नवीन लेखन...

याला जीवन ऐसे नाव भाग ३७

पाण्याची प्रशंसता भाग दोन जेवणानंतर पाणी प्यायल्याने जाडी वाढते. असं वाग्भटजी म्हणताहेत. असं नव्हे तर व्यवहारातही तेच दिसते. जसं जेवायच्या अगोदर पाणी प्यायले की अग्नि कमी होतो, पचन मंदावते आणि कृश होतो. तसं जेवणानंतर पचन सुरू करण्याचे सिग्नल गेलेले आहेत, ( गाडीमधे प्रवासी जेव्हा पूर्ण क्षमतेने प्रवासी भरलेले आहेत, वाहकाने दोनदा घंटा वाजवलेली आहे, ) आणि […]

याला जीवन ऐसे नाव भाग ३६

पाण्याची प्रशंसता भाग एक पाणी म्हणजे जीवन जर योग्य वेळी, योग्य काळी, योग्य स्थळी, योग्य मात्रेमधे प्यायले तर ! हे विश्व पाण्यातूनच निर्माण झाले आहे. प्रत्येक प्राणीमात्राला जगण्यासाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे. असे पाणी न मिळाल्यास तोंडाला कोरड पडते, शरीर चैतन्यहीन होते. अवयव शिथील होतात, आणि शेवटी मृत्यु येतो. पाण्याशिवाय कोणत्याही प्राण्यांचे कार्य चालूच शकत […]

याला जीवन ऐसे नाव भाग ३५

निषेधार्ह पाणी भाग तीन नाम्बु पेयमशक्त्या वा स्वल्पमग्निगुल्मभिः ।। पाण्डूदरातिसारार्शोग्रहणीदोष शोथिभिः । ऋते शरदन्निदाभ्यां पिबेत्स्वस्थोऽपि चाल्पशः ।। वैद्यानाम शारदी माता असं ओळखला जाणारा शरद ऋतु आणि अंगाची लाही लाही करणारा ग्रीष्म ऋतु हे दोन ऋतू सोडून स्वस्थ माणसाने देखील पाणी अल्पच प्यावे. असं अगदी स्पष्टपणे वाग्भटजी म्हणत आहेत. आता शरद ऋतु आणि ग्रीष्म ऋतु कोणते ते […]

याला जीवन ऐसे नाव भाग ३४

निषेधार्ह पाणी भाग दोन नाम्बु पेयमशक्त्या वा स्वल्पमग्निगुल्मभिः ।। पाण्डूदरातिसारार्शोग्रहणीदोष शोथिभिः । ऋते शरदन्निदाभ्यां पिबेत्स्वस्थोऽपि चाल्पशः ।। वाग्भटजी अध्याय क्र.5 मधील श्लोक 13/14 मधे अगदी स्वच्छ आणि स्पष्टपणे परत परत म्हणतात, आणि ते सुद्धा रोगांची नावे सांगायच्या अगोदरच सांगताहेत, न अम्बुपेयम्….पाण्याचा अतिरेक टाळा. यापूर्वी, न पिबेत् सूर्येन्दु पवनम् अदृष्टम् । या श्लोकाची सुरवात त्यांनी “न” ने […]

याला जीवन ऐसे नाव भाग ३३

निषेधार्ह पाणी भाग एक काही श्लोकांचे अर्थ कळले नाहीत तरी ते द्यावेत असे वाटते. म्हणजे त्याविषयी वाचणाऱ्याच्या मनात शंका रहात नाही. जसे वाग्भटजी अध्याय क्र.5 मधील श्लोक 13/14 मधे म्हणतात, नाम्बु पेयमशक्त्या वा स्वल्पमग्निगुल्मभिः ।। पाणडूदरातिसारार्शोग्रहणीदोष शोथिभिः । ऋते शरदन्निदाभ्यां पिबेत्स्वस्थोऽपि चाल्पशः ।। यांनी पाणी पिऊ नये, कोणी ? ज्यांचा अग्नि मंद आणि अल्प आहे, ज्यांना […]

याला जीवन ऐसे नाव भाग ३२

अग्नि महत्वाचा ! ‘अग्निमिळे’ या ऋचेनेच संहिता ग्रंथाची सुरवात झाली आहे. एवढं अग्निचं महत्व ! पाणी शुद्ध करण्यासाठी जो अग्नि वापरला जातो, तो देखील शुद्धीकरणासाठी महत्वाचा मदतनीस आहे.तोही तसाच शुद्ध हवा. हो. अग्निमध्ये देखील थोडे सूक्ष्म फरक आहेत. सूर्य म्हणजे साक्षात अग्नि. पण प्रकटीकरणाची वेळ ठरलेली. त्यामुळे रात्रौच्या वेळी पाणी शुद्ध करायचे झाल्यास त्याचा उपयोग नाही. […]

याला जीवन ऐसे नाव भाग ३१

शास्त्रकार स्पष्टपणे सांगत आहेत. अतियोगेन सलिलं तृष्यतोऽपि प्रयोजितम प्रयाति श्लेष्म पित्तत्वं ज्वरितस्य विशेषतः। वर्धति आमतृष्णानिद्रा तंद्रा ध्मानांग गौरवम कासाग्निसादह्रल्लासप्रसेक श्वास पीनसम् ।। तहान लागली असताना सुद्धा ती ओळखता यायला हवी, तहान लागल्यानंतर पाणी जरूर प्यावे, पण जर का यावेळी देखील पाणी जास्त प्यायले गेले तर कफ आणि पित्त प्रकुपित होतात, म्हणजे वाढतात. विशेषत्वाने ताप आला असताना […]

याला जीवन ऐसे नाव भाग ३०

पाणी शुद्धीकरण भाग दहा ज्या भागातील पाणी पचायला खूप जड असते, अशा भागात पाणी खूप उकळावे लागते. एक सोळांश करावे. देश ऋतु, रोग यानुसार पाण्याची शुद्धी किती करायची हे ठरवून पाणी एक अष्टमांश, एक चतुर्थांश, किंवा तीन भागातील एक भाग आटवून दोन शिल्लक ठेवावे, वा निम्मे आटवावे. या प्रकारे शुद्ध केलेले पाणी वेगवेगळ्या गुणाचे असते. पाणी […]

याला जीवन ऐसे नाव भाग २९

पाणी शुद्धीकरण भाग नऊ या अति शुद्धिकरणाच्या भीतीमुळे काहीवेळा वाटतं आपणच आपल्या पोरांच्या पायावर धोंडा मारून घेत आहोत का ? ती शाळेची विहीर..विहिरीजवळ पोरांची गर्दी एकाने घागर भरुन पाणी काढायचे. बाकीच्यांनी आपल्या हाताची ओंजळ धरून रांगेत उभे रहायचे आणि त्या ओंजळीत ती घागर रिकामी व्हायची. चड्डीलाच हात पुसत, आणि खांद्याला नाक पुसत धावत वर्गात पहिले कोण […]

याला जीवन ऐसे नाव भाग २८

पाणी शुद्धीकरण भाग आठ पाण्यातील अशुद्धी घालवण्यासाठी आणखी काही बीयांचा वापर करतात. जसे निर्मळी या झाडाच्या बीया, किंवा शेवग्याच्या वाळलेल्या बीया. या बीया पाण्यात टाकून ठेवल्या की त्यातील औषधी गुणांमुळे पाण्यातील अशुद्धी दूर होतात. अगस्ती ताऱ्याचा उदय झाल्यानंतर पाणी शुद्ध होते, असेही ग्रंथामधे म्हटलेले आहे. ग्रह तारे यांच्या असण्याचा आणि नसण्याचा आरोग्याशी जवळचा संबंध आहे, असे […]

1 31 32 33 34 35 53
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..