नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग पन्नास

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 5

जसा संकल्प, जसे आवाहन तसे फळ हा नियम लक्षात ठेवावा. जसा योग करताना मनाला शरीराशी जोडणे महत्त्वाचे असते, तसे पूजा करताना मन, इंद्रिय आणि शरीर आत्म्याशी जोडले जाणे महत्त्वाचे आहे. अन्यथा ते फक्त एक कर्मकांड होईल.

पूजा करतानाचा भाव महत्त्वाचा ! मनात तो निर्माण करावा लागतो, भटजी मंत्र म्हणत आहेत, आणि यजमान मोबाईलवर बोलत आहेत, यजमानीण आपली नथ नीट करत आहे, अशावेळी झालेला संकल्प आणि आवाहन कोणाला हितकारक होईल ? जर पुरोहितांनी मनापासून मंत्र म्हटलेले असतील तर, त्यांना नक्कीच होईल. यासाठी आपले पूर्ण लक्ष आपण करत असलेल्या कार्यावरच असावे.

जसे एखाद्या आस्थापनामधे कोणी काम करत असेल, जर ते मनापासून केले गेले तरच त्यापासून आनंद निर्माण होईल, नाहीतर नुसते पाट्या टाकणे होईल. कामातला हा फरक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. मी ही करत असलेली कृती, पैसे मिळवण्यासाठी करत आहे, की कोणीतरी सांगितलेले काम म्हणून करत आहे, की या कृतीतून पूर्ण आनंद आणि समाधान मिळवण्यासाठी करत आहे, यातील हेतुनुसार फळ बदलत जाते.

तसेच मी जगतो आहे ते ईश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी की, टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी की, मरण येत नाही म्हणून जगतोय ? जगण्यासाठीचा उद्देश, संकल्प जसा असेल, तसे समाधान मिळत जाते. हेतू बदलला की जगणे ही धडपड वाटत नाही.

जशी देवपूजा, तशी देह पूजा
जसे देवाला स्नान घालताना मनात अत्यंत सात्त्विक भाव असतो तोच भाव आपण देहाला स्नान घडवताना जर निर्माण केला तरच ते स्नान घडते, नाहीतर नुसते आंघोळीचे कर्मकांड होते. हा देह त्याने दिलेला आहे, काहीतरी उद्दिष्ट ठेवून, त्याने मला जन्माला घातले आहे, आई बाबांना निमित्त बनवून त्याने मला जगवले आहे, इतरांना जे जमणारे नाही, असे एखादे कार्य त्याला माझ्याकडून घडवून घ्यायचे आहे, यासाठी, त्याने दिलेल्या वेळेत ( म्हणजे शंभर वर्षात ) ते कार्य जाणून घेऊन, त्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे, यालाच जीवन ऐसे नाव.

आपण केलेले प्रत्येक कार्य त्यालाच अर्पण करायचे असते, तुझे तुलाच अर्पण ! म्हणूनच तर पूजा संपल्यावर आपण म्हणतो, “श्रीकृष्णार्पणमस्तु ” ! प्रत्येक म्हणजे हे सर्व कार्य भगवंताच्या इच्छेने मी करत आहे, त्याचे मिळणारे सर्व फळ मी त्याला देत आहे. त्यानंतर तो जे काही मला परत देईल, त्यात मी संतुष्ट होणार आहे. हा भाव देवपूजा पूर्ण होईपर्यंत असावा.

एखादा मॅनेजर आपल्या हाताखालच्या कामगारांकडून जे काम करवून घेतो, ते आपल्या मालकासाठी. स्वतःसाठी नाही. तसंच आहे. ड्यूटी संपली की सर्व अहवाल मालकाकडे सुपुर्द करून ठरलेला पगार घेऊन आनंदाने घरी जातो.

बारावीला प्रवेश घेतला, वर्षभर अभ्यास केला, त्याचा निकाल हाती आला, हे माझ्या कर्मानुसार मिळणारे फळ असते, ते त्याला अर्पण केले की निराशा येत नाही, आणि ‘मी मार्क्स मिळवले,’ हा अभिनिवेश पण उत्पन्न होणार नाही. भगवंत गीतेमधे हेच सांगतात, तू तुझे कर्म करीत रहा, फळाची अपेक्षा ठेवू नकोस, तुला तुझे फळ मी नक्की देणार आहे.

संकल्पानुसार कार्य करत राहिले की शेवटच्या क्षणी रडायची वेळ येत नाही. यासाठी जीवनात नेहेमी आनंदाने जगण्याचा संकल्प महत्त्वाचा !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
30.05.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..