नवीन लेखन...

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग सहा

आपण घेतलेल्या अन्नाला शरीराला आवश्यक असणाऱ्या स्वरूपात बदलवणे आणि पुढे ढकलणे हे तोंडाचे काम. त्यासाठी जीभ, पडजीभ, दात, दाढा, गाल, टाळू हे अवयव मदत करीत असतात. बत्तीस दातांना त्यांचे काम करण्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक ठरते. सावकाश जेवा, याचा आणखी एक अर्थ अभिप्रेत आहे, “नीट चावून चावून गिळा.” यासाठी दात कणखर, बळकट असणे आवश्यक आहेत. हल्ली […]

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग पाच

आतापर्यंत मनापासून खाल्लेले अन्न तोंडात आलेले आहे. असे गृहीत धरू. धान्यापासून आपण अन्न रूपांतरीत केले, आपल्या जीभेला, मनाला, शरीराला हवे तसे बदलवून घेतले, आणि घास करून तोंडात घेतला. पहिली प्रक्रिया सुरू होते ती लाळेची, ज्याला आयुर्वेदात बोधक कफ असे म्हटलेले आहे. रसनेंद्रियामार्फत त्याचे बोधन होऊन त्या पदार्थाला पचवायला जे जे द्रव्य पुढे आतमधे हवे आहे, त्याचा […]

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग चार

आपण खातोय त्या पदार्थाचे ज्ञान इंद्रियांना अगोदर होते. शब्द, स्पर्श, रूप, रस गंध या तन्मात्रा द्वारे, पृथ्वी आप तेज वायु आणि आकाश महाभूतांची आहारातील अनुभूती निर्गुण आत्म्यापर्यंत, चंचल मनामार्फत नेली जाते. आणि जी अनुभूती येते तिला “समाधान” म्हणतात. जेवताना हे समाधान मिळाले पाहिजे. नाहीतर “माझ्या श्योन्याला खाल्लेले अंगालाच लागत नाही” अशा तक्रारी सांगणाऱ्या अनेक माता असतात. […]

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग तीन

स्वयंपाकघरात मधे वाढलेली राईस प्लेट थेट टेबलावर आणून समोर ठेवणे आणि टेबलावर ताट ठेवून एकामागून एक पदार्थ आणून वाढणे, यात फरक आहे. पदार्थ कोणत्या क्रमाने वाढले जातात, त्या क्रमालाही महत्व आहे. सुरवात लिंबू मीठाने करून शेवट वरणभातावर वाढलेल्या तुपाने करावा. तूप वाढून झाले की बसलेल्यांनी समजावे, आता वाढायला येणारी आणखी कोणी नाही. आता फक्त “हर हर […]

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग दोन

प्रत्यक्ष इंद्रिय पचनाला ताटातच सुरवात होते. आपल्या हातानी, बोटांनी आपण आहार जेवायला सुरवात करतो. म्हणजे त्या अन्नाचा स्पर्श आपण अनुभवतो. एखादा पदार्थ गरम, गार, कोमट, कडक, मऊ, त्याचा घट्टपणा, पातळपणा हे आपण बोटांमार्फत अनुभवतो. सुरी काट्या चमच्याने जेवत हा अनुभव घेता येईल का ? नाही. आणि हातपाय पाण्याने धुवुन जेवायला बसावं हे ओघाने आलंच. आणि नखं […]

इंद्रिये अवयव आणि आहार – भाग एक

आपल्या पचनाचा प्रत्येक इंद्रियांशी संबंध असतो. पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये आणि मन यांचा पचनाशी कसा संबंध असेल ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. या सगळ्यांमधे महत्त्वाचे आहे, मन ! मनामार्फत अनुभूती येत असते. जर हे मनच जागेवर नसेल, तर आपण काय खातोय, त्याची चव कशी असणार, हे अनुभवले नाही, तर त्याचा होणारा परिणाम वेगवेगळा होणार. जेवताना, खाताना […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 19

गणपती बाप्पाचा सकाळच्या महापूजेचा नैवेद्य पंचपक्वान्नाचे भरलेले ताट असते. पण सायंपूजेचा नैवेद्य काय असतो ? तर वाटीभर पंचखाद्य किंवा एखादा लाडू. कशासाठी ? जे जे देवासाठी, ते ते देहासाठी. या न्यायाने देवाच्या भोजनाचा नियम आपल्यालादेखील तसाच लागू होतो. सकाळचे भोजन आणि सायंकाळचे भोजन याच प्रमाणात घ्यावे, असे आपली संस्कृती पण सुचवते. कमळ कधी उमलते ? कमळ […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 18

दिवस हा देवांचा आणि रात्र ही राक्षसांची, जंतुंची… सर्व शुभकार्ये दिवसा आणि सर्व निषिध्द कामे रात्रीची. कारण ? ….. त्यांचा रात्रीस खेळ चाले… काही भारतीय धारणा अश्या आहेत, ज्याचा पुरावा दाखवता येत नाही. पण त्यांचे अस्तित्त्व भारतीय संस्कृतीला मान्य आहे. आता “अणु” कुठे दाखवता येतो ? ती धारणा आहे. दाखवता येणार नाही. गृहीत धरून विज्ञानातला अख्खा […]

स्त्रियांनो… आरोग्याकडे लक्ष द्या

आयुर्वेदाचा उगमच मुळी आपल्या स्वैपाकघरातुन झाला. आणि त्यागाची मुर्ती म्हणुन जिच्याकडे पाहिले जाते ती स्त्रीच्या हातात स्वतः तिचे, तिच्या घरातील माणसांचे आणि अप्रत्यक्षरीत्या ती वावरत असलेल्या समाजाचे भवितव्य अवलंबून असते. जर एखादया स्त्रीनेच जर घरातील माणसांचे आरोग्य सुधारायचे ठरवले तर त्यासाठी पहिल्यांदा तिला स्वतःमध्ये जाणीवपूर्वक बदल हे करायलाच हवेत. (शिळे अन्न न खाणे, सर्वानसोबत आपणपण सकाळ- […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 17

अष्टांग संग्रहातील मात्राशीतीय नावाच्या अध्यायातील हे श्लोक म्हणजे आयुर्वेदातील भौतिकशास्त्रच नव्हे काय ? विज्ञान विज्ञान म्हणजे दुसरे आणि काय ? उष्णतेमुळे पदार्थाचे प्रसरण होते आणि शीत स्पर्शाने पदार्थ आकुंचित पावतो, हा भौतिकशास्त्रातील नियम या श्लोकात वर्णन केलेला दिसतो. आपली दृष्टीची कक्षा वाढवली की सगळं स्पष्ट समजायला लागतं. सूर्याच्या उष्णतेच्या प्रभावाने स्रोतसांचा विकास होतो. जेवढा पाईप मोठा […]

1 28 29 30 31 32 56
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..