नवीन लेखन...

शैक्षणिक

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – १

ना मी शिक्षक आहे ना गणित तज्ञ ना कथाकार. मी इन्स्ट्रक्शनल डिझायनर – इ लर्निंग कोर्सेसचे स्क्रिप्ट लिहिणारा व्यावसायिक. त्या कलेचा/विद्येचा/ज्ञानाचा उपयोग करून शैक्षणिक साहित्य निर्मितीचे प्रयत्न करतोय. अभिप्राय, सूचना, … जरूर कळवा. चांगली टीका हवी आहे.  […]

स्मृती-विस्मृती

मानवी मेंदू सर्व प्राणिमात्रांच्या मेंदूंपेक्षा प्रगत आहे. विचार करण्याची क्षमता, सामाजिक भान व भाषा ही माणसाची वैशिष्ठ्ये आहेत. आपली माहिती साठविण्याची क्षमता आपल्या कल्पनेपेक्षा तसेच आपल्या आयुष्यातील गरजेपेक्षा खूप-खूप जास्त आहे. मिळविलेल्या माहितीचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात करत असतो. मेंदूत साठविलेल्या माहितीला `स्मृती’ म्हणतात. योग्य वेळी ही माहिती वापरता येणं म्हणजे स्मरणशक्ती चांगली असणं. ही माहिती काही कारणाने आठवली नाही तर ती `विस्मृती’. […]

लाईटबोर्ड उर्फ लर्निंग ग्लास

जेव्हा आपण मुलांकडून दिवसाचे चार तास ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करायची अपेक्षा करतो तेव्हा विविध गोष्टींचा वापर करून आपली लेक्चर्स जास्तीत जास्त इंटरेस्टिंग कशी होतील याची जबाबदारी प्रत्येक लेक्चररची असते. गुगल मीट किंवा झूम वर घेतलेली त्याच त्याच प्रकारची लेक्चर्स कंटाळवाणी ठरू शकतात. […]

शिक्षणाचे मानसशास्त्र : असावा सुंदर चॉकलेटचा बंगला….

शैक्षणिक साहित्यात “गोष्ट” हा एक महत्वाचा घटक आहे. चांगली गोष्ट लक्ष वेधत, विचार प्रवृत्त करते, शिकवते आणि लक्षात राहते. शिक्षणात त्याचा प्रयोग कसा करावा? इयत्ता 4-6 साठी एव्हीडेन्स बेस्ड रिझनिंग, चिकित्सक विचार (Critical Thinking) शिकवण्यासाठी एक प्रायोगिक लेसन प्लॅन. […]

जीवनाची गुणवत्ता !

१९५० पासून जीवनाची गुणवत्ता आणि त्याची मोजदाद याबाबत मानसशास्त्रात विचारमंथन सुरु आहे. प्रत्यक्षात २००३ मध्ये जॉन फ्लॅनागन (John Flanagan) या अमेरिकन मानस शास्त्रज्ञाने एक प्रश्नावली सुचवली- […]

रोजनिशी

“दिसामाजी काहीतरी ते लिहावे प्रसंगी वाचित जावे” ह्या समर्थ रामदासांच्या उक्तीचा आज अर्थ वर्गात सांगितला गेला काय आणि अचानक माझ्यातला लेखक आणि वाचक लगेच जागृत झाला. मराठीचा शेवटचा तास दररोज मला घरची वाट दाखवत असतो कधी एकदा त्या बर्वे सरांच दाराबाहेर पाऊल पडतंय आणि आम्ही सुटतोय अस होत. […]

शिक्षणाचे मानसशास्त्र : परीक्षार्थी शिक्षण – जमेची बाजू

चीनच्या सुई घराण्याच्या राजवटीने सातव्या शतकात जगातली पहिली सरकारी राजपत्रित (गॅझेटेड) अधिकारी पासून कारकुना पर्यंतच्या भरतीसाठी सार्वजनिक परीक्षा आयोजित केली (आजची IAS, MPSC, UPSC परीक्षा). पाश्चिमात्य देशात एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमधे शालांत परीक्षा पद्धत राबवली गेली आणि ओघाने भारतातही आली. इतिहास मनोरंजक तर आहेच पण आजही अशाच पद्धतीने राष्ट्र / राज्य प्रशासकीय यंत्रणेची निवड प्रक्रिया अशीच आहे. […]

विज्ञान मराठी : विज्ञानविषयक मजकूर

विज्ञानविषयक मजकूर छापतांना पारिभाषिक शब्दांच्या बाबतीत बर्‍याच अडचणी येतात. सर्वमान्य पारिभाषिक शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होतो. अुदा. ‘बॉयलिंग पॉअिंट’ या अिंग्रजी शब्दास ‘अुत्कलनबिंदू’ हा सर्वमान्य शब्द आहे. फार तर ‘अुत्कलनांक’ किंवा ‘अुकळांक’ हे शब्द वापरले तरी चालण्यासारखं आहे. पण ‘बुदबुदांक’ हा शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होणार नाही. कोणताही द्रव अुकळत असतांना बुदबुद असा आवाज येतो हे खरं आहे. […]

विज्ञान मराठी : पारिभाषिक संज्ञा

रविवार 26 ऑक्टोबर 1975 च्या महाराष्ट्र टाअीम्समध्ये माझा ‘हार्दिक लयसंयोजक’ “CARDIAC PACEMAKER” हा लेख प्रसिद्ध झाला. आशयप्रधान परिभाषेचा पाठपुरावा करताना आता असं लक्षात आलं की ‘लय संयोजक’ हा शब्द बरोबर होता पण ‘हार्दिक’ हा शब्द तितकासा चपखल नाही. Hearty या शब्दासाठी मराठीत हार्दिक हा शब्द आपण वापरतो. शुभप्रसंगी अुत्सवव्यक्तीचं आपण हार्दिक अभिनंदन करतो. म्हणजे मनापासूनचं, हृदयापासूनचं असा भावनिक अर्थ हार्दिक या शब्दाला आहे. […]

मराठी भाषा आणि लिपी समृध्दी

या विषयाचा आवाका फार मोठा आहे. फेसबुकच्या माध्यमातून, जगभरच्या मराठी विचारवंतांशी संपर्क साधता येतो, विचारांची देवाणघेवाण करता येते, आपले विचार, जगभरच्या विचारवंतांना क्षणभरात पोचविता येतात वगैरे सुविधा असल्यामुळे या माध्यमाचा सुयोग्य वापर करून मराठी भाषेला, कालमानानुसार, समृध्द करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करता येण्यासारखा आहे. […]

1 89 90 91 92 93 154
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..