कांजिण्यांवरील उपचार
कांजिण्यांचा सामना करताना फोडांच्या जागेवर येणा-या खाजेवर व तापावर नियंत्रण ठेवणे हे एक महत्वाचे आव्हानच असते. कोमट पाण्याने आंघॊळ करताना अंगाला लावण्यासाठी खाण्याचा सोडा किंवा डाळीचे पिठ वापरावे. हे उपायकारक व फायदेशिर असते. थंड पाण्याने आंघोळ करणे किंवा थंड वातावरणाने खाज वाढण्याची शक्यता अधिक असते. खाजखुजलीवर उपाय म्हणून डिफेंहिड्रामाईन (बेनाड्रील) किंवा हायड्रोक्सिझेन (ऍटारॅक्स) सारख्या गुणकारी औषधांचा […]
