नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

करिअर निवडीचे मानसशास्त्र

करिअरची निवड हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा महत्वाचा टप्पा असतो. अनेकांच्या करिअर निवडीच्या संकल्पना ह्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर ठरलेल्या असतात. बदलत असलेले जीवनमान, वाढत जाणाऱ्या गरजा आणि अपेक्षा, स्पर्धेची समस्या अशा अनेक कारणांमुळे करिअर निवडीच्या बाबतीत अनेक भ्रम आणि संभ्रम निर्माण होत जातात. […]

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ७ – पारिजात

पारिजातकाचे झाड हे शोभेचे झाड म्हणून बगीचा तसेच घराच्या आवारात लावले जाते. गावात बहुतांश लोकांच्या अंगणात पारिजातचे झाड असतेच. पारिजात झाडाच्या आसपासचे वातावरण अतिशय प्रसन्न असते. पारिजातकाचे फूल हे पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यफूल आहे. […]

राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन

पंधरा एकरांवर असलेल्या या गार्डनमध्ये तुम्हाला असंख्य भारतीय व परदेशी फुले पाहायला मिळतील. मुघल गार्डन आज पासून, म्हणजेच ५ फेब्रुवारीपासून ६ मार्चपर्यंत सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. […]

श्रीगणेशाचे आध्यात्मिक महत्त्व

गणपतीच्या चार हातात कुऱ्हाड, दोरी, मोदक आणि कमळ आहे. कुऱ्हाड, आध्यात्माच्या कुर्‍हाडीने इच्छेचा नायनाट करता येतो. दोरी हे आध्यात्मिक ज्ञान आहे, जे आपल्याला संसारापासून, भौतिक जगापासून दूर करण्यास मदत करते, ज्यामध्ये आपण गुंतलेलो असतो. मोदक हे साधकाला आध्यात्मिक साधनेतून मिळणाऱ्या आनंदाचे प्रतीक आहे. आणि कमळ म्हणजे आत्म-साक्षात्काराच्या त्या दैवी अवस्थेसाठी ज्याची प्रत्येक मनुष्य जाणीवपूर्वक किंवा नकळत इच्छा करतो. […]

‘मार्क झुकेरबर्ग’ चे यशाचे १० मंत्र

अनेक लोकांना वाटते की, फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गला एका रात्रीत यश मिळाले. मात्र, त्या लोकांचा हा गैरसमज आहे. कारण मार्क झुकेरबर्गने फेसबुक उभी करण्यासाठी खूप कष्ट उपसलेले आहेत. त्याचे फंडे वापरून तुम्हीही यश मिळवू शकता. […]

महात्सुनामीचे पडसाद

पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचं स्वरूप साफ बदलण्यास कारणीभूत ठरलेला हा आघात खगोलशास्त्र, भूशास्त्र, हवामानशास्त्र, जीवशास्त्र, अशा विविध शास्त्रांच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरला आहे. या विविध क्षेत्रांतील संशोधनातून या आघाताचं व त्याच्या परिणामांचं स्पष्ट चित्र हळूहळू उभं राहात आहे. […]

घराचं स्वप्नं साकारताना…..

आपल्या घराचं स्वरूप आणि रूप आपल्या अंतर्मनांचा आरसा असतो. आपल्या निवडलेल्या घरामुळे आपलं व्यक्तिमत्व देखील खुलून येत असतं. सौदर्याचा साक्षात्कार केवळ घरातच होतो असं नाही, तर अंतर्मनातही होत असतो. त्यासाठी घराची निवड करताना वरील सर्वच बाबींचा अभ्यासपूर्वक विचार करणं जरुरीचं असतं. […]

हायसिन – जीवसृष्टीयोग्य ग्रह

प्रा. सारा सिगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनानं, ग्रहांवर जीवसृष्टी अस्तित्वात असण्यासंबंधीच्या निकषांना वेगळंच वळण दिलं. हायड्रोजनयुक्त वातावरण असलेले ग्रहही जीवसृष्टीसाठी योग्य असू शकण्याची शक्यता या संशोधनावरून दिसून आली. विश्व हे नव्वद टक्के हायड्रोजननं भरलेलं असल्यानं, पृथ्वीपेक्षा आकारानं मोठ्या असणाऱ्या अनेक ग्रहांवर हायड्रोजनयुक्त वातावरण असण्याची शक्यता बरीच आहे. […]

बिदागी

लहानपणी हा पडदा जे जे दाखवायचा ते ते सारं खरं वाटायचं. अजूनही भावनाप्रधान पाणी येतच टचकन डोळ्यात कधीतरी खूप तीव्र, आतवर भिडणारं बघितलं की, पण त्यावर आता वाढत्या वयाचं लेबल अलगद लावायला शिकलोय मी! चित्रपटगृहाच्या अंधारात याच्याच आश्वासनावर कित्येक तास विनातक्रार घालविले आणि कळालेही नाही, कधी समृद्ध झालो तो! किती शिकवले या पडद्याने- अजूनही त्याची शाळा सुरूच आहे आणि माझ्या हातातील पाटी-पेन्सिलही. […]

डभईची लढाई (भाग पाच)

डभईच्या युद्धाला कारणीभूत झालेल्या मराठेशाहीतील अपप्रवृत्ती पुढील काळात कमी झाल्या नाहीत, त्या तशाच राहिल्या; आणि त्याचा अनर्थकारी परिणाम ३० वर्षांनी पानिपतावर दिसून आला. […]

1 97 98 99 100 101 241
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..