नवीन लेखन...

हलकं फुलकं लेखन. यात विनोद वगैरे सगळं आलं

कुठला राग केंव्हा ऐकायचा ??

कुठला राग केंव्हा ऐकायचा ?? हा प्रश्न पडत असेल तर हा तक्ता उपयोगी पडू शकेल. या मधे काही मह्त्त्वाचे राग वेळेनुसार दिलेले आहेत […]

दिवाळीचा फराळ

माझ्या भावाने लिहिलेली कविता… दिवाळीची हळुहळु पुर्ण झाली तयारी, झाडलोट, साफसफाई तोरणे लागली दारी. फडताळात फ़राळानी भरल्या बरण्या, सजल्या साऱ्या वृद्ध अन बाया तरण्या. पण हा कसला गोंधळ नी आदळआपट? फडताळाच्या कड्यांची कर्कश खाटखुट? हळुच डोकावून पाहिले स्वयंपाक घरात, बुंदिचा लाडू टणकन आदळला कपाळात. आत सगळ्या फराळाची जुंपली होती लढाई, चुलीवरची तेलाची उलटली होती कढई. तिखट […]

सोबत

आजकाल कुणाशीही बोलावसं वाटत नाही. खूप खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहरे. ज्याची पाठ फिरेल त्याची निंदा करणारे. ह्यांची मानसिकता इतकी चीप असते ना की नको वाटतं … इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात? ह्यात आपले लोक पण असतात हे विशेष! ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला एडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका नकाराने बदललेले बघितले […]

आमचे लहानपणीची दिवाळी

लहानपणी सुगीची काम सुरु असताना थंडीची चाहूल लागली की घरापुढच्या अंगणात शेकोट्या पेटायच्या. माणसं अंगावर शाल चादरी पांघरून हात पुढं करुन जाळावर ऊब घेत शेकायची. बच्चे मंडळीवर शेकोटी जळत राहण्यासाठी लागणारा पाला, पाचट आणायची जाबादारी असायची. मग शेकताना शेकोटीवर साऱ्या गावाच्या चर्चा चालायच्या. कुणाला एवढं जुंधळं झालं. तमक्याच्या भुईमुगाला किती शेंगाचं घस लागलं इथपासुन ते अमक्याची […]

मजुरीनं मारलं

यावर्षी बळीराजाला, सोयाबिननं तारलं ! पण जगाच्या पोशिंद्याले, मजुरीनं मारलं !!१ … हजार रुपय एकरानं, मागील वर्षी सोंगलं ! दोन हजार एकरानं, मजुर यंदा बोंबलं !!२ … मळणीवाला म्हणतो मला, दोनशे रुपये पोतं ! मी म्हटलं त्याचा काय, आता जीव घेतं !!३ … आलं आभाळ, झाकण्यासाठी, ताडपत्री नेतो ! दोन हजारानं इथे त्याचा, खिसा कापला जातो […]

नवीन येणारी पुस्तके

छगन भुजबळ – अनुभव :- “बारामतीच्या करामती” विजय मल्ल्या :- “विश्व कर्जाचे – कर्ज तुमचे सल्ला माझा” शरदचंद्र पवार – व्यक्तिचित्रे :- “मी टिपलेली माणसे” निखील वागळे – नाटक :- “मालकाची जात अजित पवार – आत्मकथा- “स्वत:ची मोरी” कुमार केतकर – लघुकथा :- “अर्णब – एक दुःस्वप्न आणि इतर” राज ठाकरे – 1) “जाळाईदेवी माहात्म्य” (पोथी) […]

दिन दिन दिवाळी…

दिन दिन दिवाळी… गायी म्हशी ओवाळी… वसु बारसला ।।१।। दिन दिन दिवाळी… आरोग्य सांभाळी… धन त्रयोदशीला ।।२।। दिन दिन दिवाळी… दुःखाला पिटाळी… नरक चतुर्दशीला ।।३।। दिन दिन दिवाळी… लक्ष्मीला सांभाळी… अश्विन अमावस्येला ।।४।। दिन दिन दिवाळी… नववर्षाची नवाळी… बळी प्रतिपदेला ।।५।। दिन दिन दिवाळी… भावाला ओवाळी… यम द्वितियेला (भाऊबीज) ।।६।।

रामरक्षा आणि Android

रामरक्षेची जागा आता Android ने घेतली, त्या नादातच आजकालची कार्टी ऊशिरा झोपली…. माहीत नाही सीता कोण,भगवदगीता कोण, मात्र प्रत्येक हातात Latest आय फोन…. पुस्तकाची PDF झाली, रोज वेगळा BF अन रोज नवी GF आली… प्रगती होतेय सांगत घडणारी / बिघडणारी नवीन Online पीढ़ी आली… अंगठे दुखतायत आता Type करून मानसं भेटतायतं आता Skype वरुन… पाहुण्यांना भेटणं,पत्र […]

काजवा

आभाळ आपल आपणच पेलायच आपल्या वाटेवर आपणच चालायच कुणाची काठी हवी कशाला मनगटातली ताकद दिसू दे जगाला बसतील कधीतरी उन्हाच्या झळा अन् वाहेल मध्येच बेभान वारा सावली तेंव्हा तू शोधु नकोस आडोशाला जाऊन बसु नकोस उन्हाच्या झळांमध्ये तू रापुन जा बेभान वाऱ्यामध्ये तू मिसळून जा सोन नाही का विस्तावात चमकत सुगंध नाही का वाऱ्याने पसरत निर्भीड […]

उंदीर

शेतकरी घाम गाळून धान्य पिकवतो. पण हे धान्य शेतात पुरते तयार होण्याआधीच त्यातले ३५ टक्के अन्नधान्य चक्क उंदरांच्या पोटात गेलेले असते. पुन्हा धान्य साठवून ठेवले की त्यावर उंदराचा डोळा असतो, तो वेगळाच. जागतिक आरोग्य संघटनेच्या चार दशकाआधी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जगभरचे दरवर्षी ३० लाख टन अन्न उंदरांचे भक्ष्य बनते. इतके हे उंदीर येतात तरी कुठून? उंदरांच्या […]

1 23 24 25 26 27 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..