नवीन लेखन...

हलकं फुलकं लेखन. यात विनोद वगैरे सगळं आलं

काळी बायको

काळी तिरळी बायको लाभून, मिळाले खूप समाधान. कसे काय बुआ  ?   असे विचाराल तर तिच्याकडे कुणी बघत नाही म्हणून — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

चारोळी

आवाज माझ्या कवितेचा माझ्यापेक्षा मोठा आहे माझा फक्त कानापर्यंत त्याची झेप थेट हृदयात आहे

चारोळ्या

मोहोळ आठवणींचे मोहोळ तरंग होऊन विरतात ! त्यातच तुझे असणे क्षण सुखाऊन जातात !! चेहरा जगताना उघडे व्रण मरणांनंतर उघडेपण ! संकृतीच्या मुखवट्यात चेहरा जगतो क्षण !! कवडसा सूर मारल्यानंतर डोहाचा तळ कळू लागतो    काळाची पाने झडल्यानंतर अर्थ कळू लागतो !! नवग्रहांच्या छायेतील “स्व” एक कवडसा कळता कळता प्रवास हळूच संपून जातो !!   ब्रम्हांडाच्या […]

मत्स्यायदान

श्रावण आता संपला. गणपतीही येऊन गेले. आता मत्स्यप्रेमींच्या मेजवान्या सुरु होतील… […]

खरडा आणि ठेचा….

खरडा बनवतात तो दोन्ही, हिरव्या आणि लाल मिरचीचा तर अस्सल ठेचा बनतो फक्त टंच रसरसलेल्या हिरव्यागार मिरचीचाच… […]

नैवेद्य का दाखवावा ??

देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू. गणपतीचा नैवेद्य ठरलेला. मोदक. मोदकच का ? गणेशांना आवडतो म्हणून !!! का आवडतो ? गणेश हा बुद्धीदाता आहे. आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे. बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. […]

फवारे हास्याचे – (4)

साहित्याचा चोर मी तरि साहित्यिक थोर मी थोर वाङ्मयचौर्याविरुद्ध नेहमी पण लढतो  घनघोर मी  ।। -सुभाष स.नाईक

फवारे हास्याचे – (3)

पांडेजी बसले पंगतीला चेलेही होते संगतीला खाउन भरपुर पांडेजींनी ग्लास ग्लास रिचवले पाणी . ‘आता भरपेट जेवणार कसे? ’ एक चेला त्यांना पुसे. ‘पाणी शिंपडल्याने वरती खाली दबली जाते माती. तसेच पाणी पिऊन घडते दबते जेवण, जागा होते. आता पहा रिचवीन भराभर ताटातिल भाताचे डोंगर’. -सुभाष स. नाईक

फवारे हास्याचे – (२)

ग्लास भर whisky थेंबभर पाणी असे ग्लास मी सात-आठ  ‘हाणी’ त्यानंतर झाले आजार डॉक्टरने केले बेजार हे खा, ते घ्या,  हे नको कंटाळून गेली बायको तरी अजुन मी भरतो पेला ग्लासभर पाणी, थेंबभर हाला . – (हाला – मदिरा ‘हाणणें’ – भरपूर खाणें-पिणें  ) सुभाष स. नाईक

फवारे हास्याचे (१)

पाहत असतां सिनेमा ‘सिंघम’ अविरत चघळत होतो चिंगम हाणामारी दावी पडदा जोराने मी करी ओरडा गिळलें चिंगम, चिकटे गळ्यात धावत गेलो इस्पितळात . – (चिंगम – च्युइंग गम् ) सुभाष स. नाईक  

1 2 3 4 5 6 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..