नवीन लेखन...

पर्यावरण

प्रदूषण (४) – पूर्वी आणि आता – गंगाजळ

दोन थेंब गंगाजळ मृत्युच्या दारी स्वर्गाचे तिकीट रोज पी गंगाजळ त्वरित मिळेल स्वर्गाचे तिकीट. टीप: सरळ नदीचे जीवघेण्या रसायन युक्त प्रदूषित पाणी पिल्यावर विभिन्न रोगराई होऊन माणूस शीघ्र स्वर्गात जाईल.

पाण्याचा असाही उपयोग

आपल्याला दररोजच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर बऱ्याच गोष्टी दिसतात पण आपण त्याचा साकल्याने विचार, चिंतन, अभ्यास किंवा त्याकडे कुतूहलाने बघत नाही. जसे आपल्या शेजारी एखादी इमारत बांधत असतील किंवा जाणाऱ्या येणाऱ्या रत्यावर इमारतीचे बांधकाम चाललेलं असेल तर आपण नुसतं बघतो आणि पुढे जातो. मनात नाना विचार येतात “मुंबईची नुसती वाट लावली आहे”. एवढ्या इमारती बांधून नागरिकांच्या मुलभूत गरजा कश्या भागविता येणार आहेत? मुंबईत दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रूप घारण करीत आहे. त्याला कारण आहे निसर्गाचे बदललेले ऋतूचक्र. त्यात एखादे वर्षी पाऊस नीट पडला नाही आणि तळी भरली नाही की पाणी कपात आणि बरेच काही. हे सगळे सांगण्याचा खटाटोप अश्यासाठी की….. […]

धुळीचे साम्राज्य आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

मुंबईत पावसाळ्यानंतर हवामानात अचानक कोरडेपणा आपल्यामुळे सगळीकडे धूळ मिश्रीत हवामान आहे. सातत्याने होत असलेल्या हवामानातील बदलांमुळे वाढत असलेला उष्मा, धूळ आणि धुराळामिश्रीत बदलती हवा मुंबईकरांच्या समस्या रोज वाढवतच आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळा चेंबूर, देवनार, सायन या भागात राहणाऱ्या अनेकांनी आरोग्याच्या तक्रारींमुळे राहती घर भाड्याने देऊन उपनगरांमध्ये शिफ्ट झाले आहेत. कचऱ्याच्या डम्पिंगमुळे होणारे श्वसनविकार आणि त्वचाविकारांमध्ये सातत्याने भर पडते आहे. गरोदर महिला, लहान मुले व वयोवृद्धांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. […]

दिवाळी आणि फटाके….!

भारतात सण आणि उत्सवांचा एक वेगळा इतिहास आहे आणि त्यात दिवाळीचा सण वेगळा नाही. दिवाळी साजरी करण्याची परंपरा प्राचीन काळा पासून चालत आली आहे. दिवाळीचा आणि फटाक्यांच्या तसं बघता काही जवळचा संबंध नाही. तरीही काही काळापासून दिवाळीत फटाके उडवले जातात फोडले जातात. बर दिवाळीतच फोडले जातात म्हंटल तर तसंही नाही कुठल्याही आनंदाच्या क्षणी फटाके फोडून तो साजरा केला जातो पण त्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होते हे आनंदाच्या भरात आपल्या लक्षात येत नाही. […]

मुंबईकरांच्या एकात्मतेला सलाम !

मुंबईकरांनी आत्तापर्यंत बऱ्याच चांगल्या/वाईट गोष्टी अनुभवल्या आहेत, त्याची झळ सोसली आहे. त्याच्या कारणांनी एकमेकांशी वैर साधलेले बघितले आहे, अबोला बघितला आहे, दंगली अनुभवल्या आहेत. पण कालच्या पावसाने मुंबईकरांचे आणि चाकरमान्यांचे जे हाल झाले आणि त्यातून त्यांना झालेला मनस्ताप, गैरसोयींना सामोरे जातांना बघितले आणि क्षणभर वाटले हाच तो मुंबईकर का? […]

अतिवृष्टी आणि “मुंबईकर”….!

पावसाने एका झटक्यात सगळ्यांना ‘मुंबईकर’ बनवले. आता कोणी मराठी नाही, आता कोणी भैया नाही, कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही.! भिजणारी माणसेच.., मदत मागणारी माणसेच..आणि प्रत्येक जिवाची काळजी घेणारी फक्त माणसेच.! उद्या ऊन पडेल, पाऊस थांबेल, सगळं नीट होईल. फक्त एक करा. ह्या पावसाने दिलेला ओलावा असाच जपून ठेवा.! शेजाऱ्यांची सुद्धा निटशी ओळख नसणार्या मुंबईकरांच्या घराचे दरवाजे आज अनोळखी लोकांसाठी उघडे आहेत. संकटात मदतीला धावून जाण्याच्या या वृत्तीला माझा सलामच…! […]

मनोगत श्रीगणेशाचे !

|| हरी ॐ || वर्षानुवर्षे अग्रपूजेचा माझा मान, त्याचे नाही कधी चुकले भान! या वर्षी येताना मनात शंका नाना, आनंदाने स्वागत होईल ना?   शेतकरी झाले होते अवर्षणाने हैराण, पीक गेले हातचे शेत झाले वैराण! माझ्याकडे विनंती आर्जव त्यांच्या मनात, आगमनाने बरसूदे पाऊस आमच्या शेतात!   वरुणाला आज्ञा माझ्या बरोबर येण्या, नकळत बरसला बेटा वेड्यावीण्या!   […]

1 4 5 6 7 8 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..