आपल्या समाज रचनेत विवाहित स्त्री काचेच्या बांगडी शिवाय राहणे समाज रचनेला मान्य नव्हते, पण जेव्हा त्यांना कळलं की बांगडीची काच विदेशी आहे, त्यांनी त्याचा त्याग केला. दोन वेळ खाण्याची भ्रांत, इंग्रजी हुकमशाहीचा ससेमिरा, नवरा दूर, मुली अल्पायुषी, दोन धाकट्या दिरांची आणि त्यांच्या बायकांची जवाबदारी आणि देशसेवा ही सगळी व्रत एकाच वेळी त्या माउलीने पेलली. […]
रामभाऊंच्या आक्रमक आणि तडफदार गायकीला ‘झंझावात’ हाच शब्द योग्य ठरेल. आयुष्याच्या अखेरपर्यंत पांढरी चार आणि प्रसंगी काळी तीन पट्टीमध्ये रात्री 9 ते पहाटे 4 पर्यंत, विलक्षण ताकदीने आणि दमसासाने गायची अद्भुत क्षमता रामभाऊंकडे होती. या सादरीकरणात कधी बालगंधर्व आणि मास्टर कृष्णरावांची लडिवाळ गायकी, कधी नोम तोम युक्त आलापी आणि लयदार तिहाया घेणारी आग्रा गायकी, कधी लयदार आणि बुद्धिनिष्ठ रंजक ग्वाल्हेर गायकी अशी चतुरस्र गायकी रामभाऊ श्रोत्यांपुढे अत्यंत सहज ठेवून थक्क करायचे. […]
रेल्वेनं गेल्या २० वर्षांत अनेक नवीन प्रवासी गाड्या सुरू केल्या. त्यांपैकी गेल्या ४ वर्षांत प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या गाड्या म्हणजे ‘दुरान्तो एक्सप्रेस’. ‘दुरान्तो’ हा बंगाली शब्द असून, त्याचा अर्थ दूर पल्ल्याची शेवटच्या स्थानकापर्यंत सतत धावणारी गाडी. या गाड्यांची सुरुवात ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना झाली होती. त्यामुळे पहिली दुरान्तो मुंबई-कलकत्ता सुरू झाली व हळूहळू भारतभरात अनेक मार्गांवर दुरान्तो […]
शून्याखालील २७३.१५ अंश सेल्सियचं तापमान म्हणजे भौतिकशास्त्रात संशोधन करणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण पदार्थाचं तापमान जसंजसं या विशिष्ट तापमानाच्या जवळ जातं, तसे त्या पदार्थाच्या गुणधर्मांत आश्चर्यकारक बदल होत जातात. निरपेक्ष शून्य तापमानाच्या जवळ त्या पदार्थाचं एका नव्या स्थितीत रूपांतर होतं. या स्थितीत, त्या पदार्थातले सर्व रेणू एकत्रित होऊन, त्या सर्वांचा एक मोठा रेणू झाल्यासारखा भासतो. पदार्थाची ही स्थिती अत्यंत विस्मयकारक आहे. […]
इंग्रजी सैन्याने अरकोट च्या नावबाबरोबर मिळून शिवगंगा च्या राजाची हत्या केली. आपल्या पतीच्या हत्येनंतर स्वतःच्या आणि आपल्या मुलीच्या बचावासाठी तसेच आपले राज्य परत मिळविण्यासाठी राणी वेलु नाचियार ८ वर्ष भूमीगत होती पण शांत बसली नाही. तिने विरुपाची येथील पलायकारर गोपाल नायक्कर, हैदर अली, राजे म्हैसूर आणि इतर राजांच्या सहाय्याने आपल्या सेनेचे गठन केले, ५००० चे सैन्य आणि दारुगोळा जमा करून तिने जोरदार लढा देऊन आपले राज्य परत मिळवले. […]
रेल्वेमुळे कमी खर्चात, बऱ्याच मोठ्या प्रमाणात अतिशय जलदपणे मालवाहतूक करता येते. पेट्रोल, डिझेलची बचत होते आणि हवेचं प्रदूषण टाळलं जातं. कोकण रेल्वेची ‘रो रो वाहतूक सर्व्हिस’ हे यामधले पुढचं पाऊल आहे. ही ६० ते ७० डब्यांची मालगाडी आहे. या मालगाडीत मालाने भरलेले ट्रक (ड्रायव्हर आणि क्लिनरसह) चढविले जातात. मुंबईजवळ कोलाड येथे या मालगाडीत ट्रक चढविले जातात […]
कोरोना महामारीमुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे ‘टाळे’ उघडताना केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले होते. हे पॅकेज देताना ‘आत्मनिर्भर भारत’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेची घोषणा केली. भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये एक मोठी क्रांती आणणारी ही घटना होती. यानंतर सबंध देशभरात ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेविषयी मोठी चर्चा सुरू झाली. […]
१९३२ साली गांधीजींच्या नेतृत्वात संपूर्ण देशभर अनेक आंदोलने सुरू होती. एक जुलुस असाच मातंगिनी च्या घरासमोरून गेला, बंगाली परंपरेनुसार तिने शंखध्वनी करून त्याचे स्वागत केले आणि त्या जुलूसचा एक भाग बनली. तामलूक मधील बाजारात एका सभेत मातंगिनी ने तन-मन-धन देशासाठी समर्पित करेन अशी शपथ घेतली. एक न शिकलेली विधवा स्त्री त्या क्षणी हजारो भारतीयांची प्रेरणा स्थान क्रांतिकारी बनली. […]
या एक हजार कार्यक्रमांच्या दीर्घ प्रवासात सतत तीस वर्षे ज्यांनी मला साथ दिली आणि कायम पाठिंबा दिला, त्या रसिक प्रेक्षकांचे ऋण तर मी फेडूच शकत नाही. त्यांच्या ऋणात राहणेच मी पसंत करेन. ज्याने माझा हा प्रवास जवळून पाहिला आहे, असा आजचा आघाडीचा संगीतकार कौशल इनामदार याने त्याची अनेक कामे बाजूला ठेऊन या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली म्हणून त्याचे आभार मानतो. […]
पृथ्वीवरील प्राणिसृष्टीवर वर्चस्व गाजवणारे डायनोसॉर हे सरीसृप या आघातामुळे नष्ट झाले आणि सस्तन प्राणी हे, त्यानंतर अस्तित्वात आलेल्या प्राणिसृष्टीचे महत्त्वाचे घटक बनले. या आघातानंतर, प्राणिसृष्टीप्रमाणे वनस्पतिसृष्टीत कोणता बदल घडून आला, याचं कुतूहल उत्क्रांतीच्या अभ्यासकांना आहे. हे कुतूहल काही प्रमाणात शमवू शकणारं एक संशोधन ‘सायन्स’ या शोधपत्रिकेत अलीकडे प्रसिद्ध झालं आहे. पनामा शहरातल्या (मध्य अमेरिका) स्मिथ्सोनिअन ट्रॉपिकल रिसर्च इंस्टिट्यूट या संस्थेतील पुराजीवशास्त्रज्ञ मोनिका कार्व्हॅलो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या संशोधनाचे निष्कर्ष लक्षवेधी आहेत. […]