नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

आहारातील एकरुपतेचा अनुभव

सुमारे वर्षभरापुर्वीची गोष्ट आहे. मी आणि माझी पत्नी बाबांच्या मित्राकडे शिबीराला जात होतो. माझी तब्येत बिघडली होती. जुलाब होत होते. सकाळपासून पाच सहा झाले होते. तरीही शिबिराला गेलो होतो. सर्व औषधे हाताशी होती पण गुण येत नव्हता. रात्रीचे जेवण आले तेव्हा मनात विचार आला हे खाल्ले तर त्रास होईल पण सर्वांबरोबर आहोत तर न खाणे योग्य […]

पुरण पोळीचा गुणकारी उपवास

माझे वडील वैद्य अरविंद जोशी यांच्या सांगण्यात असे आले की एका वैद्याने एका दमेकरी पेशंटला १५ दिवस पुरणपोळी खायला सांगितली आणि त्याचा दमा गेला. ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता. माझे म्हणणे होते की डाळीचे पदार्थ खाल्ले की गॅसेस होतात. मग एवढे दिवस फक्त पुरणपोळी खाल्ली तर किती गॅसेस होतील. त्रास होईल. मात्र बाबा त्यांच्या म्हणण्यावर ठाम […]

मनाचा उपवास

शस्त्र, शास्त्र आणि पाणी हे घेणार्‍याच्या पात्रतेनुसार गुण आणि दोष उत्पन्न करतात. म्हणून शिकणार्‍याची बुद्धी शुद्ध करून घ्यावी असे वचन आहे. खरंच आहे. ब्लेडने पोट फाडू पण शकतो आणि पोटाचे ऑपरशनपण करू शकतो. ब्लेड कुणाच्या हातात आहे, त्यावर परिणाम अवलंबून असतो. शास्त्रदेखील तसेच युक्तीने वापरावे लागते. कायदा हा लवचिक असावा. नियम हा पाळण्यासाठी असावा, ठरवून उपास […]

आहारात मनाची एकरूपता हवी

मी गेली २५ वर्षे जेवताना बरेचवेळा मन अन्नाबरोबर एक करून (म्हणजे जेवताना इतर विचार न करणे, फक्त घास चावण्यावर लक्ष केंद्रित करणे) जेवतो मला याचा खूप फायदा झाला व होत आहे. […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 17

अष्टांग संग्रहातील मात्राशीतीय नावाच्या अध्यायातील हे श्लोक म्हणजे आयुर्वेदातील भौतिकशास्त्रच नव्हे काय ? विज्ञान विज्ञान म्हणजे दुसरे आणि काय ? उष्णतेमुळे पदार्थाचे प्रसरण होते आणि शीत स्पर्शाने पदार्थ आकुंचित पावतो, हा भौतिकशास्त्रातील नियम या श्लोकात वर्णन केलेला दिसतो. आपली दृष्टीची कक्षा वाढवली की सगळं स्पष्ट समजायला लागतं. सूर्याच्या उष्णतेच्या प्रभावाने स्रोतसांचा विकास होतो. जेवढा पाईप मोठा […]

पुनः एकदा पीसीओडी

मी पीसीओडीच्या मानसिक हेतुंबद्दल लिहायला सुरवात केली आणि छान मंथन झाले. काही स्तुती करणाऱ्या, तर काही अत्यंत कटू जहाल, तर काही अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया मिळाल्या. काहींचा सूर फक्त स्त्री मुक्तीवादी होता, काहींना यात धार्मिक वास आला, तर काही अगदी गंमतीशीर होत्या. म्हणजे हे तुम्ही आम्हालाच का सांगता, पुरूषांना देखील सांगा ना ! इथपर्यंत !! काल मी संप्राप्ती […]

कशासाठी – डोक्यासाठी, मेंदूच्या वाढीसाठी

हाडे ठिसूळ होऊ लागली की आपण लगेच कॅल्शियमच्या गोळ्या घेऊ लागतो, कारण हाडांमधील ९०% हिस्सा कॅल्शियमने बनलेला असतो. रक्तातील लोह (हिमोग्लोबिन) कमी झालेले दिसले की लगेच आयर्नच्या गोळ्या घेतो. पण मेंदूचे स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी आपण अशी काहीच काळजी घेत नाही. वास्तविक हाडे किंवा रक्तातील लोहापेक्षा कईक पटीने आपला मेंदू अधिक महत्वाचा आहे. म्हणूनच “सर सलामत, तो पगडी पचास” अशा म्हणी प्रचारात […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 16

दिवसा सूर्य असताना काय होते हे ग्रंथकारांनी सांगितले पुढे ते आणखी स्पष्ट करून सांगतात, परंतु, रात्रौ ह्रदय ( आशय) म्लान राहाते. आणि रस रक्त वाहून नेणारी स्रोतसे कमी कार्यशील असतात. मुख्य कोष्ठ देखील काहीसे अवरूद्ध असते. दिवसाच्या हालचाली जशा होतात, तशा हालचाली किंवा व्यायाम रात्रीच्या वेळी होत नाही. त्यामुळे स्रोतसांमधे क्लेदाची उत्त्पत्ती होते. धातूमधील किंवा आशयामधील […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 15

दिवसा (सूर्याच्या उष्णतेमुळे) प्राण्यांचे आशय ( म्हणजे ह्रदयादि सर्व अवयव) विकसित अवस्थेत असतात. क्रियाशील असतात. सूर्य उगवला की, कमळ उमलते. सूर्य मावळला की कमळ मावळते. ग्रंथकारांची सौंदर्य दृष्टी इतकी विलक्षण प्रतिभावान आहे, की शरीरातील अवयवाला ते कमळाची उपमा देतात. त्या अवयवांना ते ह्रदय म्हणतात. सूर्यनारायणांच्या प्रकाश आणि उष्णतेमुळे प्राण्यांचे ह्रत्कमळ प्रफुल्लित अवस्थेत असते. दिवसभरातील उष्णतेने आणखीन […]

मंगळसूत्र

मंगळसूत्र म्हणजे काळ्या मण्यांची माळ व त्याला एक किंवा दोन वाट्या. ह्या वाट्यांना मंगळसूत्रात व स्त्रीच्या आयुष्यात फार महत्व आहे. योग्य मंगळसूत्राची लांबी अशी पाहिजे की जेणे करून ते घातल्यावर वाट्या  बरगडी संपून पोट सुरु होते त्या ठिकाणी आल्या पाहिजेत. तेथे अनाहत चक्राचे स्थान असते. अनाहत चक्र मनाशी निगडीत असते. मंगळसुत्रातील वाटी ही गोलाकार घुमट (गोल […]

1 88 89 90 91 92 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..