत विष ओकतात. जीवाणू नाशक आणि विषाणू नाशक विष पाण्यात / थंड पेयांत टाकले जाते, जेणे करून ते कधी खराब होऊ नये. जेवणात हि आपण अन्नाच्या माध्यमातून किटनाशक, जीवाणू नाशक आणि विषाणू नाशक रसायने घेतोच. रोज रोज विष पिण्याचा परिणाम भोगावाच लागेल, त्यातून कुणाचीही सुटका नाही. […]
सीकेपी जेवणात मटणा पासून बनवल्या जाणाऱ्या अनेक पदार्थांची लयलूट असली तरी मटण भात हे मात्र अस्सल सीकेप्यांचं रविवारचं ‘स्टेपल फूड’ आहे हे निर्विवाद. चला तर मग, घ्या ती पिशवी आणि भेटा खाटकाच्या दुकानात. रविवार लागलाच आहे आता. […]
एक अल्हड भोळी नदी भटकून शहरात आली मिळाली तिला ओळख नवी गंदा नाला नंबर अकरा टीप: अंबाझरी तलावातून निघणारी नाग नदी आता नाग नाला म्हणून ओळखली जाते. असी नदी असी नाला इत्यादी. बहुतेक शहरांच्या जवळून वाहणाऱ्या सर्व नद्यांना नाला म्हणून नवी ओळख मिळालेली आहे.
Copyright © Marathisrushti.com 2016-2020 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies