नवीन लेखन...

प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग २१

जेवणानंतर लगेच झोपल्याने कफ वाढतो. कफ वाढतो, म्हणजे खोकल्यातून बाहेर येतो तो कफ नव्हे हो! हे एव्हाना आपल्या लक्षात आलं असेलच ! हा कफ म्हणजे विकृतरीत्या वाढलेला कफ दोष. जो प्रमेहाचे मुख्य कारण आहे. मधुमेह हा ज्याचा एक उपप्रकार आहे, त्याला प्रमेह म्हणतात. ग्रीष्म ऋतु सोडला तर दुपारची झोप वर्ज्य सांगितली आहे. ग्रीष्मात बाहेर उष्णता खूप […]

प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग २०

प्रमेहामधे नुसता जिभेवर संयम ठेवून चालत नाही. झोपेवर पण संयम ठेवावा लागतो. आपल्या मूळ श्लोकातील आस्यासुख शब्दानंतरचा दुसरा शब्द स्वप्नसुख. स्वप्न या शब्दाचा अर्थ निद्रा, झोप. नेहेमीची शांत झोप लागणे वेगळे आणि लोळतलोळत पडणे वेगळे! नेहेमीची शांत झोप आवश्यकच आहे. आरोग्याच्या प्रमुख घटकामधे ती आहार आणि ब्रह्मचर्याबरोबर स्विकृत झालेली आहे. झोप अशी हवी की, तिला अन्य […]

प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग १९

खावे. पण गरज असेल तर खावे. खावे. पण आवडत असेल तर खावे. खावे. पण हितकर असेल तर खावे. खावे. पण सहज उपलब्ध असेल तर खावे. खावे. पण भूक असेल तर खावे. खावे. पण पचवू शकत असेल तर खावे. खावे. पण तयार करता येत असेल तर खावे. खावे. पण जिभेला चव असेल तर खावे. सगळ्या यातना काढतोय […]

प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग १८

आस्यासुख या शब्दावरून आठवले, आस्य या शब्दाचा एक अर्थ तोंड, मुख असा सुद्धा होतो. म्हणजे आपण आस्य सुख या शब्दाने जीभेचे चोचले पुरवणारे सुख जे कफ वाढवणारे असते, ते सुख प्रमेहाचा हेतु असते, असे म्हणायलाही हरकत नाही. जेव्हा ग्रंथ लिहिले गेले तेव्हा जीभेचे फार चोचले नव्हते, त्यामुळे ग्रंथकारांना हा मुद्दा फार भर देऊन सांगावासा वाटला नसेल. […]

प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग १७

समर्थ रामदास स्वामी म्हणतात, देहे दुःख ते सुख मानीत जावे…. सुखाच्या आमच्या कल्पना एवढ्या बदलून गेल्या आहेत की खरं आणि शाश्वत सुख कुठे मिळेल असा विचार करायला सुद्धा वेळ नाही कोणाकडे ! प.पू. गोंदवलेकर महाराज आपल्या प्रवचनामधे म्हणतात, सुखापेक्षा समाधान महत्वाचे. सुख हे न संपणारे असते. एक सुख भोगून झाले की, दुसरे हवेसे वाटते. जिथे सुख […]

प्रमुख आहारसूत्र – भाग १६

सुखाच्या कक्षा वाढवित जाणे, सुखाचा हव्यास वाढवित नेणे, हा प्रमेहाचा हेतु आहे. यालाच आस्यासुख असे ग्रंथकार म्हणतात. कुठुनही शरीरातील कफ वाढण्यासाठी मदत करणे हा प्रमेहाचा हेतु आहे. असे ग्रंथकार म्हणतात. आस्या सुख म्हणजे हालचाली करू नयेत, दोन्ही हात हलवत काम करण्यापेक्षा, एकाच हाताने काम करावे, असे वाटणे, हे आस्यासुखच! अहो, कंप्युटरचा माऊस एकाच हाताने हलवित बसण्यापेक्षा […]

प्रमुख आहारसूत्र – भाग १५

प्रमेह हा मुख्य आजार. त्याच्या एकुण वीस उपप्रकारामधे एक म्हणजे मधुमेह हा आजार येतो. हा आजार होऊ नये यासाठी काय काय करू नये, (म्हणजे अपथ्य ) सांगितले आहे ते आपण पाहातोय. व्यवहार आणि ग्रंथ यामधे किती अंतर आहे पहा. पथ्य आणि अपथ्य या शब्दांचे किती चुकीचे अर्थ वापरले जातात. “मधुमेह एकदा झाला की साखरेचे पथ्य सुरू […]

प्रमुख आहारसूत्र – भाग १४

अमुक रोग ‘कमी करण्यासाठी’ आयुर्वेदात काय औषध सांगितले आहे, असा प्रश्न विचारायला लागू नये, यासाठी, रोग होऊच नये यासाठी आयुर्वेद नीट समजून घेणे आवश्यक आहे. आयुर्वेदात सांगितलेले उपाय हे प्राधान्याने रोग होऊ नयेत, यासाठी सांगितलेले आहेत, हे आधी लक्षात घ्यावे. केवळ रोगाची लक्षणे कमी केले की झाले असे नव्हे तर, जो रोग समूळ नष्ट व्हायला हवा, […]

प्रमुख आहारसूत्र – भाग १३

‘घुसळण्याची’ प्रक्रिया महत्वाची. दही ‘घुसळण्याच्या’ प्रक्रियेमधे आत तयार झालेला वायु बाहेर पडतो, नंतर त्यातील लोणी बाहेर येते. या प्रक्रियेमधे थोड्याफार प्रमाणात अग्निचा संचार होतो. घर्षण झाले की अग्नि तयार होतो. जसे खूप बोलल्यामुळे घसा गरम होतो, तळहात एकमेकांना घासले की हात गरम होतात, कपालभाती केली की छाती गरम होते, भ्रामरी केली की कपाळ गरम होते, खूप […]

प्रमुख आहारसूत्र – भाग १२

प्रमेह हा कफाशी संबंधित आजार आहे. कफ दोषाचं विकृत झाल्यानंतरचं नाव क्लेद. क्लेद वाढवणाऱ्या पदार्थामधे दह्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.पण दही न आवडणारा प्राणी तसा दुर्मिळच. दही म्हटलं की फक्त एकच प्राणी नाखुश असतो, तो म्हणजे आयुर्वेद वैद्य. खरंतर त्याच्याही जीवावर येतं, दही खाऊ नका म्हणून सांगायला. पण काय करणार? जे सत्य आहे ते कोणीतरी शेवटी […]

1 29 30 31 32 33 53
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..