मुंबईकरांच्या एकात्मतेला सलाम !

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या महानगराची लोकसंख्या सव्वा कोटीच्या आसपास आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये मुंबई एक आहे. जगातील दहा व्यावसायिक केंद्रांमध्ये मुंबईचा समावेश होतो, यावरून मुंबईचे जागतिक पातळीवरील महत्त्व लक्षात येतेच. मुंबईतील घडामोडींचे पडसाद फक्त देशभरच घडतात असे नाही तर जागतिक पातळीवर त्याची दाखल घेतली जाते. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी जशी आहे, तशीच ती एकजुटीची राजधानी म्हणून तिने वेळोवेळी सिद्ध केले आहे. ५ जुलै, २००५ आणि २९ ऑगस्ट, २०१७च्या घटनानीच सिद्ध केले आहे. असो.

मंगळावर दिनांक २९ ऑगस्ट २०१७ला सकाळपासून आकाशात चांगलेच ढग जमा होत होते. अचानक दुपारी वरुणराजा असाकाही कोसळत होता आणि त्याच्या करामतीच्या ताज्या बातम्या सर्वच वाहिन्यांवरून मिळत होत्या आणि काही दृश्य बघण्याने मनात नाना विचारांचे कल्होळ माजात होते आणि नको त्या आठवणीने मन सुन्न होत होते.

मुंबईत पहाटे पासूनच पावसानं जोर धरला. दुपारपर्यंत पावसाचा प्रचंड जोर वाढल्यानं ५ जुलै, २००५ ची आठवण झाली. मुंबईची लाइफ लाइन समजली जाणारी तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक कोलमडली. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी भरल्यानं रस्ते वाहतूकही ठप्प झाली. त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. लोकांनी कमरे एवढ्या पाण्यातून वाट काढून पायपीट करत कसेबसे घर गाठले. पण कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

मुंबईकरांनी आत्तापर्यंत बऱ्याच चांगल्या/वाईट गोष्टी अनुभवल्या आहेत, त्याची झळ सोसली आहे. त्याच्या कारणांनी एकमेकांशी वैर साधलेले बघितले आहे, अबोला बघितला आहे, दंगली अनुभवल्या आहेत. पण कालच्या पावसाने मुंबईकरांचे आणि चाकरमान्यांचे जे हाल झाले आणि त्यातून त्यांना झालेला मनस्ताप, गैरसोयींना सामोरे जातांना बघितले आणि क्षणभर वाटले हाच तो मुंबईकर का?

मुंबईकरांच्या धैर्याला, चिकाटीला, सोशिकपणाला आणि माणुसकी सलाम. एकमेकांना आधार देत, एकमेकांना मदत करत मजल दरमजल आपल्या गंतव्य स्थानाकडे जात होते. त्यांना काही स्वयंसेवी संस्था, संघटना आणि मंडळी नाक्यानाक्यावर मदत करत होत्या. लोकांसाठी नाश्ता आणि चहापाण्याची व्यवस्था करत मानवतेचं दर्शन घडवत होते. हे सर्व चित्र वृत्तवाहिन्यांवरून आणि सोशल मीडियावरून बघितल्यावर असं वाटलं खरचं हाच तो मुंबईकर का जो प्रत्येक वेळा शुल्लक कारणांवरून हमरीतुमरीवर येत असतो, मारामाऱ्या करत असतो. पण कालच्या एकूणच प्रकारावरून आणि प्रसंगाचे यथोचित भान राखून आलेल्या प्रसंगाला धैर्याने, चिकाटीने आणि समजूतदारपणाने तोंड देत असतांना पहिले आणि खरचं मनातून अपोआप शब्द फुटले ‘सलाम मुंबईकर’. एकतेची भावना क्षणोक्षणी प्रत्येकाच्या मनात आणि कृतीतून दिसून येत होती.

आपण सर्व परमेश्वराकडे हीच प्रार्थना करूया की अशी एकजूट आमच्या सर्वच भारतीयांच्या मनात आणि हृद्यात कायम राहूदेत. फक्त अश्या प्रसंगापुरतीच नाही तर देशापुढे आलेल्या सर्वच बिकट प्रसंगांत धैर्याने, चिकाटीने आणि सचोटीने सहन करण्याची आणि सामना करण्याची शक्ती आम्हांला दे

— जगदीश पटवर्धनजगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 222 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सोलापूर घोंगड्या

सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या ...

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

Loading…