नवीन लेखन...

पर्यावरण

ससा आणि कासव : नव्या भूमिकेत

सकाळी दहा वाजेपासून कुणाशीही काहीही न बोलता त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली…… त्यांची ही कृती पाहून रस्त्याने जाणारे मुले मुली आणि इतर मंडळी त्यांच्या कामात मदत करू लागली….. केक गम यांच्या गटात सामील होत होता….. दोनाचे दोन हजार स्वयंसेवक कधी झाले हे कोणालाही कळले नाही आणि संपूर्ण शहरातला कचरा अवघ्या दोन तासात गोळा करून झाला….. आता त्या शहरातली प्रत्येक नाली, प्रत्येक फुटपाथ, प्रत्येक सिग्नल, प्रत्येक चौक आणि प्रत्येक रस्ता स्वच्छ दिसत होता. […]

निमित्त एक पण आपत्ती मात्र अनेक

इथून पुढे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी प्रगती साधताना जिथे जिथे निसर्गाला धक्का लागेल तिथे तिथे ति झीज भरून काढण्याची जिम्मेदारी देखील आपल्याला उचलावी लागेल. आपण तंत्रज्ञान विकसित करण्यासोबत निसर्गाचा आदर राखायला लागलो की मग आपल्यावर देखील वेगवेगळ्या आपत्तीच्या निमित्ताने घरात बंदिस्त होण्याची वेळ येणार नाही. […]

झाड म्हणालं…

जातकुळीच्या झाडांनी आणि वनस्पतींनी समृध्द आहे. जागोजागी त्या त्या वातावरणात, नैसर्गिक पध्दतीने रुजलेले, जोमाने वाढलेले वृक्ष म्हणजे स्थानिक किंवा देशी वृक्ष अशी सोप्पी व्याख्या आपण करू शकतो. हे असे देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्टयात पर्यावरणाचा समतोल साधत असतात. […]

आधुनिक युगातले अर्जुन

पर्यावरण या विषयात ‘पर्यावरणप्रेमी’ ही पदवी मिळवण्या करता पदवैच्छुक जमले होते. आचार्यांनी सगळ्या पदवैच्छुकांना बोलावले व सुरुवात केली. “माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, परीक्षेत एकच प्रश्न असणार आहे. पण आधी तुम्हाला एक गृहपाठ देत आहे. तुम्ही त्याचा नीट अभ्यास करून मग परीक्षे करता यायचे आहे. […]

बर्डमॅन – उदय मांद्रेकर

चोडण येथील युवक उदय मांद्रेकर गेल्या सत्तावीस वर्षांपासून पक्षीप्रेमी, पर्यावरणप्रेमी, छायाचित्रकार, फिल्ममेकर्स यांना चोडण बेटाचे दर्शन करवून देण्याचे काम करतो. मांद्रेकर म्हणतात, आपल्याला यात कसलाच स्वार्थ नाही. परंतु जेव्हापासून आपल्याला या बेटाचे महत्व कळले आहे, तेव्हापासून एक जागरूक नागरिक या नात्याने आपण इथे येणाऱ्यांना पक्षी दर्शन करण्यास नेतो. त्यातून जे काही ही माणसं देतात, ते गोड मानून घेतो. […]

बळीराजाला सौर कृषिपंप योजनेचे वरदान

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे सोयीचे व्हावे व पारंपरिक पद्धतीने कृषिपंपासाठी लागणाऱ्या खर्चात बचत व्हावी, या उद्देशाने राज्यातील कृषी वापराकरिता पारेषणविरहित एक लाख सौर कृषिपंप योजना राज्य शासनाने महावितरणच्या माध्यमातून सुरू केली आहे. या योजनेमुळे अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवण्यास मदत होईल, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे शाश्वत विजेचे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे.  […]

ग्रामीण भागातील रस्त्यावरील संडास व उपाय

काही खेडेगाव कायमस्वरूपी स्वच्छ झालेली आहेत, तर आजही काही खेडेगावात 20% च्या आसपास लोक उगड्यावर संडासला बसत आहेत. ज्या खेड्यातले थोडेही लोक रस्त्यावर संडासला बसतात, हा तेथील सुशिक्षित लोकांचाच अपमान आहे, असे मला वाटते कारण उगड्यावर बसणाऱ्यांंना मानपान, ज्ञान मुळातच नसते, त्यामुळेच हा अपमान अशिक्षीतांचा नसून सुशिक्षितांंचाच आहे असे वाटते. […]

दिवाळीत जपू या सामाजिक भान

दिवाळी म्हणजे अक्षय्य आनंदाचा सण. असा सण जगातील इतर कोणत्याही संस्कृतीमध्ये आढळत नाही. कालपरत्वे हा सण साजरा करण्यात काही बदल होणे गरजेचे आहे. तसे प्रयत्न सुरू झाल्याने दिवाळीचा सण हळूहळू का होईना नवे रूप धारण करत आहे. फटाके फोडणे कमी करून, खरेदीप्रसंगी गरजूंना मदत करून आणि खाद्यपदार्थांऐवजी दिवाळी अंकांची देवाणघेवाण करून आपण नव्या प्रथांना जन्म दिला पाहिजे. […]

1 2 3 4 5 6 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..