माझे खाद्यप्रेम – १
स्वयंपाक हा विषय माझ्यासाठी फार जिव्हाळ्याचा आहे. अर्थात ह्यामध्ये करणं आणि खाणं असे दोन प्रकार पडतात. अर्थात दोनही प्रकार मला नेहमी आवडतात. पण शेवटी त्यातील दुसरा प्रकार माझ्या सर्वाधिक आवडीचा आहे. विविध चवींचा आस्वाद घेण्यासाठी माझी जीभ सदैव आतुर असते. म्हणजे तिखट, गोड, कडू, आंबट, तुरट , खारट अशा वेगवेगळ्या चवीचे वेगवेगळे पदार्थ डोळ्यासमोर आले की तोंडाला पाण्याची खळखळती धार सुरू होते. […]