नवीन लेखन...

चारोळ्या

मोहोळ

आठवणींचे मोहोळ

तरंग होऊन विरतात !

त्यातच तुझे असणे

क्षण सुखाऊन जातात !!


चेहरा

जगताना उघडे व्रण

मरणांनंतर उघडेपण !

संकृतीच्या मुखवट्यात

चेहरा जगतो क्षण !!

कवडसा

सू मारल्यानंतर डोहाचा तळ ळू लागतो

   काळाची पाने झडल्यानंतर अर्थ कळू लागतो !!

नवग्रहांच्या छायेतील स्व एक कवडसा

कळता कळता प्रवास हळूसंपून जातो !!

 

ब्रम्हांडाच्या हृदयात चिरत जाती

जसे धुमकेतूचे शेपटीचे व्रण

विदीर्ण मनास सतत डसती

बाजार बुणग्यांचे कोडगे मन !

 

 कोरड्या मातीला येण्या गर्भारपण

धरण उंचावून उखडावे गावपण

दूर रानात उन्हात रडावे कुपोषण

संगींनीच्या हाती झुले न्यायपण !

 

 कटोरा हाती खरडून जमीन

रडे बालपण फुलण्या आयुष्य !

शिट्टी धुराची सांगे वेळ

रिझविण्या नजरा आयुष्याचा खेळ !

 

नाळ तोडून ईर्षा स्वप्नांची सुरू होते

श्वासांच्या उलघालीवर नाती विसरते !

पंखातील बळ हळू ओसरल्यावर

नात्यांची ओढ वाढत पैलतीर पाहू लागते !!

 

आयुक्त बदलताच “ बार “ वर

अचानक धाड टाकली जाते !

“ मायेचा “ हात सदैव असावा

सूचना फक्त दिली जाते !!

 

पायरी पायरी वर चढताना ध्यास

प्रमेय “मी” भोवती परिघाची आस !

बिंदूतून त्रिज्या रेघ शोधत बीज

वर्तुळ उतरणीला म्हणते पुरे आता श्वास !!

 

मी वेडा वेचीत होतो शिंपले

शिंपल्यात तुझे रूप लपलेले !

वाळूत ओल्या उमटले ठसे

ते घाव होते नाकारलेले !!

 

पेटवली मी वात जरी न कळले

 आता ज्वाळ जाळू लागला मला !

माझ्याच सांजवेळी माझीच भुते

वटवाघूळ होऊन डसू लागली मला !!

 

बंद डोळे बंद मूठ घेऊन

पहिला प्रवास सुरु होतो !

लपविण्यात श्वास खर्ची घातले

तरी उघड्यावरच प्रवास संपतो !!

 

पहाट भिजल्या पानावर

दव चढवी लाज सुंदर !

ऋतु घाली न्हाहू हळू

जागवी पालवी हुरहूर !!

 

रन्ध्रांचे स्पंदन

एकरूप व्हावे !

तुझे श्वासांचे सूर

एकच गाणे व्हावे !!

———-

लय ठेका

तरंग व्हावा !

एकच साद

समेवर यावा !!

 

जाणिवेतून सुरू झालेली स्पर्धा

कळत नकळत मैत्री नात्यात होते !

धावणे कशा-कुणासाठी पोट ठरवते

पंख गळल्यावर सुटकेसाठी धडपडते  !!

           

जाणीव नेणीव हे प्रवासातील धोंडे

ठेच लागल्याशिवाय “आई”  “मी” !

नात्याचे मोल रक्ताशिवाय कळत नाही

जगण्यासाठी हाव पाठ सोडत नाही !!     

 

उदंड झाली देवळे

नुरले कुठे देवत्व !

लक्ष्मीच्या तालावर नाचे

सरस्वतीचे कवित्व !!

                             

वेदनेचे तरंग शब्दातून

करती नर्तन ओठावरती !

सत्कारात भिजताना न पाहे

पोटी आग प्रेते जळती !!

 

वर्षानुवर्षे चाले सोहळा

किर्तनाचा रंग वेगळा !

दिंडी ग्रंथांची निघे रंगात

कच्चे मडके रडे कुंभार मनात !!

 

अश्रुंचे नभ बरसले खांद्यावर

अनेकांचे झाले मोकळे आकाश !

चंद्र त्यांनी पाहिला कलश ठेवून

कोठ शोधू माझेच हरवलेले आकाश !!

 

 ज्योतीनेच आपल्या तेजाने प्रकाशित केले

प्रकाशने मात्र ज्योतीलाच व्यापले !

 डोक्यावर अंधार तसाच मूर्तिने पाहून

 डोळे मिटून कपाळावरच्या रेघांनी भाग्य म्हटले !!

 

बरसली तेव्हा ती रोडावलीच होती

भेगा पडल्या डोळ्यांना सुखावत होती

करपले हात ओंजळीत साठवत होते

कुशीत सुखावल्या पाकळीला चुंबत होते !!

 

परतीचा ग पाऊस 
छळतो येड्यावाणी
पुन्हा भेटेल ना भेटेल 
प्रेमाच्या वर्षावात आणी डोळा पाणी !!

 

म्हणे घे पदरात आता
ठेव साठवून जपून 
आगळीक तुला वाटेल
आलो तुझी ओढ पाहून !!

 

मरणारे मेले 
भोगणारे भोगतात 
कावळे मात्र ” विधी” व्रत 
चोच मारुन फडफड करतात !

 

काळ बदलला विश्वरुप कधीच न कळले

राम ” हरवलेलेहराम” माजू लागले !

चोच मारल्या कलेवराचे पुजेच्या बाजारात

जीवंतपणी मरण देणारे ” मोल ” ठरवू लागले !

 

आईची कूस नासवून

घाव घालून हिरवे पदर फाडले

जिने घडविले वाढविले तिलाच

विद्रूपतेचे दर्शन घडविले

पोटचा गोळा गिधाड बनले

 

कण कण  आजवर वेचत फुललो

सावली घेरल्या क्षणी देत चाललो

असहायतेने नकळत रमल्या नात्यास  

संवेदनेने अर्थ देत माझे म्हणालो !!

 

सारेच मुके प्रेमाने जवळ येतात

न दिसता ही स्पर्श अर्थ सांगतात

आपलेच दुरावलेले हाताच्या स्पर्शात

पापण्या भरल्या डोळ्याने आकाश बघतात !!

 

मंद झुळूक क्षण सांजेला साद घाले

मिटले पंख आकाश कवेत घेउ लागले

पंचारती गात्र गात्र फुलवून सजले

दूर फांदीवर चमकून बिंब दवात न्हाले !!

 

सर्वस्व माझे घेतले तरी

तृष्णा ना कधी क्षमे

ना थांबे तो घाव अघोरी

ठेच लागे हाय आई म्हणे !

 

शब्दच फक्त रडती

हात मात्र थरथरती

विवस्त्र झाले तरी

कल्पनेचे खेळ करती !

 

तुझ्या देठावरील दवाचा चंद्र

माझ्या ओठांच्या क्षितिजावर आला !

सागर उचंबळून नर्तन करीत

लाटांच्या हातांनी किनार्‍यास बिलगला !!

 

श्वासांची रिमझिम रिमझिम

हृदयातील  निशब्द धडधड !

मोकळ्या केसांत चांदण्यांच्या

झुले दोन जीवांचे झुंबर !!

 

तुझ्या डोळ्यातील पाऊस
मी ओंजळीत हळूवार धरला !
हुंदक्याला पालवी फुटलेली पाहून 
निवडूंग ही गहिवरून बहरला !!

 

शेवाळ दूर होता
दिसे डोहाचा तळ !
भीती दूर करता
फुले आत्म बळ !!

 

बिल्वदलात नेत्रांच्या नटून

मोहरे गंध प्रकाश रूप !

उघडून कवाडे उडे पाखरू

वारा मंद होई चांदणे रूप !!

 

अरविंद बुधकर

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..