नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

कंबर, पाय, दात दुखण्यांवर उपाय

बारीकसारीक व्याधींमध्ये पाय, कंबर, दात दुखणे असले प्रकार मोडतात. म्हटले तर या व्याधी असतात अगदी किरकोळ पण आपल्याला बेचैनी देण्यास त्या पुरेश्या ठरतात. दात दुखणारा माणूस अन्य कशातही लक्ष घालू शकत नाही तसेच कंबर दुखणारा कोणतीच हालचाल सहज करू शकत नाही. मात्र किरकोळ पण वेळच्या वेळी केलेल्या उपचारांमुळे या कटकट्या स्वरूपाच्या दुखण्यातून मुक्तता मिळविता येते. पाय […]

सुडौल बांध्यासाठी लायपोसक्शन

गेल्या दोन दशकांमध्ये चरबी कमी करण्याबद्दलचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यालाच लायपोसक्शन म्हणतात. यामध्ये चरबी कायमची कमी करता येते व शरीरालापण सुडौल बनवता येते. समाजात वावरताना स्वाभिमानाने, आत्मविश्वाासाने वागता येते. सुडौल व तंदुरुस्त शरीर हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. नियमित व्यायाम करूनही काही व्यक्तींमध्ये जास्त चरबी असते. ती कुठेही असू शकते, तर काही विशिष्ट ठिकाणीही असू […]

याला जीवन ऐसे नाव भाग ३६

पाण्याची प्रशंसता भाग एक पाणी म्हणजे जीवन जर योग्य वेळी, योग्य काळी, योग्य स्थळी, योग्य मात्रेमधे प्यायले तर ! हे विश्व पाण्यातूनच निर्माण झाले आहे. प्रत्येक प्राणीमात्राला जगण्यासाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे. असे पाणी न मिळाल्यास तोंडाला कोरड पडते, शरीर चैतन्यहीन होते. अवयव शिथील होतात, आणि शेवटी मृत्यु येतो. पाण्याशिवाय कोणत्याही प्राण्यांचे कार्य चालूच शकत […]

दहा गोष्टी आरोग्याच्या

निरोगी आरोग्यासाठी १० उपयुक्त टिप्स… सकाळी उठल्यावर पाउण इंच आल्याचा तुकडा चावून खाल्ला कि शरीराची अंतर्गत ताकद वाढायला फार मदत होते. सकाळी उठल्यावर खूप पाणी पिण्यापेक्षा एक फळ खा. रात्रभर दमलेल्या हृदयाला त्याने शक्ती मिळते. दिवसभरात खूप पाणी पिण्याचा सल्ला काहीजण देतात. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणे हे किडणीसाठी धोकादायक आहे. अनावश्यक अतिपाणी म्हणजे जास्त पाणी पिणे हे मधुमेह्सारख्या रोगाला […]

हिमोग्लोबिन – भाग २

हिमोग्लोबिनमधला हिम हा भाग फुफ्फुसातील ऑक्सिजनचे परिवर्तन ऑक्सिहिमोग्लोबिनमध्ये करतो. उतीमध्ये पोहोचल्यावर ऑक्सिजनचा दाब जिथे कमी असेल व कार्बनडाय ऑक्साईडचा दाब वाढला असेल तिथून तो ऑक्सिजनबरोबर मुक्तक होतो. त्यानंतर कार्बनडाय ऑक्साईडबरोबर संयोग होऊन फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो व कार्बनडाय ऑक्साईड वेगळा होतो आणि उच्छ्वासाद्वारे शरीराबाहेर पडतो. हिमोग्लोबिनमार्फत ऑक्सिजन घेणे आणि सोडणे ही प्रक्रिया सतत सुरू असते. बोनमॅरोमधील रंगपेशींना लोह […]

विटामीन ‘बी’चे महत्त्व

शरीरासाठी विटामिन्स किती महत्वाचे असतात ते लहान असताना आपल्याला शाळेत शिकविले जाते. तसे तर प्रत्येक विटामिनचे आपले असे महत्व असते. परंतु, आज आपण या लेखाद्वारे विटामीन ‘बी’चे महत्व जाणून घेणार आहोत. विटामीन ‘बी’ आपल्यातील ऊर्जेची पातळी वाढविते. त्याचबरोबर बुद्धी तल्लख ठेवण्यास मदत करते. चला तर, जाणून घेऊया अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्यात विटामिन ‘बी’ची भरपूर […]

तोंडाच्या दुर्गंधीवर सोपे उपचार

कधी – कधी असं होतं की आपल्या समोर उभी असलेली व्यक्ती आपल्याशी बोलण्यासाठी तोंड उघडते तर तिचे तोंड उघडताक्षणी तिच्या तोंडातून दुर्गंधीचा एक तीव्र दर्प आपल्या श्वासांना भिडतो आणि आपण हैराण होता. अशा वेळी आपण मोठ्या संकटात सापडता कारण त्या समोरच्या व्यक्तीला तिच्या तोंडातून येणाया दुर्गंधी बद्दल सांगूही शकत नाही आणि तिच्या तोंडातून येणाया घाण दर्पाला […]

हिमोग्लोबिन – भाग १

रक्तात लोह वाहून नेणारं प्रोटिन असतं, त्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो. हिम म्हणजे लोह आणि ग्लोबिन हे एक प्रोटिन आहे. हिमोग्लोबिनचं मुख्य कार्य आहे, सर्व पेशींना रक्तातून शुद्ध ऑक्सिजन पुरवणं आणि पेशींमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साइड पुन्हा रक्ताद्वारे फुफ्फुसांपर्यंत आणणं. हे हिमोग्लोबिन आपल्या रक्तातील लाल रक्त पेशींमध्ये असतं. रक्तातील हिमोग्लोबिनची योग्य मात्रा आपलं जीवनकार्य सुरळीत ठेवते. प्रौढ […]

याला जीवन ऐसे नाव भाग ३५

निषेधार्ह पाणी भाग तीन नाम्बु पेयमशक्त्या वा स्वल्पमग्निगुल्मभिः ।। पाण्डूदरातिसारार्शोग्रहणीदोष शोथिभिः । ऋते शरदन्निदाभ्यां पिबेत्स्वस्थोऽपि चाल्पशः ।। वैद्यानाम शारदी माता असं ओळखला जाणारा शरद ऋतु आणि अंगाची लाही लाही करणारा ग्रीष्म ऋतु हे दोन ऋतू सोडून स्वस्थ माणसाने देखील पाणी अल्पच प्यावे. असं अगदी स्पष्टपणे वाग्भटजी म्हणत आहेत. आता शरद ऋतु आणि ग्रीष्म ऋतु कोणते ते […]

पाठदुखी आणि ताण

पाठदुखी म्हणजे खालच्या बाजूला पाठ दुखणे (Lower Back Pain), पाठीवर ताण येणे किंवा पाठीला अस्वस्थ वाटणे होय. पाठदुखीमधे पाठीचा कणा किंवा स्नायू दुखावतात. ही व्याधी ब-याचदा मानसिक ताणामुळे सुरू होते. पाठीच्या कण्याजवळ जे मोठे स्नायू असतात ज्याचा पाठीच्या कण्याला आधार असतो ते दुखावल्या मुळे किंवा त्यावर ताण आल्याने पाठदुखी होते. खरोखरच दुखापत झाली असेल तर ती […]

1 103 104 105 106 107 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..