जीवन संघर्षाचे दुसरे नाव आहे असे आपण नेहमीच म्हणतो. आणि ते अगदी बरोबर पण आहे. मानवी जीवन अनेक प्रश्नाने गुंतलेले असते. प्रत्येक जीव कुठल्यातरी विचाराने त्रस्त झालेला असतो. कुणाला संपत्ती कशी सांभाळावी याची काळजी असते तर कुणाला, आजच्या सांजेला तरी पोटभर भाकर मिळावी अशी आशा असते. […]
मोबाईलवरचा फोटो माझ्या संकटविमोचक मुलीला सेंड करुन ” पोळपाटावरचा जिन्नस झुम करुन पहा आणि कसा खायचा ते सांग ” असे कळवले. ताबडतोब तिचा फोन आला आणि आळीपाळीनी तिच्या इंन्स्ट्रक्शन घेत घेत आम्ही सिझलरला गिळंकृत केल. […]
आपण टीव्ही वर जेव्हा कार्यक्रम पाहतो तेव्हा आणखी काय काय दिसते? प्रत्येक चॅनेल आपले नाव, तारीख व वेळ दाखविते. याव्यतिरिक्त बर्याच वेळा टीव्हीचा पडदा इतर कशा-कशाने व्यापलेला असतो. हे ‘इतर’ म्हणजे काय? तर कार्यक्रमांसंबंधी आणि प्रयोजक कंपन्यांच्या वस्तू व सेवेशी संबंधित जाहिराती, सूचना, निवेदने, आवाहने इत्यादी. हे सर्व चित्र, लिखित शब्द (Text) व ध्वनी या स्वरूपात असते. टीव्ही पहात असताना डोळे व कान काम करत असतात आणि हो, मेंदूही. […]
भेंडीबाजार घराण्याची दुर्मीळ झालेली गायकी तीन तपांच्या निरंतर प्रयत्नांनी पुन्हा प्रस्थापित करून ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. समाजातील सर्व स्तरांमध्ये अभिजात संगीताची आवड निर्माण व्हावी म्हणून विविध नावीन्यपूर्ण कार्यक्रमांची त्यांनी निर्मिती केली. […]
आपली व्होटबॅंक फुगवण्यासाठी ३० वर्षांपासून डाव्या आघाडीच्या राज्य सरकारांनी आणी तृणमूल काँग्रेसने मागच्या १० वर्षात पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरी मोठ्या प्रमाणावर होऊ दिली. बंगालचे बांगलादेशीकरण करण्यासाठी डीजेएमआय व आयएसआयने मिळून गेल्या ४८ वर्षांपासून पश्चिम बंगालच्या लोकसंख्येची प्रतवारी बदलण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालविला आहे. भारतीय नागरिक असल्याची कागदपत्रे, शिधावाटप पत्रिका, मतदार ओळखपत्रे मिळवून बांगलादेशी घुसखोर भारतात स्थायिक झाले आहेत. […]
जिवंत अनुभवातून प्रकटलेली जोशी यांची कथा पांढरपेशा मध्यमवर्गीय जीवनाचे, व्यक्ती–व्यक्तींतील भावसंबंधाचे जिव्हाळ्याचे चित्रण करते. परिणामाची उत्कटता, सहजसुंदर संवाद, साधी, प्रसन्न आणि अर्थपूर्ण भाषाशैली ही त्यांच्या कथालेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होती. […]
वेधशाळेनी हलक्याहून अधिक आणि मध्यमहून कमी पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त केलाय म्हणजे नक्की काय याचा मथितार्थ माझ्याही आधी आमच्या एरीयातील डासांना कळला आणि त्यांनी अक्षरशः हैदोस घातला. मानवीडंखासाठी आसुसलेले त्यांचे दात शिवशिवायला लागले. […]
एक खवैया व त्यात खाउपीऊ घालण्यात आनंद लुटणारा या माझ्या पिढीजात स्टेटसमुळे मी राहतो तिथल्या म्हणजेच पुण्याच्या खाद्यसंस्कृतिशी एकरूप झालोय. डोक्यातली वळवळ आणि पोटातली कावकाव यांच्या संगनमताने कित्येक खाद्य चढायांवर मी जीव निछावर केलाय. पुण्यात आज शुक्रवार संध्याकाळ आहे अशी वदंता पसरायचाच अवकाश, बर्याचशा घरी गँसची शेगडी व मँडम यांची द्रुष्टाद्ष्ट चहा कॉफी पुरतीच होत असेल आणि त्या शुक्रवार संध्याकाळपासुन रविवारच्या रात्रीपर्यंत क्षुधाशांतीच्या विविध होमकुंडांभोवती पुणेकर खवैयांची भ्रमंती चालुच असते. […]
चांगल्या कामासाठी “नाही” हा शब्द न वापरणाऱ्या ह्या व्यक्तीचा हात बिनशर्त सदैव मदतीसाठी तयार असतो …..हो अगदी बरोबर ओळखलं…”डॉ. प्रकाश बाबा आमटे” या भाऊंच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये आपले नाना पाटेकर ज्यांना “येम्पलवार” म्हणून बोलावतो ना … तीच ही व्यक्ती.‘मनोहर नारायण येम्पलवार’ …… […]